संस्कृती झाडे पर्यावरण

पिंपळाचे झाड का तोडत नाही यामागे काय कारण आहे?

4 उत्तरे
4 answers

पिंपळाचे झाड का तोडत नाही यामागे काय कारण आहे?

18
     पिंपळ हे भारतीय उपखंडात उगवणार्या एका भल्या थोरल्या वृक्षाचे नाव आहे. या वृक्षाचा विस्तार फार मोठा असतो.कोठेही, कसाही, भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढणारा आपल्या परिचयाचा वृक्ष पिंपळ. हा भारतीय वृक्ष ‘मोरेसी’ म्हणजे ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. याचमुळे याला पवित्र ठरविले असावे.गौतम बुद्धांनी बिहार मधील बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान केले असत, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तेव्हापासून याला बोधिवृक्ष असे म्हणू लागले. पिंपळाला भारतीय समाजात फारच मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदु संस्कृतीत,ज्या वृक्षांना 'तोडू नये' असा दंडक आहे, त्यापैकी हा एक.
उत्तर लिहिले · 25/8/2017
कर्म · 210095
5
मित्रांनो, अमुक एक झाड तोडावे किंवा तमुक एक झाड तोडू नये... . असा काही नियम नाहिये. झाड कोणतेही असो ते तोडू नयेच. त्याला भरपूर कारणे आहेत.
      झाडांमुळे आपले कधीच नुकसान होत नाही. उलट फायदाच होतो. झाडाची प्रत्येक गोष्ट आपल्या फायद्याची असते. त्याची फळे, पाने, फुले, त्याच्या वाळलेल्या फांद्यांची लाकडे सगळेच आपल्या उपयोगी पडते. उन्हातान्हातुन आलेल्या माणसांना त्याच्याच थंडगार सावलीचा आधार असतो.    आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्या पासून आपल्याला मिळणारा प्राणवायू. ज्याच्या शिवाय आपण जगूच शकत नाही. आणि विशेष म्हणजे आपण आपल्या शरीराबाहेर सोडलेला कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन ते आपल्याला आॅक्सीजन देते. म्हणजेच ते आपल्यावर एक प्रकाराचे उपकारच करत असते. मग अस असताना आपण त्याच्याशी एवढे कृतघ्न पणे का वागावे.
      आणि याच कारणांमुळेच, कोणीही सरसकट वृक्ष तोड करू नये म्हणून काही सुज्ञ लोकांनी त्यात देवाचा अंश असल्याच लोकाना सांगितले असावे. आणि झाड तोडणे हे कायद्याने ही गुन्हा आहे हे आपल्याला माहीत असेलच.
      तरीपण काही वेळेला  झाड तोडण्याची गरज भासते. म्हणजे त्या जागेवर काही विधायक कामे करायची असतील तर... उदा इस्पितळ, शाळा इत्यादी साठी ती जागा नियोजित असेल तर, त्यापासून कोणत्याही प्रकारची जिवितहानी होणार असेल तर किंवा ते झाड विषारी असेल तर.
      पण त्यासाठी तुमच्याकडे अधिकृत कारण हव. जर तुमच्याकडे अस काही सबळ कारण असेल तर तुमच्या त्या भागातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका अशी जी काही सरकारी यंत्रणा असेल त्याची तुम्ही मदत घेऊ शकता. त्याठिकाणी सबळ कारण देऊन सर्वसंमतीने तुम्ही अर्ज केला आणि त्यांना तुम्ही कारण पटवून देऊ शकलात तर ते झाड तुम्ही तोडू  शकता.
      तुम्ही पाहिलेच असेल बऱ्याच ठिकाणी जागा बळकावण्याच्या उद्देशाने अश्या प्रकाराची देवाशी संबंधित झाडे लावली जातात. आणि लोकांच्या भोळ्या श्रद्धेचा फायदा घेऊन काही महाभाग आपला  धंदा थाटतात.
        म्हणुन याला आवर घालण्यासाठी तुम्ही कायद्याची आणि सरकारी यंत्रणांची मदत देऊन समाजोपयोगी कामे करण्यासाठी हातभार लावू शकता.
उत्तर लिहिले · 21/12/2017
कर्म · 21970
0
पिंपळाचे झाड का तोडत नाही यामागे अनेक कारणं आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • धार्मिक महत्त्व: पिंपळाच्या झाडात देव वास करतात, अशी लोकांची धारणा आहे. विशेषतः भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा वास पिंपळात असतो, असे मानले जाते. त्यामुळे या झाडाला तोडणे धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानले जाते.

  • पर्यावरणात्मक महत्त्व: पिंपळाचे झाड रात्रंदिवस ऑक्सिजन उत्सर्जित करते. त्यामुळे ते पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे झाड हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते.

  • औषधी गुणधर्म: पिंपळाच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्याच्या पानांचा, फळांचा आणि सालीचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

  • सांस्कृतिक महत्त्व: पिंपळाच्या झाडाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. अनेक सण आणि उत्सवांमध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते.

  • आयुर्वेदिक महत्त्व: पिंपळाच्या झाडाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

प्लास्टिक कचऱ्याची राख झाडांच्या आळ्यात खत म्हणून टाकली तर चालेल का?
एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
पयाावरणीय समस्या स्पष्ट करा.?
भारतात कोणकोणते अभयारण्य आहेत?
हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते, चूक की बरोबर?
कोणते उत्पादन वनातून मिळते?
वायु हमारे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे?