2 उत्तरे
2 answers

औरंगाबादचा इतिहास काय आहे?

6
औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे प्राचीन गाव वसलेले होते. काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचानिजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले असा दावा केला जातो. परंतु हे गाव अस्तित्त्वात होते फक्त त्याचे नामकरण केले गेले. मलिक अंबरने ह्या शहराचे नाव फतेहपूर ठेवले. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी / फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्या नंतर १६८१ मध्ये औरंगजेब मुघल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणार्‍या खुलताबाद या छोट्याश्या गावात औरंगजेबाची कबर आहे. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा पुढे हैदराबादच्या निझाम राजवटीचा भाग म्हणून राहिले. इ.स. १८८९ मध्ये औरंगाबादेत पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅलि रेल्वेची सुरवात झाल्यानंतर इ. स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनींग कारखाने सुरु झाले. औरंगाबाद हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे.औरंगाबाद शहरात ५२ दरवाजे प्रसिद्ध आहेत .
उत्तर लिहिले · 9/8/2017
कर्म · 80350
0

औरंगाबादचा इतिहास:

औरंगाबाद हे शहर महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागात स्थित आहे. हे शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे.

प्राचीन इतिहास:

  • औरंगाबाद शहराचा प्राचीन इतिहास सातवाहन राजवंशापर्यंत जातो. त्या काळात या शहराचे नाव 'राजतडag' होते.
  • त्यानंतर हे शहर विविध राजवटींच्या अधीन आले, ज्यात वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचा समावेश होतो.

मध्ययुगीन इतिहास:

  • 14 व्या शतकात, दिल्ली सल्तनतच्या मुहम्मद बिन तुघलकने दौलताबादला आपली राजधानी बनवले, जे औरंगाबादजवळ आहे.
  • 17 व्या शतकात, मुघल सम्राट औरंगजेबने या शहराला आपली राजधानी बनवले आणि त्याचे नाव औरंगाबाद ठेवले.
  • औरंगजेबाने येथे अनेक वर्षे राज्य केले आणि त्याच्या काळात शहरात अनेक महत्त्वपूर्ण इमारती बांधल्या गेल्या, ज्यात बीबी का मकबरा आणि पंचक्की यांचा समावेश होतो.

आधुनिक इतिहास:

  • 18 व्या शतकात, हे शहर हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात आले.
  • 1948 मध्ये, भारताने हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण केल्यानंतर औरंगाबाद महाराष्ट्र राज्याचा भाग बनले.

आज, औरंगाबाद एक महत्त्वाचे पर्यटन आणि औद्योगिक केंद्र आहे. येथे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत, जे पर्यटकांना आकर्षित करतात.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5240

Related Questions

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहराच्या इतिहासाबद्दल माहिती द्या?
इचलकरंजीच्या इतिहासाबद्दल माहिती मिळेल का?