शिक्षण शब्दाचा अर्थ परीक्षा वादविवाद

वादविवाद स्पर्धा म्हणजे काय, कशी असते माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

वादविवाद स्पर्धा म्हणजे काय, कशी असते माहिती मिळेल का?

2

वक्तृत्व विषयातील एका महत्त्वाच्या स्पर्धा प्रकाराबद्दल आज आपण बोलणार आहोत. या जगात वादाची परंपरा फार फार जुनी आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्येही ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’आपण बघितले असतील. विकिपीडियावर ‘डिबेट’ या पानावर वादाच्या तब्बल 18 अधिकृत प्रकारांची माहिती दिली आहे. (घराघरात होणारे वाद वेगळेच! पण तो आपल्या चर्चेचा विषय नाही. कारण तिथे हार-जीत नसते. आपला इंटरेस्ट स्पर्धात्मक वादापुरताच आहे.) शालेयपेक्षाही मुख्यत: महाविद्यालयीन गटामध्ये वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात. (शाळेपासून जाहीर वाद घालायला लावण्याचे दिवस अजून यायचे आहेत!)

वक्तृत्वामध्ये जसे चार-पाच विषय असतात, तसे वाद स्पर्धेमध्ये एकच प्रस्ताव असतो. महाराष्‍ट्रामध्ये महाविद्यालयीन स्तरावर आयोजित केल्या जाणा-या  जवळपास सर्व स्पर्धा या ‘वन बाय वन डिबेट’ प्रकारच्या असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक महाविद्यालयातर्फे दोन स्पर्धकांचा संघ सहभागी होतो.
एक स्पर्धक विषयाच्या बाजूने (अनुकूल) आणि दुसरा विषयाच्या विरुद्ध बाजूने (प्रतिकूल) भाषण करतो. आलटून पालटून दोन्ही बाजूंचे स्पर्धकांचे भाषण झाल्यावर  प्रस्तावाबद्दलच्या कुठल्याही निष्कर्षाशिवाय निकाल जाहीर होतो. ज्या महाविद्यालयाच्या दोन्ही स्पर्धकांची वैयक्तिक गुणसंख्या सर्वाधिक असते, त्या महाविद्यालयाला सांघिक चषक व ज्या स्पर्धकाची गुणसंख्या सर्वाधिक त्याला वैयक्तिक पारितोषिक मिळते. याचाच अर्थ, वाद स्पर्धेमध्येही व्यक्तिगत वक्तृत्व-वादकौशल्यालाच महत्त्व आहे. काही अपवादात्मक स्पर्धांमध्ये भाषणानंतर स्पर्धकाला परीक्षकांतर्फे किंवा श्रोत्यांतर्फे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरे हीसुद्धा गुणदान करताना विचारात घेतली जातात.

वक्तृत्वकलेची सर्वात खरी कसोटी वाद स्पर्धेमध्ये लागते. कारण वक्तृत्वाबरोबरच इथे विरोधी बाजूपेक्षा आपली बाजू कशी वरचढ आणि बरोबर आहे हे दहा मिनिटांत परीक्षकांना आणि श्रोत्यांना पटवून द्यायचे असते. चला, उदाहरण बघू!

प्रस्ताव - भारतीय कुटुंब पद्धती -हास पावत आहे.
हे वाचल्या वाचल्या तुमच्या डोक्यात एक तर ‘हो’ किंवा ‘नाही’ ही उत्तरे आली असतील. (ज्यांना ठरवता आलं नाही, त्यांना विशेष तयारीची गरज आहे.) आता आपण ‘हो’ म्हणजे प्रस्तावाच्या अनुकूल बाजूच्या मुद्द्यांचा विचार करू. अशी कल्पना करा, की भारतीय कुटुंब पद्धती -हास पावत आहे असं तुम्हाला मनापासून वाटतंय. आता हे परीक्षकांना असं पटवून द्यायचं की त्यानंतर प्रस्तावाला विरुद्ध बाजू असूच शकत नाही अशी त्यांची खात्री झाली पाहिजे!
तुमच्या मनात अनुकूल बाजूचे काय काय मुद्दे येत आहेत? (आता आपण मुद्द्यांवरच भर देणार. पूर्ण भाषण लिहिण्यात शक्ती आणि वेळ दोन्ही वाया जाईल ना?)

1.    भारतीय कुटुंब पद्धती म्हणजे काय?
2.    या पद्धतीचा इतिहास, वर्तमान. भारतीय कुटुंब संस्थेशी संबंधित घटक - समाज, प्रथा, विवाह संस्था, अपत्यजन्म, वंशकल्पना, कुटुंबातील सदस्यांची देखभाल, नातीगोती, प्रेम-जिव्हाळा, सामाजिक बांधिलकी, सरकारी धोरणे.
3.    भारतीय कुटुंब संस्थेचे फायदे

या कुटुंब संस्थेचा -हास होण्यामागचे घटक
1.    बदलत्या काळानुसार बदललेला भारतीय समाज
2.    जागतिकीकरणामुळे आणि तंत्रज्ञानामुळे कुटुंब संस्थेला पोचणारे धक्के. लोकसंख्यावाढीमुळे व वाढत्या महागाईमुळे ‘हम दो हमारा एक’ किंवा ‘सिर्फ हम दो’ ची नवीन पद्धत (सिलिंडर दरवाढीनंतर एकत्र कुटुंबाऐवजी दोन कुटुंबे वेगळी झाली तर दोन सिलिंडर मिळू शकतील अशी शक्यता सध्या दिसते आहे)
3.    प्रदूषण, व्यसने, गतिमान जीवनपद्धती यामुळे वैयक्तिक आरोग्यमान खालावते आहे. त्याचा थेट परिणाम आयुर्मानावर होतो.
पाहा! बोलता बोलता 10 मिनिटे पुरतील इतके मुद्दे तयार झाले. यात अजूनही भर पडू शकेल. थोडक्यात म्हणजे प्रस्तावाला ‘कशामुळे?’ हा एकच प्रश्न विचारला तर आपल्याला हवी ती उत्तरे मिळू शकतील.
आता तुमचं मत ‘कुटुंब संस्था -हास पावत नाहीये’ असं असेल, तर? मुद्दे सहज सुचत आहेत? नसेल तर वेळ घ्या. स्वतंत्रपणे विचार करून बघा. तुम्ही प्रतिकूल बाजूचे मुद्दे मला ई-मेलमधूनही कळवू शकता.
जाता जाता एक टीप देतो - वाद स्पर्धेमध्ये प्रस्तावामधला प्रत्येक शब्द मोलाचा असतो बरं! अगदी ‘च’ सुद्धा!! एका स्पर्धेमध्ये प्रस्ताव होता - ‘प्रेम व्यक्त करायला 14 फेब्रुवारी हवाच’. ‘14 फेब्रुवारी हवा’ आणि ‘14 फेब्रुवारी हवाच’ यात सूक्ष्म पण भाषणावर परिणाम करणारा फरक आहे, हे तुमच्या लक्षात येतंय ना? या प्रस्तावाचेही मुद्दे काढा आणि मला कळवा बरं! पुन्हा भेटूच!
उत्तर लिहिले · 13/9/2017
कर्म · 7045
1

 फ्लिकरबॉलिवूडजीवनमंत्रदेशविदेशक्रीडाजोक्स

Advertisement

वादविवाद स्पर्धा : संवादाची वेगळी पद्धत!

नचिकेत जोशी | Jan 01,2013 10:40 PM IST

FacebookWhatsapp

वक्तृत्व विषयातील एका महत्त्वाच्या स्पर्धा प्रकाराबद्दल आज आपण बोलणार आहोत. या जगात वादाची परंपरा फार फार जुनी आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्येही ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’आपण बघितले असतील. विकिपीडियावर ‘डिबेट’ या पानावर वादाच्या तब्बल 18 अधिकृत प्रकारांची माहिती दिली आहे. (घराघरात होणारे वाद वेगळेच! पण तो आपल्या चर्चेचा विषय नाही. कारण तिथे हार-जीत नसते. आपला इंटरेस्ट स्पर्धात्मक वादापुरताच आहे.) शालेयपेक्षाही मुख्यत: महाविद्यालयीन गटामध्ये वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात. (शाळेपासून जाहीर वाद घालायला लावण्याचे दिवस अजून यायचे आहेत!)

वक्तृत्वामध्ये जसे चार-पाच विषय असतात, तसे वाद स्पर्धेमध्ये एकच प्रस्ताव असतो. महाराष्‍ट्रामध्ये महाविद्यालयीन स्तरावर आयोजित केल्या जाणा-या  जवळपास सर्व स्पर्धा या ‘वन बाय वन डिबेट’ प्रकारच्या असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक महाविद्यालयातर्फे दोन स्पर्धकांचा संघ सहभागी होतो.
एक स्पर्धक विषयाच्या बाजूने (अनुकूल) आणि दुसरा विषयाच्या विरुद्ध बाजूने (प्रतिकूल) भाषण करतो. आलटून पालटून दोन्ही बाजूंचे स्पर्धकांचे भाषण झाल्यावर  प्रस्तावाबद्दलच्या कुठल्याही निष्कर्षाशिवाय निकाल जाहीर होतो. ज्या महाविद्यालयाच्या दोन्ही स्पर्धकांची वैयक्तिक गुणसंख्या सर्वाधिक असते, त्या महाविद्यालयाला सांघिक चषक व ज्या स्पर्धकाची गुणसंख्या सर्वाधिक त्याला वैयक्तिक पारितोषिक मिळते. याचाच अर्थ, वाद स्पर्धेमध्येही व्यक्तिगत वक्तृत्व-वादकौशल्यालाच महत्त्व आहे. काही अपवादात्मक स्पर्धांमध्ये भाषणानंतर स्पर्धकाला परीक्षकांतर्फे किंवा श्रोत्यांतर्फे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरे हीसुद्धा गुणदान करताना विचारात घेतली जातात.

वक्तृत्वकलेची सर्वात खरी कसोटी वाद स्पर्धेमध्ये लागते. कारण वक्तृत्वाबरोबरच इथे विरोधी बाजूपेक्षा आपली बाजू कशी वरचढ आणि बरोबर आहे हे दहा मिनिटांत परीक्षकांना आणि श्रोत्यांना पटवून द्यायचे असते. चला, उदाहरण बघू!

प्रस्ताव - भारतीय कुटुंब पद्धती -हास पावत आहे.
हे वाचल्या वाचल्या तुमच्या डोक्यात एक तर ‘हो’ किंवा ‘नाही’ ही उत्तरे आली असतील. (ज्यांना ठरवता आलं नाही, त्यांना विशेष तयारीची गरज आहे.) आता आपण ‘हो’ म्हणजे प्रस्तावाच्या अनुकूल बाजूच्या मुद्द्यांचा विचार करू. अशी कल्पना करा, की भारतीय कुटुंब पद्धती -हास पावत आहे असं तुम्हाला मनापासून वाटतंय. आता हे परीक्षकांना असं पटवून द्यायचं की त्यानंतर प्रस्तावाला विरुद्ध बाजू असूच शकत नाही अशी त्यांची खात्री झाली पाहिजे!
तुमच्या मनात अनुकूल बाजूचे काय काय मुद्दे येत आहेत? (आता आपण मुद्द्यांवरच भर देणार. पूर्ण भाषण लिहिण्यात शक्ती आणि वेळ दोन्ही वाया जाईल ना?)

1.    भारतीय कुटुंब पद्धती म्हणजे काय?
2.    या पद्धतीचा इतिहास, वर्तमान. भारतीय कुटुंब संस्थेशी संबंधित घटक - समाज, प्रथा, विवाह संस्था, अपत्यजन्म, वंशकल्पना, कुटुंबातील सदस्यांची देखभाल, नातीगोती, प्रेम-जिव्हाळा, सामाजिक बांधिलकी, सरकारी धोरणे.
3.    भारतीय कुटुंब संस्थेचे फायदे

या कुटुंब संस्थेचा -हास होण्यामागचे घटक
1.    बदलत्या काळानुसार बदललेला भारतीय समाज
2.    जागतिकीकरणामुळे आणि तंत्रज्ञानामुळे कुटुंब संस्थेला पोचणारे धक्के. लोकसंख्यावाढीमुळे व वाढत्या महागाईमुळे ‘हम दो हमारा एक’ किंवा ‘सिर्फ हम दो’ ची नवीन पद्धत (सिलिंडर दरवाढीनंतर एकत्र कुटुंबाऐवजी दोन कुटुंबे वेगळी झाली तर दोन सिलिंडर मिळू शकतील अशी शक्यता सध्या दिसते आहे)
3.    प्रदूषण, व्यसने, गतिमान जीवनपद्धती यामुळे वैयक्तिक आरोग्यमान खालावते आहे. त्याचा थेट परिणाम आयुर्मानावर होतो.
पाहा! बोलता बोलता 10 मिनिटे पुरतील इतके मुद्दे तयार झाले. यात अजूनही भर पडू शकेल. थोडक्यात म्हणजे प्रस्तावाला ‘कशामुळे?’ हा एकच प्रश्न विचारला तर आपल्याला हवी ती उत्तरे मिळू शकतील.
आता तुमचं मत ‘कुटुंब संस्था -हास पावत नाहीये’ असं असेल, तर? मुद्दे सहज सुचत आहेत? नसेल तर वेळ घ्या. स्वतंत्रपणे विचार करून बघा

उत्तर लिहिले · 13/9/2017
कर्म · 22090
0
sicher! वादविवाद स्पर्धेबद्दल (debate competition) माहिती खालीलप्रमाणे:

वादविवाद स्पर्धा:

वादविवाद स्पर्धा म्हणजे एक औपचारिक चर्चा असते. यात दोन गट एका विषयावर विरुद्ध बाजू मांडतात. प्रत्येक गटाला त्यांचे विचार आणि युक्तिवाद सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिला जातो.

वादविवाद स्पर्धेची रचना:

  1. विषयाची निवड: स्पर्धेसाठी एक विषय निवडला जातो, जो सामाजिक, राजकीय किंवा शैक्षणिक असू शकतो.
  2. गटांची विभागणी: स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक दोन गटांमध्ये विभागले जातात - एक गट विषयाच्या बाजूने बोलतो, तर दुसरा गट विरोधात.
  3. भाषण: प्रत्येक गटातील सदस्य क्रमाक्रमाने आपले विचार मांडतात. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यांच्या युक्तिवादांना उत्तर देण्यासाठी वेळ दिला जातो.
  4. न्यायालय (judges): काही न्यायाधीश (judges) दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून गुणांकन करतात.

नियम आणि मार्गदर्शन:

  • प्रत्येक स्पर्धकाला वेळेचे पालन करावे लागते.
  • शिस्त आणि सभ्यतेने आपले मत मांडावे लागते.
  • पुरावे आणि तथ्यांचा वापर करून युक्तिवाद सादर करावे लागतात.

उदाहरण:

विषय: "ऑनलाईन शिक्षण पारंपरिक शिक्षणापेक्षा अधिक प्रभावी आहे."

या विषयावर एक गट ऑनलाईन शिक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करेल, तर दुसरा गट पारंपरिक शिक्षणाच्या बाजूने.

अधिक माहितीसाठी:

तुम्ही विकिपीडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6) किंवा इतर शैक्षणिक संकेतस्थळांना भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5140

Related Questions

Debate on social issu marathi answer?
मला कोणत्याही विषयावर डिबेट इंग्रजीमध्ये पाहिजे?
झाकीर नाईक च्या चुका असणाऱ्या गोष्टी सांगा?