2 उत्तरे
2
answers
कुरळे केस सरळ कसे करावे?
8
Answer link
आपले केस एकदम सरळ दिसावेत आणि खूप मऊ व्हावेत अशी खुपश्या मुलींची इच्छा असते. जास्त करून अश्या मुलींची ज्यांचे केस थोडेसे का होईना कुरळे आहेत किवा खूप प्रमाणात कुरळे आहेत. किंवा सहज म्हणुन बाहेर जायचा आहे किवा एखाद्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नाला जायचा आहे एखादी पार्टी आहे तेव्हा आपला लुक थोडा वेगळा असावा याकरिता सुद्धा केस सरळ हवेत असे आपल्याला वाटते. एखाद्या पोशाखाशी मिळती-जुळती केशरचना करण्यासाठी सुद्धा बहुतेक वेळा केस सरळ हवे असतात. काही मुलींचे केस हे मूळताच सरळ असतात काही केला तरी ते कुरळे होत नाहीत किवा विस्कटतच नाही. काही महिला पार्लर मध्ये जाऊन खूप पैसे
त्यासाठीच घरच्या घरी केस सरळ करण्यासाठी काही सोपे उपाय.
१) लिंबाचा रस आणि नारळाचे दुध- नारळाचे दुध आणि लिंबाचा रस हे आपल्याला केस सरळ करण्यासाठी खूप चांगले साहित्य आहे. हे मिश्रण एकत्र केले तर एखाद्या क्रीम कंडीशनर सारखे तयार होते. हे क्रीम केसांना लावुन पाच मिनिटाने अतिशय कोमट पाण्याने धुऊन घ्यावे. आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही असे केल्यास केसांमधला फरक तुम्हाला जाणवेल.
२) दुध आणि मध- दुध आणि मध हे देखील एक उत्तम नैसर्गिक रसायन आहे केसांसाठी. एक कप दुधात दोन चमचे मध घाला आणि असल्या तर फ्रेश(strawberries) स्टबेरिजबारीक करून घाला. हे मिश्रण २ तास केसांना लावुन ठेवा आणि त्यानंतर अतिशय सौम्य शॅम्पूने केस धुऊन टाका.
३) ऑलिव्ह ऑईल आणि अंडे- २ अंडी घ्या त्यात ऑलिव्ह ऑईल एकत्र करून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावुन हलका मसाज करा. १ तास तसेच राहू द्या. याने तुमचे केस नुसतेच मऊ नाही होणार तर सरळहि होतील.
४) एरंडेल तेल- एरंडेल तेल थोडे गरम करून घ्यावे. कोमट असतानाच केसांच्या मुळांशी हलका मासाज करावा. नंतर टॉवेल गरम पाण्यात भिजवुन केसांना बांधुन टाकावा अर्ध्या तासाने केस धुवावेत असे केल्याने केस नैसर्गिकरित्या सरळ राहतात.
५) कोरफड गर- कोरफड हि अतिशय उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे. तेल थोडे गरम करून घ्यावे आणि त्यात थोडा कोरफडीचा गर घालुन घ्यावा. हे एकत्र करून केसांना लावावे. ३०-४० मिनिटानंतर हे धुऊन टाकावे. दिसताना हे हेअर मास्क प्रमाणे दिसते पण काम कंडीशनरचे करते. यामुळे केस चमकदार आणि सरळ होतात.
६) दुध- थोडेसे दुध एका स्प्रे बाटलीत भरून घ्या. शॅम्पूनंतर केस व्यवस्थित विचरून घ्या. केसांवर दुधाचा स्प्रे मारा, आणि ३० मिनिटांनी धुवा. तुमच्या आवडता परफ्युम थोडा केसांना मारून पुन्हा कंगव्याने केस निट विंचरा दुधाचा वास नाहीसा होईल. जास्त प्रमाणात परफ्युम मारू नये कारण त्यात अल्कोहोल असते ज्यामुळे केस कोरडे पडू शकतात.
७) केळी, पपई हेअर मास्क- पिकलेले केळ आणि पपई समप्रमाणात कुस्करून एकत्र करून घ्यावी. १ चमचा मध घालुन ते व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. हा हेअर मास्क केसांच्या मुळांशी लावा आणि पूर्ण वाळल्यानंतर केस धुऊन टाका तुम्हांला तुमचे केस खूप आवडायला लागतील.
८) व्हीनेगर- केस शॅम्पूने धुतल्यानंतर एका मगमध्ये पाण्यात व्हीनेगरचे थोडे थेंब घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून केसांच्या मुळांशी लावा लगेच धुऊन टाका. तुंम्हाला चांगला फरक वाटेल.
९) सोयाबिन तेल- सोयाबिन तेल आणि एरंडेल तेल २ चमचे घेऊन एकत्र करून गरम करून घ्यावे. हे तेल गार होऊ द्यावे. पूर्ण डोक्याला या तेलाने मालिश करावी नंतर ४० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुऊन टाका.
१०) बदाम तेल- आठवड्यातून ३ वेळा बदाम तेलाने केसांच्या मुळांशी मालिश करावी. केसांचे चांगले कंडीशन होते आणि केस मऊ होतात.

0
Answer link
कुरळे केस सरळ करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
1. हेअर स्ट्रेटनिंग (Hair straightening):
- हेअर स्ट्रेटनर वापरून तुम्ही तुमचे केस तात्पुरते सरळ करू शकता.
- केस सरळ करण्यापूर्वी, केसांना उष्णतेपासून वाचवणारे (heat protectant) सीरम लावा.
- स्ट्रेटनर वापरताना तापमान आपल्या केसांच्या प्रकारानुसार ठेवा.
2. ब्लो ड्राय (Blow dry):
- ब्लो ड्रायर आणि ब्रशच्या मदतीने केस सरळ करता येतात.
- केस ओले असताना ब्लो ड्रायिंग सुरू करा आणि मध्यम तापमान वापरा.
3. हेअर मास्क (Hair mask):
- केसांना नियमितपणे हेअर मास्क लावल्याने ते मॉइश्चराइज राहतात आणि नैसर्गिकरित्या सरळ होण्यास मदत होते.
- उदाहरणार्थ, तुम्ही मध आणि दुधाचा मास्क वापरू शकता.
4. तेल (Oil):
- नारळ तेल, बदाम तेल किंवा जैतुण तेल (olive oil) वापरून केसांना मसाज केल्याने ते मुलायम आणि सरळ होतात.
- तेल लावल्यानंतर केसांना टॉवेलमध्ये गुंडाळा आणि एक तासाने धुवा.
5. रासायनिक उपचार (Chemical treatments):
- केमिकल ट्रीटमेंट जसे की स्मूथनिंग (smoothing) किंवा रिबॉन्डिंग (rebonding) करून तुम्ही केस कायमस्वरूपी सरळ करू शकता.
- पण हे उपचार केसांसाठी हानिकारक असू शकतात, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.
टीप: कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे उत्तम राहील.
अधिक माहितीसाठी हे उपयुक्त स्रोत पहा:
- Popxo Marathi: केस सरळ करण्याचे उपाय
- Boldsky Marathi: नैसर्गिकरित्या केस सरळ करण्यासाठी उपाय