शिक्षण
MPSC - राज्य लोकसेवा आयोग
UPSC - केंद्र लोकसेवा आयोग
परीक्षा
स्पर्धा परीक्षा
प्रवेश परीक्षा
मुक्त विद्यापीठ
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली तर आपण MPSC किंवा UPSC परीक्षा देऊ शकतो का?
3 उत्तरे
3
answers
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली तर आपण MPSC किंवा UPSC परीक्षा देऊ शकतो का?
12
Answer link
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची आर्ट्स ,कॉमर्स ,सायन्स पदवी घेतल्यास आपण mpsc upsc कोणतीही स्पर्धा परीक्षा 100% देऊ शकतो. माझे ग्रॅज्युएशन हे y c m o u या university मधून झाले आहे आणि
मी स्वतः mpsc दोन वेळा दिली आहे.
मा.रमेश घोलप साहेब यांनी ycmou मधून पदवी घेऊनच UPSC crack केलेली आहे.

6
Answer link
हो देता येते नियोजनबद्ध अभ्यास करूनसुद्धा यश मिळवता येते परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र यात ग्रामीण व शहरी भागाची दरी स्पष्टपणे दिसते. एम.पी.एस.सी.ची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, मुंबई या शहरांमध्ये अभ्यासिकांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. खरेतर या परीक्षेचे स्वरूप अभ्यासासाठी लागणारे अभ्याससाहित्य व योग्य नियोजन केल्यास आपण आहे तेथून देखील या परीक्षेची तयारी करू शकतो.
दरवर्षी एम.पी.एस.सी.द्वारे नागरी प्रशासनाचा गट अ व गट ब या श्रेणीच्या पदांसाठी एक साधारण परीक्षा घेतली जाते. विक्रीकर निरीक्षक सहायक, पोलीस निरीक्षक या पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शिक्षण क्षेत्रातील विशेष पदांसाठी एम.पी.एस.सी. वेगवेगळय़ा परीक्षांचे आयोजन करते. राज्यसेवा परीक्षांद्वारे उपजिल्हाधिकारी गट अ तसेच पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त गट अ, याबरोबरच प्रशासनातील जवळजवळ १६ ते १७ पदांसाठी परीक्षा घेत असतात.
एम.पी.एस.सी.द्वारा भरली जाणारी पदे – १) उपजिल्हाधिकारी, गट अ २) पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त – गट अ, ३) सहायक विक्रीकर आयुक्त- गट अ, ४) उपनिबंधक सहकारी संस्था- गट अ, ५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)- गट अ , ६) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (कनिष्ठ), ७) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, ८) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट अ, ९) तहसीलदार-गट अ, १०) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- गट ब, ११) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा-गट ब, १२) कक्ष अधिकारी- गट ब, १३) गटविकास अधिकारी- गट ब १४) मुख्याधिकारी नगरपालिका, १५) सहायक निबंधक सहकारी संस्था- गट ब, १६) उपअधीक्षक, भूमिअभिलेख- गट ब, १७) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट ब, १८) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- गट ब १९) नायब तहसीलदार- गट ब.
एम.पी.एस.सी. परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्प्यांत होते हे आपणास माहीत आहेच. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वेळोवेळी जाहीर केला जातो. दरवर्षी ३ ते ४ लाख विद्यार्थी प्रशासनात येण्याचे स्वप्न घेऊन या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात, मात्र यांपकी काहींनाच यात यश प्राप्त होते मग ही परीक्षा अवघड असते का? उत्तर हे नकारार्थी आहे. या परीक्षेबद्दल योग्य माहिती करून घेतली व अभ्यासाचे नियोजन करून घेतले तर या परीक्षेत आपण नक्कीच यश प्राप्त करू शकतो.
परीक्षेच्या तयारीला सुरुवात कधी करावी- शक्यतो पदवी परीक्षेच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षांपासून तयारी सुरुवात केल्यास जास्त चांगले असते, कारण अभ्यासक्रमात नमूद केलेल्या सर्व घटकांची सखोल तयारी करायला मोठा वेळ मिळतो. मात्र ग्रामीण व शहरी भागातील काही विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल माहिती उशिरा मिळते, मिळाली तरी ती योग्यप्रकारे मिळत नाही त्यामुळे वेगवेगळय़ा गरसमजुती पसरवल्या जातात. जर आपण पदवीधारक असणार व पदवी धारण करून काही वर्षे झाली असली तरी निराश होण्याचे काही कारण नाही. एक योग्य नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केल्यास आपण या परीक्षेची तयारी उत्तमपणे करू शकते. सर्वात आवश्यक अशी बाब म्हणजे सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतची महाराष्ट्र शासनाची शालेय पाठय़क्रमातील पुस्तके वाचून काढावीत. कारण या पुस्तकांच्या वाचनाने पुढचा अभ्यासक्रम समजणे सोपे होते.
गेल्या काही वर्षांपासून खूप सारे प्रश्न या पुस्तकातून विचारले जातात. विशेषत: इतिहास, भूगोल व विज्ञान ही पुस्तके वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
वयोमर्यादा – साधारण प्रवर्गासाठी किमान 19 वष्रे व कमाल 38 वष्रे वयोमर्यादा निर्धारित केली आहे. कमाल वयोमर्यादा खालील बाबतींत शिथिलक्षम करण्यात आली आहे.
१) शासनाने मान्यता दिलेल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांपर्यंत म्हणजे कमाल वयोमर्यादा 43 वष्रे.
२) अपंग उमेदवारांच्या बाबतीत 10 वष्रे शिथिलक्षम म्हणजे ४५ वर्षांपर्यंत.
३) पात्र खेळाडूंच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत (कमाल 43 वष्रे).
४) माजी सनिक/आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षांपर्यंत. (43 वष्रे).
परीक्षेचा अर्ज भरण्याची पद्धत- परीक्षेचा अर्ज भरताना शांत डोक्याने व योग्य सव्र्हरचा वापर करून अर्ज भरण्याची सुरुवात करावी.
१) प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत.
२) उमेदवाराला अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटद्वारे आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीत सादर करणे आवश्यक असते.
३) विहित पद्धतीने आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षाशुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जात नाही.
४) अर्जाचे शुल्क हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे तसेच ऑनलाइन डेबिट कार्डद्वारे देखील जमा करता येते. परीक्षाशुल्क जमा झाल्यानंतर दोन दिवसांनी परीक्षा केंद्राची निवड करणे देखील गरजेचे असते.
५) परीक्षेपूर्वी ७ दिवसांअगोदर उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र त्याच्या प्रोफाइलद्वारे उपलब्ध करून देण्यात येते. ती प्रत डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.१

0
Answer link
होय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून (YCMOU) पदवी घेतल्यानंतर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करू शकता.
MPSC आणि UPSC परीक्षांसाठी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे एक मान्यताप्राप्त विद्यापीठ असल्यामुळे, येथून पदवी प्राप्त केलेले उमेदवार या परीक्षांसाठी पात्र ठरतात.
अधिक माहितीसाठी, आपण MPSC (https://mpsc.gov.in/) आणि UPSC (https://www.upsc.gov.in/) यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.