2 उत्तरे
2 answers

पत्रकार म्हणजे काय?

7
एकेकाळी पत्रकारिता म्हणजे एक प्रकारचे व्रत समजले जात असे. लोकमान्य टिळकांची पत्रकारिता, ‘सुधारक’कार आगरकरांची पत्रकारिता, गांधीजींची पत्रकारिता व बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता वगैरेंची नेहमी उदाहरणं दिली जातात. या सर्वांसमोर एकच ध्येय होते व ते म्हणजे देशाचे स्वातंत्रय व समाजाचा उद्धार. स्वातंत्र्यानंतर यातील पहिल्याची ध्येयपूर्ती झाली, पण दुसरे अद्याप सुरू आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, खास करून गेल्या पंचवीस वर्षांंत पत्रकारितेचे स्वरूप आमुलाग्र बदलले आहे. एकेकाळी एखादी व्यक्ती स्वतःच्या विचारांच्या प्रचारासाठी वृत्तपत्र/साप्ताहिक सुरू करत असे व अतिशय प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता चालवत असे. आगरकरांनी ‘सुधारक’ कसे चालवले किंवा बाबासाहेबांनी ‘मुकनायक’ कसे चालवले याची भरपूर माहिती समाजात उपलब्ध आहे. आज तशी स्थिती नाही. आजची पत्रकारिता मोठ्या प्रमाणात भांडवलशरण झाली आहे जेथे करोडोंचा खेळ सुरू असतो.
आज जवळपास प्रत्येक मोठ्या उद्योगपतीचे व राजकारणी नेत्याचे स्वतःचे वृत्तपत्र असते किंवा दूरचित्रवाणीची वाहिनी असते. याचे कारण वृत्तपत्र किंवा चित्रवाणी चालवणे याचे काही दृश्य तर किंवा अदृश्य फायदे असतात. म्हणूनच आजची पत्रकारिता एका बाजूने व्यावसायिक झाली आहे तर दुसर्‍या बाजूने त्यात बडे भांडवलदार आलेले आहेत. या दोन्ही घटकांमुळे आजच्या पत्रकारांवर प्राणघातक हल्ले होत आहे, तर काही पत्रकारांचे सरळसरळ खून होत आहेत. अलीकडे आपल्या देशांत अशा घटनांची संख्या लक्षात यावी इतकी वाढली आहे. मागच्या रविवारी मध्यप्रदेश या राज्यात पत्रकाराचा खुनी हल्ल्यात मृत्यू झाला. त्याच्या प्रेतयात्रेला राहुल गांधी, अरविंद केजरीवाल वगैरे मंडळी उपस्थित होती.
मध्य प्रदेश राज्यातील ही घटना एकमेक नाही व अपवादस्वरूपही नाही. आज देशाच्या जवळपास प्रत्येक राज्यात पत्रकारांचा खुनी हल्ल्यात मृत्यू होत आहे. जे पत्रकार आपल्या लेखणीद्वारे समाजातील घाण वेशीवर टांगत आहेत त्यांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. ओडिसा राज्यातील महत्त्वाचे वृत्तपत्र म्हणजे ‘संवाद’. लक्ष्मण चौधरी या पत्रकाराने त्या राज्यातील गांजाचे व्यापारी व पोलिस अधिकारी यांच्यातील संगनमताने चालत असलेल्या व्यवहारांबद्दल अनेक लेख ‘संवाद’मध्ये लिहले. पोलिसांनी २० सप्टेंबर २००९ रोजी चौधरीच्या घरावर धाड टाकली व त्याच्याजवळ असलेले माओवादी साहित्य जप्त केले. चौधरीला अटक केली व त्याच्यावर डझनभर आरोप लावले. यातील सर्वात धोकादायक आरोप म्हणजे राजद्रोहाचा आरोप. चौधरीला झालेल्या अटकेच्या विरोधात राज्यभरातून निषेधाचे सूर उमटले व शेवटी ७३ दिवस तुरुंगात काढल्यावर चौधरीची जामिनावर सुटका झाली. खटला अजून सुरू व्हायचा आहे. पण ज्या वेगाने पोलिसांनी लक्ष्मण चौधरीसारख्या पत्रकाराला अटक केली त्यावरून चौधरीच्या आरोपात तथ्य आहे हेच सिद्ध झाले.
अशीच कहाणी आहे आसाम राज्यातील उदलगिरी जिल्ह्यातील खैराबारी या खेड्यात शिक्षकाची नोकरी करणार्‍या प्रसंत कुमारची. खैराबारी हे छोटेसे गाव आसामची राजधानी असलेल्या गुहावटीपासून ८० किलोमीटरवर आहे. प्रसंत कुमार आसाममधील अनेक वृत्तपत्रांसाठी आपली नोकरी सांभाळून स्थानिक पातळीवर बातमीदारी करतात. खैराबारी गावाला जातीय दंग्याचा जुना इतिहास आहे. १९८३ साली जेव्हा बोडो जमातीसाठी ‘बोडो स्वायत्त मंडळ’ स्थापन झाले होते तेव्हा बोडो व बिगर्रबोडो यांच्यात रक्तरंजित दंगली झाल्या व आजही होत आहेत. याविरुद्ध प्रसंत कुमार यांनी वेळोवेळी वार्तापत्रं लिहली आहेत. ही वार्तापत्रं बोडो जमातीतील काही अतिरेकी मंडळींना आवडली नाहीत. त्यांनी प्रसंत कुमार यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांच्या डाव्या खांद्यात गोळी घुसली. एवढेच नव्हे तर त्यांना जगणे प्रिय असेल आम्हाला नऊ लाख रुपये द्या असा निरोपही अतिरेक्यांनी पाठवला.
उत्तर प्रदेशातील महत्त्वाचे वृत्तपत्र म्हणजे ‘दैनिक जागरण’. या वृत्तपत्राची शहाजहानपूर येथून आवृत्ती प्रकाशित होते. यात नरेंद्र यादव हा तरुण पत्रकार आहे. यादववर १७ सप्टेंबर २०१४ च्या रात्री काही गुंडांनी भीषण हल्ला केला. यात नरेंद्र यादव मरतामरता वाचला. गुंडांनी त्याची मान चिरण्याचा प्रयत्न केला होता. या जखमेसाठी यादवला ४८ टाके पडले. नरेंद्र यादवचा गुन्हा काय? तर त्याने ऑगस्ट २०१३ ते सप्टेबर २०१४ दरम्यान आसाराम बापूच्या कारवायांवर तब्बल २८७ वार्तापत्रं लिहली. ज्या १६ वर्षाच्या मुलीवर आसारामबापूंनी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत ती मुलगी शहाजहानपूरची आहे.
उत्तर लिहिले · 12/9/2017
कर्म · 22090
0

पत्रकार म्हणजे काय:

पत्रकार तो असतो जो बातमी शोधतो, लिहितो, आणि लोकांना विविध माध्यमांद्वारे (उदाहरणार्थ: वृत्तपत्रे, मासिके, रेडिओ, दूरदर्शन, आणि इंटरनेट) माहिती देतो.

एका पत्रकाराची भूमिका समाजात खूप महत्त्वाची असते. ते लोकांना जागरूक ठेवतात आणि महत्त्वाच्या घटना आणि समस्यांवर प्रकाश टाकतात.

पत्रकाराचे कार्य:

  1. बातम्या शोधणे आणि त्यांची सत्यता तपासणे.
  2. लोकांसाठी माहितीपूर्ण लेख आणि अहवाल तयार करणे.
  3. घडलेल्या घटनांचे विश्लेषण करणे.
  4. मुलाखती घेणे आणि लोकांचे मत जाणून घेणे.
  5. सामाजिक समस्यांवर आवाज उठवणे.

पत्रकारितेचे प्रकार:

  • वृत्तपत्र पत्रकारिता: वृत्तपत्रांसाठी बातम्या आणि लेख लिहिणे.
  • टीव्ही पत्रकारिता: दूरदर्शनसाठी बातम्या देणे आणि कार्यक्रम करणे.
  • रेडिओ पत्रकारिता: रेडिओसाठी बातम्या आणि कार्यक्रम सादर करणे.
  • वेब पत्रकारिता: इंटरनेटवर बातम्या आणि लेख प्रकाशित करणे.

पत्रकारिता एक जबाबदारीचे काम आहे. पत्रकारांनी नेहमी सत्य आणि निष्पक्ष राहून काम केले पाहिजे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2840

Related Questions

भारतात कोणत्या जॉबला जास्त मागणी आहे?
तो सरकारी अधिकारी आहे किंवा नाही याची चौकशी कशी करावी?
सरकारी अधिकारी कामाच्या ठिकाणी जर राहत नसतील, तर माहिती अधिकार अर्ज कसा करावा?
एसएपी कोर्स केल्याचे फायदे?
विभागीय आयुक्तांच्या वरती कोणते अधिकारी असतात?
कलेक्टरच्या वरती कोणता अधिकारी असतो?
मेकॅनिकल इंजिनिअरसाठी चांगला जॉब कोणता?