पशुपालन मांजर पशु पाळीव प्राण्यांची काळजी

मांजर घरात घाण करते, त्यावर काही उपाय आहे का?

3 उत्तरे
3 answers

मांजर घरात घाण करते, त्यावर काही उपाय आहे का?

3
मांजर खरे तर वरकरणी तरी अतिशय स्वच्छ प्राणी, मात्र जर त्याची वाढ आईविना होत असेल, तर त्यास नेमक्या सवई लावणे महाकर्मकठीण, व त्याचे दृष्टीने उपयुक्त जागी जसे की टेबल्/कॉट/सोफा इत्यादी खाली मलमूत्रविसर्जन करणे हे पुन्हा त्याचे दृष्टीने स्वच्छ असले तरी आपल्या दृष्टीने अतिशय अवघड होते. मांजराच्या व एकूणच प्राण्यांच्या मलमूत्राचा वास भयानक तीव्र सहन होण्यापलिकडचा असतो, व त्याने कुठे शीशू केली आहे ते अक्षरषःहुंगत फिरत शोधुन काढणे व नन्तर स्वच्छ करणे हे महादिव्य असते.शिवाय घरात लहान मूल असेल, तर आधीपासून पाळलेले सवईचे जनावरसोडून अन्य कोणताही प्राणी नव्याने घरात आणू नये/येऊही देऊ नये, असे निदान माझे तरी मत आहे.बाळाचे अंगाकपड्यास तेल/दुधातुपाचा वास रहात असतोव प्राण्यातील पिल्लास त्याचाफरक कळला नाही तर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो.हा भाग झाला पाळीव प्राण्याबाबत, मात्र वरील कारणानेच, मुंगी/डोंगळे/झुरळेइत्यादीसहीत चिचुन्द्र्या/घुशी/उंदिर्/पक्षी इत्यादी अनेक बाबीपासून बाळास जपावे लागते.तेव्हा जे काय करायचे ते विचारपूर्वक, व बाळाचे संगतीत चौविस तास हजर रहाणारी व्यक्ति असेल तरच करा. मला प्राणि अतिशय आवडतात, तरीही वरील मजकुर लिहीला
उत्तर लिहिले · 8/8/2017
कर्म · 210095
0
मांजरला घराबाहेर हाकल व कुत्रा पाळा. कुत्रा नाही चावणार असं.
उत्तर लिहिले · 7/8/2017
कर्म · 16700
0
मांजर घरात घाण करत असेल, तर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

1. डॉक्टरांचा सल्ला:

  • पशूवैद्यकाकडून (Veterinarian) शारीरिक तपासणी करून घ्या. काहीवेळा शारीरिक समस्यांमुळे मांजर घरात घाण करू शकते.
  • 2. लिटर बॉक्स (Litter Box) व्यवस्थापन:

  • box ची संख्या: घरात मांजरांची संख्या जास्त असल्यास, पुरेसे लिटर बॉक्स ठेवा.
  • स्थान: लिटर बॉक्स शांत आणि सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी ठेवा.
  • स्वच्छता: लिटर बॉक्स नियमितपणे स्वच्छ करा. दिवसातून किमान एकदा तरी घाण काढा.
  • प्रकार: मांजरीला आवडेल अशा प्रकारचा लिटर बॉक्स आणि लिटर मटेरियल (मिट्टी) वापरा.
  • 3. ताण कमी करा:

  • मांजर ताणात आहे का ते पहा. घरात नवीन सदस्य आल्याने किंवा इतर बदलांमुळे मांजर ताणात येऊ शकते.
  • मांजरला खेळायला द्या आणि तिची आवडती खेळणी द्या.
  • 4. फिडिंग आणि पाण्याची जागा:

  • लिटर बॉक्स आणि मांजरीचे अन्न आणि पाणी देण्याची जागा दूर ठेवा.
  • 5. साफसफाई:

  • जर मांजराने घरात घाण केली, तर ती जागा त्वरित स्वच्छ करा आणि वास घालवा. enzymatic cleaner वापरा, ज्यामुळे वास पूर्णपणे निघून जाईल आणि मांजर पुन्हा तिथे घाण करणार नाही.
  • 6. सकारात्मक दृष्टिकोन:

  • मांजरला शिक्षा देऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि तिला प्रोत्साहन द्या.
  • हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मांजरीला घरात घाण करण्यापासून रोखू शकता.

    उत्तर लिहिले · 16/3/2025
    कर्म · 5400

    Related Questions

    आमचा कुत्रा गेल्या काही दिवसांपासून खूपच शांत आहे, पूर्वी एवढा ऍक्टिव्ह नाहीये? काय करावे?
    माझ्या कुत्र्याला मार लागला आहे, त्याला जखम झाली आहे तर त्याच्या जखमेत अळ्या नाही पडण्यासाठी काय करू?
    मांजर घरात घाण करते, त्यावर काही उपाय कोणाकडे आहे का?