3 उत्तरे
3
answers
सेझ (SEZ) विषयी माहिती मिळेल का?
3
Answer link
याला मराठीत विशेष आर्थीक क्षेत्र असे म्हणतात.
उत्पादन क्षेत्रात अनेक कर लावल्या जात असतात. त्या करांमुळे उत्पादनाची किंमत वाढते. मुळ उत्पादन किंमत जरी कमी असली तरी ह्या वेगवेगळ्या करांना मिळून ही उत्पादन ( सी.ओ.पी.) खुप वाढते. अश्या वाढीव किंमतीच्या वस्तुंना परदेशात इतर देशांच्या वस्तुंना स्पर्धा देता येत नाही. परिणामी आपला परकिय व्यापार कमी होतो. आणि निर्यात घटते. देशाच्या आर्थीक स्वास्थ्यासाठी आपली निर्यात वाढती असली पाहिजे. ती तशीच वाढत रहावी म्हणून एका विशेष क्षेत्राची निर्मीती करण्याचे ठरविण्यात आले.
या क्षेत्राला 'विशेष आर्थीक क्षेत्र ' असे संबोधण्यात येते. या क्षेत्रातील कारखाण्यांना करातून सूट असते. जवळपास सर्वच करांतून यांना सूट असते. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो. मात्र या कारखाण्यांना ३ वर्षात १००% निर्यात उत्पादक बनण्याचे बंधन आहे.
हे क्षेत्र संकल्पनेच्या पातळीवर परकिय भूमी माणल्या जाते. म्हणजे या क्षेत्राला भारतीय कर पध्दती लागू नसेल. हे मुक्त आर्थीक क्षेत्र असेल. बंधण एवढंच की यांनी १००% निर्यातीभिमुख उत्पादन करावं व परकिय चलण मिळवावं. जर या कारखाण्यांनी उत्पादित माल भारतात विकायचं ठरवलं तर मग मात्र त्यांना परकिय माला सारखी सिमा कर आदी करांचा भरणा करूनच तो माल भारतात विकता येईल.
१९९१ पासूनच्या भारताच्या उदारीकरण, जागतीकीकरण आणि खाजगीकरण च्या धोरणानुसार खाजगी कंपनी असा सेझ निर्माण करू शकते.
दिसायला सोपा आणि आश्वासक असणारा हा प्रकार भारतीय मातीत सहज रुजायला तयार नाही असे दिसते. मुळात या सेझ साठी हजारो एकर जमीन लागते. भारतातील जमीन सुपीक आहे. आणि शेतकरी जमीनीशी भावनीक नाते ठेऊन असतो. एका सलग पट्ट्यात हजारो एकर जमीनी संपादन करणे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि याच टप्प्यात अनेक अडचणी आहेत. भारतीय पार्श्वभूमीवर त्या समस्या अनैसर्गीक आहेत असं मुळीच नाही. ह्या बाबतीत सिंगूर तसेच मान आदी गावकर्यांची आंदोलने लक्षात घ्यावी लागतील.
ह्या हजारो एकराच्या क्षेत्राला भारतीय कायदा लागू नसणार आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे भवितव्य अंधारात आहे. विरोधक म्हणताहेत की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं भवितव्य धोक्यात आहेत तर समर्थक तसं काहीही नाहीये असं म्हणताहेत.
या सेझसाठी संपादित केलेल्या जमीनी पैकी बराच मोठा भाग इतर कामांसाठी वापरण्याची परवाणगी आहे. रिलायन्स आदी कंपण्या मुंबई जवळचा भाग सेझ च्या नावावर स्वस्तात घेऊन त्यावर मनोरंजन पार्क उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा आरोप होतोच आहे.
अश्या एकनाअनेक घडामोडी या क्षेत्रात घडत आहेत. नवनवीन सुधारणा होत आहेत.

0
Answer link
सेझ (SEZ) म्हणजे काय?
सेझ (SEZ) म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र. SEZ चा अर्थ "स्पेशल इकॉनॉमिक झोन" (Special Economic Zone) असा आहे. हे एक निश्चित केलेले क्षेत्र आहे जेथे व्यवसाय आणि व्यापार करण्यासाठी विशेष आर्थिक नियम लागू केले जातात. हे क्षेत्र देशाच्या सामान्य आर्थिक नियमांनुसार कार्य करत नाही.
सेझ (SEZ) ची उद्दिष्ट्ये:
- निर्यात वाढवणे.
- गुंतवणूक आकर्षित करणे.
- रोजगार निर्मिती करणे.
- तंत्रज्ञानाचा विकास करणे.
सेझ (SEZ) चे फायदे:
- कर सवलती.
- नियामक सुलभता (Regulatory flexibility).
- चांगले पायाभूत सुविधा.
भारतातील सेझ (SEZ):
भारतात अनेक सेझ आहेत, जे विविध राज्य सरकारांनी स्थापित केले आहेत. केंद्र सरकार SEZ धोरणांना प्रोत्साहन देते.
अधिक माहितीसाठी:
- SEZ बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी, आपण वाणिज्य मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: Invest India - SEZ