क्रीडा खो-खो

खो-खो खेळ कसा खेळला जातो?

2 उत्तरे
2 answers

खो-खो खेळ कसा खेळला जातो?

0
खोखो खेळाचे नियम

खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो. दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो. थोडक्यात, संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो.

खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरु झाल्यावर पाठलाग करण्याऱ्या संघाचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडुंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणाऱ्या खेळाडुवर खालील बंधने असतात.

एकदा एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो आपली दिशा बदलू शकत नाही (खांबाला स्पर्श करून तो आपली दिशा बदलू शकतो)

तो दोन खांबाना जोडणारी रेषा ओलांडू शकत नाही पळ्ण्याची दिशा बदलण्यासाठी पकडणारा खेळाडू इतर खेळाडुंना खो देऊ शकतो. खो देण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते.

पळणारा खेळाडू मैदानाच्या ज्या बाजूस असेल, त्या बाजूस tond करून बसलेल्या खेळाडुंनाच तो खो देउ शकतो

खो देताना पळणारा खेळाडू खो दिल्या जाणाऱ्या खेळाडुच्या पाठीवर थाप मारुन 'खो' असा आवाज करतो.

खो घेतलेला खेळाडू मग, त्याचे तोंड असलेल्या बाजूस उजव्या किंवा डाव्या दिशेस (पकडण्यासाठी) पळण्यास सुरुवात करतो.

ज्याने खो दिलेला आहे तो खेळाडु, खो घेतलेल्या खेळाडुची जागा घेतो.

वरील प्रकारे खो-खोची साखळी सुरु रहाते.

बचाव करणाऱ्या खेळाडुवर मैदानात पळताना कोणतेही निर्बंध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू खालील प्रकारांनी बाद होऊ शकतो

पकडणाऱ्या खेळाडुने (बचाव करणाऱ्या खेळाडुस) तळ्हाताने स्पर्श केल्यावर

बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास

बचाव करणारा खेळाडुने मैदानात उशीरा प्रवेश केल्यास

बचाव करणाऱ्या संघाचे तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करतात. नवीन खेळाडुंनी पुढचा खो देण्याआधी मैदानात उतरणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना बाद धरण्यात येते.

बाद केलेल्या प्रत्येक खेळाडुच्या बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो. पहिल्या भागाच्या अखेरीस प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात. ज्यासंघाचे गुण जास्त, त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते. दुसऱ्या भागाच्या अखेरीस, जो संघ आघाडी मिळवितो तो संघ त्या आघाडीने विरुद्ध संघावर मात करतो.

उत्तर लिहिले · 19/8/2017
कर्म · 13530
0

खो-खो हा भारतीय मैदानी खेळ आहे. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात, परंतु खेळताना एका वेळेस फक्त ९ खेळाडू मैदानात उतरतात.

मैदान:

  • खो-खो चे मैदान आयताकृती असते.
  • मैदानाच्या मध्यभागी एक रेषा असते, ज्याला मध्य रेषा म्हणतात.
  • या रेषेच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर ८ खांब (poles) रोवलेले असतात.

खेळण्याची पद्धत:

  1. दोन संघापैकी एक संघ पाठलाग करतो आणि दुसरा संघ बचाव करतो.
  2. पाठलाग करणाऱ्या संघाचे खेळाडू मैदानात बसलेले असतात, ते एका ओळीत सम- विषम दिशेने तोंड करून बसतात.
  3. बचाव करणाऱ्या संघाचे ३ खेळाडू मैदानात उतरतात आणि ते खांबांचा वापर करून पळतात.
  4. पाठलाग करणारा खेळाडू (ॲक्टिव्ह चेजर) बचाव करणाऱ्या खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.
  5. ॲक्टिव्ह चेजर bases वर बसलेल्या आपल्या सहकाऱ्याला 'खो' देतो, त्यानंतर तो सहकारी उठून पाठलाग करतो.
  6. जो संघ कमी वेळेत जास्त खेळाडूंना बाद करतो, तो संघ विजयी होतो.

नियम:

  • ॲक्टिव्ह चेजर फाऊल करू शकत नाही.
  • बचाव करणाऱ्या खेळाडूंना तो फक्त स्पर्श करू शकतो, पकडू शकत नाही.
  • खो देताना 'खो' शब्द स्पष्टपणे उच्चारणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

खो-खो चा डाम किती उंचीचा असावा?
खो-खो खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला?
भारतात खो-खो ची सुरुवात कुठे झाली?
इ.स. मध्ये खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली?
खो-खो खेळाबद्दल माहिती मिळेल का?
खो-खो खेळ विषयी माहिती?