राजकारण
अराजकता
अराजकता म्हणजे काय?
मूळ प्रश्न: अराजकता म्हणजे काय आहे?
अराजकता म्हणजे अंदाधुंदी. जे काही वाईट चालले आहे, त्याच्यावर कोणाचे नियंत्रण नसणे. अराजकता ही कोणत्याही क्षेत्रात असू शकते, जसे की शाळा, कंपनी, कारखाना, राजकारण, एखाद्या ठिकाणचे नित्य व्यवहार वगैरे. उदाहरणार्थ: जेव्हा एखादे सरकार कोसळते व त्या सरकारच्या जागी इतर काही व्यवस्था न झाल्यास गुंड प्रवृत्ती याचा फायदा घेऊन स्वार्थासाठी लूटालूट, जाळपोळ इत्यादी बेकायदेशीर गोष्टी/जातीय दंगली घडवून आणतात. या सर्वाला आवर घालू शकणाऱ्या पोलिसांनाही यावर आवर घालणे कठीण जाते.
1 उत्तर
1
answers