5 उत्तरे
5
answers
मांजर घरात घाण करते, त्यावर काही उपाय कोणाकडे आहे का?
6
Answer link
मांजर खरे तर वरकरणी तरी अतिशय स्वच्छ प्राणी, मात्र जर त्याची वाढ आईविना होत असेल, तर त्यास नेमक्या सवई लावणे महाकर्मकठीण, व त्याचे दृष्टीने उपयुक्त जागी जसे की टेबल्/कॉट/सोफा इत्यादी खाली मलमूत्रविसर्जन करणे हे पुन्हा त्याचे दृष्टीने स्वच्छ असले तरी आपल्या दृष्टीने अतिशय अवघड होते. मांजराच्या व एकूणच प्राण्यांच्या मलमूत्राचा वास भयानक तीव्र सहन होण्यापलिकडचा असतो, व त्याने कुठे शीशू केली आहे ते अक्षरषःहुंगत फिरत शोधुन काढणे व नन्तर स्वच्छ करणे हे महादिव्य असते.शिवाय घरात लहान मूल असेल, तर आधीपासून पाळलेले सवईचे जनावरसोडून अन्य कोणताही प्राणी नव्याने घरात आणू नये/येऊही देऊ नये, असे निदान माझे तरी मत आहे.बाळाचे अंगाकपड्यास तेल/दुधातुपाचा वास रहात असतोव प्राण्यातील पिल्लास त्याचाफरक कळला नाही तर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो.हा भाग झाला पाळीव प्राण्याबाबत, मात्र वरील कारणानेच, मुंगी/डोंगळे/झुरळेइत्यादीसहीत चिचुन्द्र्या/घुशी/उंदिर्/पक्षी इत्यादी अनेक बाबीपासून बाळास जपावे लागते.तेव्हा जे काय करायचे ते विचारपूर्वक, व बाळाचे संगतीत चौविस तास हजर रहाणारी व्यक्ति असेल तरच करा. मला प्राणि अतिशय आवडतात, तरीही वरील मजकुर लिहीला
1
Answer link
Training द्या तिला, प्राण्याला शिकविल्या नंतर त्यांच्यात नक्कीच बदल घडतो. त्या साठी काही युक्त्या वापरून पहा.
0
Answer link
मांजर घरात घाण करत असेल, तर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
१. डॉक्टरांचा सल्ला:
- पशूवैद्यकाकडून (Veterinarian) शारीरिक तपासणी करून घ्या. काहीवेळा शारीरिक समस्यांमुळे देखील मांजर घरात घाण करू शकते.
२. लिटर बॉक्सची जागा बदला:
- लिटर बॉक्स शांत आणि सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवा.
- अन्न आणि पाण्याच्या भांड्याजवळ लिटर बॉक्स ठेवणे टाळा.
३. लिटर बॉक्स स्वच्छ ठेवा:
- लिटर बॉक्स नियमितपणे स्वच्छ करा. दिवसातून एकदा तरी कचरा काढा आणि आठवड्यातून एकदा पूर्णपणे स्वच्छ करा.
४. योग्य लिटर वापरा:
- मांजरीला आवडेल अशा प्रकारचे लिटर वापरा. वेगवेगळ्या प्रकारच्या लिटरचा वापर करून पहा.
५. मांजरीला प्रशिक्षण द्या:
- मांजरीला लिटर बॉक्स वापरण्याचे प्रशिक्षण द्या.
- जेव्हा मांजर योग्य ठिकाणी शौच करते, तेव्हा तिची प्रशंसा करा आणि तिला बक्षीस द्या.
६. स्प्रेचा वापर:
- मांजर ज्या ठिकाणी घाण करते, तिथे मांजरांना दूर ठेवणाऱ्या स्प्रेचा (Cat repellent spray) वापर करा.
७. सकारात्मक दृष्टिकोन:
- मांजरीला ओरडू नका किंवा तिला मारू नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि तिला समजावून सांगा.
८. कारण शोधा:
- मांजर घरात घाण का करत आहे याचे कारण शोधा. काहीवेळा तणाव, चिंता किंवा भीतीमुळे देखील मांजर असे करू शकते.
९. दुसरा लिटर बॉक्स:
- घरात एकापेक्षा जास्त मांजरी असल्यास, प्रत्येक मांजरीसाठी एक लिटर बॉक्स असावा.
१०. व्यावसायिक मदत:
- जर समस्या गंभीर असेल, तर प्राणि-वर्तनतज्ज्ञाची (Animal behaviorist) मदत घ्या.