इलेक्ट्रॉनिक्स
इलेक्ट्रॉनिक उपकरणे
मशीन
ऊर्जा
तंत्रज्ञान
इन्व्हर्टरचे कार्य कसे चालते, त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का?
3 उत्तरे
3
answers
इन्व्हर्टरचे कार्य कसे चालते, त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का?
8
Answer link
इन्व्हर्ट म्हणजे मराठीमध्ये उलटा, हेच उलटे करण्याचे काम इन्व्हर्टर ह्या उपकरणांमध्ये केले जाते म्हणजे AC voltage DC मध्ये आणि DC voltage AC मध्ये
इन्व्हर्टरचा उपयोग करून विजेच्या टंचाईचा प्रश्न आपल्या घरापुरता सोडवता येतो. इन्व्हर्टर बरोबर येणारा आकाराने सर्वात मोठा आणि जड भाग म्हणजे मोटारीत बसवतात त्याच प्रकारची पण जास्त क्षमतेची एक बॅटरी असते. अशा बॅटरीमध्ये विजेचा संचय करून ठेवणे शक्य असते, पण ती एकाच दिशेने वाहणारी (डायरेक्ट करंट) 'डीसी' या प्रकारचीच असू शकते. घरातल्या एसी विजेचे रूपांतर डीसी मध्ये करण्यासाठी इन्व्हर्टरमध्ये एक रेक्टिफायरचे सर्किट असते. ज्या वेळी बाहेरून एसी वीज पुरवठा उपलब्ध असतो तेंव्हा हा रेक्टिफायर बॅटरीला चार्ज करून तिला सुसज्ज ठेवतो. जेंव्हा वीज 'जाते' तेंव्हा आपोआप बॅटरीमधून वीजपुरवठा सुरू होतो आणि ती डिसचार्ज होत जाते. या वेळी इन्व्हर्टरमधले दुसरे सर्किट डीसी विजेचे रूपांतर एसी मध्ये करून ती वीज आपल्या घरातील ठराविक उपकरणांना पुरवते. ही सारी उपकरणे एसी विजेवर चालत असल्याकारणाने हे आवश्यक आहे. बॅटरीमधून किती वेळ आणि किती प्रमाणात वीजपुरवठा करणे शक्य आहे हे तिच्या आकारावर अवलंबून असते. बँका, हॉस्पिटल्स वगैरेमध्ये अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय (यूपीएस) ची सोय ठेवतात. ती खूप वेळ चालू शकते. घरात तेवढी जागाही नसते आणि त्याचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे अगदी अत्यावश्यक अशा मर्यादित उपयोगांसाठी
बेताच्या आकाराचा इन्व्हर्टर बसवला जातो. पण एसी मधून डीसी आणि परत एसी या परिवर्तनात बरीच वीज वाया जाते. त्यामुळे त्यात आपली सोय होत असली तरी त्याचे मूल्य द्यावेच लागते.

6
Answer link
इन्व्हर्टर हे एक आपत्कालीन वीज तयार करणारे उपकरण आहे, परंतु याच्या वीज उत्पादन वर मर्यादा आहेत. यावर जास्त शक्तीचे उपकरण चालवले जाऊ शकत नाही, घरघुती उपकरणे चालवले जाऊ शकतात,
इन्व्हर्टर हा 12 व्होल्ट किंवा 24 व्होल्ट बॅटरी वर काम करतो, जेव्हा वीज उपलब्ध असते तेंव्हा यातील बॅटरी चार्जर बॅटरी चार्ज करण्याचे काम करत असतो, जेव्हा वीज उपलब्ध नसते तेंव्हा बॅटरी पासून मिळणाऱ्या 12/24 डी सी व्होल्टेज चे रूपांतर 220 एसी व्होल्टेज मध्ये करणे हे इन्व्हर्टर चे काम आहे, यामध्ये स्टेप अप व स्टेप डाऊन प्रकारचे ट्रान्स्फरमर वापरलेले असतात, जेंव्हा वीज तयार करण्याचे काम चालू असते तेंव्हा स्टेप अप ट्रान्स्फरमर कार्य करतो, व जेंव्हा बॅटरी चार्ज चालू असते तेंव्हा स्टेप डाऊन ट्रान्स्फरमर काम करत असतो.

0
Answer link
इन्व्हर्टर (Inverter) हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे DC (Direct Current) विद्युत पुरवठ्याचे AC (Alternating Current) विद्युत पुरवठ्यात रूपांतर करते.
इन्व्हर्टरचे मुख्य भाग आणि कार्य:
- DC स्त्रोत: हा बॅटरी, सोलर पॅनेल किंवा DC विद्युत पुरवठा करणारा कोणताही स्रोत असू शकतो.
- इन्व्हर्टर सर्किट: हे मुख्य रूपांतरण करणारे सर्किट आहे. यात इलेक्ट्रॉनिक स्विचिंग उपकरणे (उदा. ट्रांझिस्टर, मॉस्फेट) आणि कंट्रोल सर्किट्स असतात.
- ट्रान्सफॉर्मर (Transformer): काही इन्व्हर्टरमध्ये AC व्होल्टेज वाढवण्यासाठी ट्रान्सफॉर्मर वापरला जातो.
- फिल्टर (Filter): AC आउटपुटला स्वच्छ करण्यासाठी फिल्टरचा वापर केला जातो, ज्यामुळेHarmonics कमी होतात.
इन्व्हर्टरचे कार्य:
- DC विद्युत पुरवठा AC मध्ये रूपांतरित करण्यासाठी, इन्व्हर्टर सर्किटमध्ये इलेक्ट्रॉनिक स्विचिंग उपकरणांचा वापर केला जातो. हे उपकरण DC करंटला ठराविक वेळेनंतर चालू आणि बंद करतात, ज्यामुळे AC वेव्हफॉर्म तयार होतो.
- स्विचिंग फ्रिक्वेन्सी (Switching frequency) AC आउटपुटची फ्रिक्वेन्सी ठरवते. उदाहरणार्थ, 50 Hz फ्रिक्वेन्सीसाठी, स्विचिंग 50 वेळा प्रति सेकंद होते.
- तयार झालेला AC वेव्हफॉर्म पूर्णपणे स्वच्छ नसू शकतो, त्यामुळे फिल्टरचा वापर करून त्याला अधिक शुद्ध केले जाते.
- जर AC व्होल्टेजची पातळी वाढवायची असेल, तर ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो.
इन्व्हर्टरचे प्रकार:
- स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर (Square Wave Inverter): हे सर्वात साधे इन्व्हर्टर असून याचा वेव्हफॉर्म स्क्वेअर असतो. हे उपकरणे चालवण्यासाठी चांगले नाही.
- मॉडिफाईड साइन वेव्ह इन्व्हर्टर (Modified Sine Wave Inverter): हे स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टरपेक्षा चांगले आहे आणि बऱ्याच उपकरणांसाठी योग्य आहे.
- प्युअर साइन वेव्ह इन्व्हर्टर (Pure Sine Wave Inverter): हे सर्वात चांगले इन्व्हर्टर आहे, जे साइन वेव्ह AC आउटपुट तयार करते. हे संवेदनशील उपकरणांसाठी उत्तम आहे.
इन्व्हर्टरचे उपयोग:
- घरे आणि ऑफिसमध्ये विद्युत उपकरणे चालवण्यासाठी.
- सोलर ऊर्जा प्रणालीमध्ये (Solar power system).
- UPS (Uninterruptible Power Supply) मध्ये.
- वाहनांमध्ये मोबाईल चार्जिंग आणि इतर उपकरणांसाठी.
इन्व्हर्टर DC विद्युत पुरवठ्याला AC मध्ये रूपांतरित करून आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरतो.