2 उत्तरे
2
answers
कुरळे केस सरळ कसे करावेत?
2
Answer link
कुरळे केस सरळ करण्यासाठी ‘हा’ हेअर मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा!
मुलायमदार आणि चमकदार केस कोणाला नको असतात. मात्र, चांगले केस हवे असतील तर केसांची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे आहे.
कुरळे केस सरळ करण्यासाठी हा हेअर मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा!
कुरळे केस
मुंबई : मुलायमदार आणि चमकदार केस कोणाला नको असतात. मात्र, चांगले केस हवे असतील तर केसांची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी केस आठवड्यातून दोन वेळा धुणे, केसांचा मसाज करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वेळा हे सर्व करूनही केस चांगले होत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. मात्र, आपल्यापैकी बरेच लोक कुरळ्या केसांमुळे त्रस्त आहेत. (
अनेक उपचार घेऊन सुध्दा अनेकांचे सरळ केस होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस सरळ होण्यास मदत होईल. कुरळे केस सरळ करण्यासाठी कढीपत्ता अत्यंत फायदेशीर आहे. त्यासाठी आपल्याला दोन ते तीन कप पाणी घ्यावे लागेल. त्यामध्ये 10-15 कढीपत्त्याची पाने आणि मध मिक्स करा. हे पाणी गॅसवर वीस मिनिटे उकळूद्या आणि थोडे घट्ट होऊ द्या. त्यानंतर हे पाणी तेल लावल्यासारखे आपल्या केसांना लावा.
यामुळे केस सरळ होण्यास मदत होईल. हा उपाय आपण सतत आठ दिवस केला तर आपले केस सरळ होतील. कोरडे केस व्यवस्थापित अर्थात सेट करण्यासाठी तेल लावणे फार महत्वाचे आहे. याचा तुमच्या केसांवर खूप परिणाम होतो. या हंगामात आपण आपल्या कुरळे केसांवर तेल मालिश करणे आवश्यक आहे. या हंगामात केसांसाठी आपण एरंडेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता.
खोबरेल तेलाची मालिश देखील करू शकता. जर आपले केस कोरडे आणि निर्जीव असतील तर कोरफड जेलपेक्षा चांगले काही नाही. हे वापरल्याने केसांना भरपूर पोषण आणि आर्द्रता मिळेल. आपण शॅम्पूसह कोरफड जेल वापरू शकता. कोरफड जेलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतात जे केसांच्या वाढीस मदत करते. याशिवाय केस गळणे देखील कमी होते.
0
Answer link
कुरळे केस सरळ करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
टीप: कोणतेही उपाय करण्यापूर्वी, तुमच्या केसांच्या प्रकारानुसार आणि आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घ्या.
-
केसांना तेल लावा:
तेल लावल्याने केसांना पोषण मिळते आणि ते सरळ होण्यास मदत करतात.
उदाहरणार्थ: नारळ तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल. -
केसांचा योग्य प्रकारे कंगवा करा:
ओल्या केसांमध्ये रुंद दातांचा कंगवा वापरा आणि केस हळूवारपणे विंचरा.
-
हेअर मास्क:
केसांसाठी हेअर मास्क वापरा.
उदाहरणार्थ: मध आणि दही मिक्स करून केसांना लावा. -
केसांना हिट protection spray लावा:
स्ट्रेटनर वापरण्यापूर्वी केसांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी हिट प्रोटेक्शन स्प्रे लावा.
-
केसांना नियमितपणे कंडीशनर लावा:
केसांना नियमितपणे कंडीशनर लावल्याने ते मऊ आणि सरळ राहण्यास मदत करतात.
टीप: कोणतेही उपाय करण्यापूर्वी, तुमच्या केसांच्या प्रकारानुसार आणि आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घ्या.