5 उत्तरे
5
answers
मेण कशापासून बनते?
10
Answer link
📙 *मेण व मेणबत्ती* 📙
***********************
मेणाचा वापर पुरातन काळापासून ज्ञात आहे. विविध औषधी मलमे, लाकडाला पाॅलिश करणे, मेणबत्त्या तयार करणे यांसाठी मेण वापरले जाते. मेणाचा शेक देऊन सांधेदुखी बरे करणे हाही अनेक वर्षे वापरला जाणारा उपचार आहे. मेणाची उपलब्धी हा आता फारसा कठीण प्रश्न राहिलेला नाही; कारण खनिज तेलापासून पॅराफीन वॅक्स हा मेणाचा प्रकार भरपूर प्रमाणावर उपलब्ध आहे. पूर्वीच्या काळी मुख्यत: मधमाशांच्या पोळ्यातून मिळवलेले मेणच उपलब्ध असे. तेव्हा त्याची किंमत जास्त व उपलब्धी अगदी कमी प्रमाणात होती.
मधमाशा त्यांच्या पोळ्यात मध भरून झाला की, त्याचे तोंड अंगच्या मेणाने बंद करून टाकतात. माणूस प्रथम मध काढून घेतो व नंतर पोळ्यातील मेण काढले जाते. घट्टसर पण मऊ गोळ्यासारखे हे मेण आजही औषधी उपयोगाला पसंत केले जाते.
चरबीपासुन मेण बनवले जाते, पण त्याला दुर्गंधी येते; त्यामुळे आता हा प्रकार वापरणे खूपच कमी झाले आहे. सध्या वापरात असलेला मेणाचा प्रकार म्हणजे पॅराफीनपासून काढलेले मेण. हे मेण सहसा पन्नास डिग्री सेंटीग्रेड तापमानाला वितळते. वितळल्यावर त्यामध्ये अनेक रंगही मिसळता येतात. साच्यांमध्ये घालून पाहिजे ते आकारही देता येतात.
मेणाचे पुतळे व त्यांची संग्रहालये हा जगाचा आवडीचा विषय आहे. हुबेहूब दिसणारी माणसे निर्माण केलेले, म्हणजे मेणाचे पुतळे असलेले मादाम तुसा यांचे संग्रहालय तर जगप्रसिद्धच आहे. याच विषयावरील 'हाऊस ऑफ वॅक्स' हा सिनेमाही जगप्रसिद्ध झाला होता. मेणाची फुले शोभेसाठी बनवुन मांडण्याची आपल्याकडेही प्रथा आढळते.
मेणाचा उपयोगी लाकूड, लेदर याला पाॅलिश करताना, त्यातील भेगा भरताना सरसकट केला जातो. यामुळे या वस्तूंचे आयुष्य वाढते. चपला, बूट यांना करावयाच्या पाॅलिशमध्येही मेणाचा अंश असतोच.
प्लास्टिक आवरणांचे युग सुरू होण्यापूर्वी तेलकट खाद्यपदार्थ साठवताना अगदी कागदी आवरणावर पातळ मेणाचा थर देण्याची पद्धत वापरली जाई. यामुळे पदार्थ कुरकुरीत राहण्याला मदत होत असे. सध्या ही पद्धत मागे पडली आहे.
याचप्रमाणे एखाद्या डब्यातील, बाटलीतील पदार्थ हवाबंद राखण्यासाठी आजही मेणाने तोंड बंद करण्याची पद्धत सरसकट वापरली जाते. मुंग्यांपासून प्रतिबंध करतानाही मेणाचा थर देणे सोपे राहते. सरसकट प्रत्येक ठिकाणी वापरल्या जाण्याला चैनला मेणाचा हलका थर देण्याची पद्धत आहे. त्यामुळे चैनच्या दोन दात्यांमधील हालचाल सहजपणे होते. चैनचे आयुष्य वाढते.
सांधेदुखीसाठी फिजिओथेरेपी व उपचार म्हणून वॅक्स बाथ आज जगभर वापरला जातो. वितळलेल्या मेणाचा लेप देऊन किंवा चक्क त्यामध्येच अवयव बुडवून मिळणारी उष्णता अनेक आजारांतुन बरे व्हायला व हालचाली सुलभ व्हायला मदत करते. मात्र हे उपचार देखरेखीखाली करणे आवश्यक असते.
मानवी शरीरातही कातडीतून स्रवणारे स्त्राव, कानाच्या अंतर्भागातील स्राव यांमधून मेणाचा अंश जमत असतो. त्याचे प्रमाण अत्यल्प असले तरी ते मेणच असते. याचा थर आपल्या शरीराला बाह्य धूळ व हवा यांपासून संरक्षण देतो. उंचावर जाणारे गिर्यारोहक व ध्रुवीय प्रदेशात जाणारे प्रवासी यांना आंघोळ न करण्याची सूचना नेहमीच दिली जाते. हा थर निघून जाऊन मिळणारे संरक्षण नष्ट होऊ नये यासाठीची ही सूचना असते.
मेणबत्त्या विविध आकारांच्या असतात. पुरुषभर उंचीची व सहा इंच परिघाची मेणबत्तीही पाहायला मिळते. मेणबत्तीच्या मिळण्यातील वितळलेल्या हायड्रोकार्बन्सचा पुरवठा वातीला होत असतो. त्यामुळे वात संथ जळते. पिवळसर ज्योत मंद प्रकाश देते. मेणबत्तीच्या शांत उजेडामध्ये एखाद्या रात्री कधी जेवला आहात काय ? तो एक वेगळाच अनुभव असतो. चर्चमधील मेणबत्त्यांचा प्रकाश झुंबरांमध्ये लावलेल्या मेणबत्त्यांचा सर्वत्र पसरलेला उजेड हा कधीपासून वापरात आला आहे कुणास ठाऊक. पण इजिप्तमधील ममीजबरोबर सुद्धा मेणबत्त्या सापडतात.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

4
Answer link
मेणांचे मुख्य वर्ग दोन आहेत : (१) नैसर्गिक आणि (२) संश्लेषित (कृत्रिम रीतीने बनविलेली) व रूपांतरित, नैसर्गिक मेणे वनस्पतिज, प्राणिज व खनिज या तीन प्रकारची आहेत.
वनस्पतिज मेणे झाडांची पाने, गवताची पाती, देठ, फळे, बीजे व मुळे यांवर असणाऱ्या थरांच्या रूपात असतात. कोरड्या व रेताड जमिनीत अथवा दमट व उष्ण हवेत उगवणारी झाडेझुडपे व गवत यांच्यातील पाण्याचे प्रमाण झाडाच्या वाढीच्या दृष्टीने कायम राखणे महत्त्वाचे असते. मेणाच्या थराच्या योगाने बाष्पीभवनाचे नियंत्रण होऊन पाण्याचे प्रमाण कायम ठेवण्यास मदत होते.
प्राणिज मेणे जलचर व स्थलचर प्राण्यांच्या शरीरांचे विविध भाग आणि केसावरील पातळ थर, तसेच कीटकांनी बांधलेली कोठ्यायुक्त घरे आणि बॅसिलस या प्रजातीतील सूक्ष्मजंतू यांमध्ये असतात.
खनिज तेले, दगडी कोळसा व तत्सम खनिजे यांमध्ये मेणे असतात. कच्च्या मालापासून मेणे विविध प्रक्रियांनी वेगळी काढली जातात.
संघटन : मेणे अनेक संयुगांची मिश्रणे असतात. वनस्पतिज व प्राणिज मेणांमध्ये मुख्यत्वेकरून C16ते C34 या मर्यादेतील कार्बन अणूंची सम संख्या असलेली ⇨ वसाम्ले व तशाच प्रकारची वसा अल्कोहॉले यांपासून बनलेली एस्टरे असून त्याशिवाय तेवढेच कार्बन अणू असलेली आल्डिहाइडे व कीटोने आणि काही प्रमाणात वरील मर्यादेतील पण विषम अणुसंख्या असलेली हायड्रोकार्बने, स्टेरॉले व रेझिने या वर्गांची संयुगे आणि मुक्त स्थितीत असलेली वसाम्ले व वसा अल्कोहॉले वेगवेगळ्या प्रमाणांत असतात. पॅराफीन मेण व काही इतर खनिजांमध्ये मुख्यतः हायड्रोकार्बने असतात.
मेणांचे गुणधर्म त्यांमध्ये असलेल्या संयुगांचे रासायनिक वर्ग व त्यांची प्रमाणे यांवर अवलंबून असतात. ही ठरविण्यासाठी स्तंभवर्णलेखन [⟶वर्णलेखन] पद्धतीने घटक सुलभतेने वेगळे करता येतात. त्यानंतर एस्टर वर्गाच्या संयुगांचे क्षारीय विच्छेदन [दाहक सोड्याचा जलीय विद्राव वापरून संयुगांचे विभाग पाडण्याची क्रिया; ⟶जलीय विच्छेदन] करून त्यांमधील अम्ले व अल्कोहॉले यांची तपासणी करून त्यांमधील कार्बन अणुसंख्या निश्चित करतात. प्रत्येक रासायनिक वर्गातील घटकांची संख्या व प्रमाणे वायुवर्णलेखन [⟶ वर्णलेखन] या तंत्राच्या साहाय्याने ठरविता येतात.
भौतिक गुणधर्म : मेणे पाण्यात विरघळत नाहीत. नेहमीच्या तापमानास ती कार्बनी विद्रावकातही फारशी विरघळत नाहीत. द्रवांकांच्या आसपास ती बेंझीन, टोल्यूइन, झायलीन, पेट्रोलियम नॅप्था, ट्रायक्लोरोएथिलीन इ. विद्रावकांत विरघळतात.
हवेच्या तापमानापेक्षा उच्च तापमानास मेण विद्रावकात विरघळून केलेल्या विद्रावातील काही भाग मेण विद्राव हवेच्या तापमानास निक्षेपित होतो (न विरघळलेल्या स्वरूपात साचतो). मेण विद्रावक यांची परस्पर प्रमाणे कायम ठेवून मेण नमुन्यांच्या निक्षेप प्रमाणांची तुलना शुद्ध मेणाच्या निक्षेप प्रमाणाशी करता येते व त्यावरून नमुन्याची शुद्धाशुद्धता कळू शकते.
प्राप्ती : नैसर्गिक पदार्थापासून मेणे मिळविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात.
(१) काही वनस्पतिज मेणे मिळविण्यासाठी मेण असलेला वनस्पतीचा भाग वाळवून झोडपतात व सुटे होऊन खाली पडलेले मेण गोळा करून व दळून वितळवितात आणि गाळून थंड करतात. उदा., कार्नोबा मेण.
(२) काही मेणांसाठी मेण ज्यामधून काढावयाचे असेल तो भाग वेगळा करून पाण्याबरोबर उकळतात. मेण वितळते व त्याचा थर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागतो. तो थंड करून वेगळा करतात. ज्या मेणाचे पाण्याबरोबर पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवापासून दृढ मिश्रण) बनते त्यासाठी ही कृती उपयोगी पडत नाही. उदा., कँडेलिल्ला मेण.
(३) मेणयुक्त भाग वाळवून तो ७०º से. ते १५०ºसे. या तापमान मर्यादेत उकळबिंदू असणाऱ्या योग्य अशा कार्बनी विद्रावकात (बेंझीन, टोल्यूइन, पेट्रोलियम नॅप्था इ.) भिजत ठेवतात व योग्य कालावधीनंतर विद्राव काढून घेतात. त्यानंतर ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व ती थंड करून मिश्रणातील घटक अलग करण्याच्या क्रियेने) विद्रावातील विद्रावक काढून टाकला म्हणजे मेण उरते. उदा., घायपात मेण.
(४) खनिज मेण मिळविण्यासाठी मेण असलेल्या खनिज तेल भागाचे (अंशाचे) पुनः भागशः ऊर्ध्वपातन करतात. ऊर्ध्वपातित न झालेल्या भागाचे अंशतः स्फटिकीकरण केले म्हणजे मेण मिळते.
कच्च्या मालापासून वरीलप्रमाणे मिळविलेली मेणे प्रथम अशुद्ध असतात. त्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यावर ऊर्ध्वपातन, स्वेदन, अंशतः वितळणे, शोषण इ. भौतिक क्रिया आणि हवेने व पेरॉक्साइडांच्या योगाने ऑक्सिडीकरण, हायड्रोजनीकरण, जलीय विच्छेदन, एस्टरीकरण वगैरे रासायनिक प्रक्रिया करतात.

0
Answer link
मेण हे मुख्यतः पेट्रोलियमपासून बनवले जाते.
मेण बनवण्याची प्रक्रिया:
-
पेट्रोलियमचे ऊर्ध्वपातन: पेट्रोलियम शुद्ध करताना, त्याचे विविध घटक वेगळे केले जातात. त्यापैकी एक घटक म्हणजे मेण.
-
विलायक নিষ্কাশন (सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्शन): मेणाला विलायक वापरून वेगळे काढले जाते.
-
हायड्रोक्रॅकिंग/ डिwaxing: ह्या प्रक्रियेमध्ये मेणाची गुणवत्ता सुधारली जाते.
-
गाळण्याची प्रक्रिया: शेवटी, मेणाला शुद्ध करण्यासाठी गाळले जाते.
मेण नैसर्गिकरित्या मधमाशांच्या पोळ्यांमध्ये देखील आढळते. विकिपीडिया