नोकरी भारतीय सेना सैन्य भरती

NDA साठी तयारी कशी करावी आणि पास कसे व्हावे?

2 उत्तरे
2 answers

NDA साठी तयारी कशी करावी आणि पास कसे व्हावे?

3
राज्य सरकारच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतर्फे एन. डी. ए.च्या लेखी परीक्षेची तसेच मुलाखतीची तयारी करून घेण्यात येते. या संस्थेच्या प्रवेशपरीक्षेची माहिती-महाराष्ट्रातील तरुणांना राष्ट्रीयसंरक्षण प्रबोधिनीमध्ये म्हणजे नॅशनल डिफेन्स अॅकॅडेमी (एन.डी.ए.) मध्ये मोठय़ा संख्येने प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने १९७७ साली सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (एस.पी.आय.) स्थापना केली. या संस्थेमधून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक युवकांनी एन.डी.ए.मध्ये प्रवेश मिळवला आणि ते लष्करातील तिन्ही दलांमध्ये अधिकारी म्हणून वेगवेगळ्या हुद्दय़ांवर कार्यरत झाले.या संस्थेत प्रवेश मिळविणाऱ्या तरुणांची एन.डी.ए.च्या लेखी परीक्षेची तयारी तसेच सर्वागीण विकासाकडे लक्ष पुरवतानाच एस.एस.बी. मुलाखतीची तयारी करून घेण्यात येते.या संस्थेत विद्यार्थ्यांसाठी निवासाची तसेच जेवण्याची उत्तम सुविधा असून दररोज पी.टी. तसेच क्रीडाप्रकार घेतले जातात. प्रवेशाबरोबर अकरावी – बारावीसाठी सी.बी.एस.ई. धर्तीवर चालणाऱ्या ‘स्टेपिंग स्टोन’ याकनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यात येतो. या ठिकाणी प्रशिक्षणार्थीची अकरावी-बारावी शास्त्र विद्याशाखेची तयारी करून घेण्यात येते. अकरावी-बारावीच्या उपक्रमांव्यतिरिक्त असलेले इतर सर्व उपक्रम एस.पी.आय.च्या आवारात घेतले जातात. या संस्थेत केवळ४० ते ५० इच्छुक तरुणांना प्रवेश देण्यात येतो. संस्थेच्या यशाच्या देदिप्यमान परंपरेमुळे या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी चांगलीच चढाओढ आहे.प्रवेश पात्रता : राज्यातील रहिवासीअसलेली तरुण मुले या संस्थेत प्रवेशघेण्यासाठी पात्र आहेत. प्रवेश देतेवेळी साडेचौदा ते १६ वर्षे वय असलेले तरुण- जे दहावीची परीक्षा यंदा देत आहेत किंवा उत्तीर्ण झालेले आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत. दहावी बोर्डाच्या परीक्षेत त्यांना ६० टक्के गुणांहून अधिक गुणमिळणे आवश्यक असते. तसेच सातवी, आठवीआणि नववीमध्येदेखील ६० टक्क्य़ांहूनअधिक गुण मिळणे आवश्यक ठरते.प्रवेश अर्ज : प्रवेश अर्ज तसेच संस्थेचे माहितीपत्रक मागविण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्रचा रु. ४००/- (रुपये चारशेफक्त)चा डिमांड ड्राफ्ट ‘सव्‌र्हिसेस प्रेपरेटरी इन्स्टिटय़ूट, औरंगाबाद’च्या नावे काढावा व त्यांच्या नावे सिडको, एन-१२ सेक्टर, औरंगाबाद-४३१००३येथे पाठवावा. भरलेला फॉर्म संस्थेतजमा करण्याची शेवटचीतारीख १५ फेब्रुवारी असते. वेळ कमी असल्यास www.spiaurangabad.com या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज डाऊनलोड करावा व तो भरून त्याबरोबर रु. ४००/- चा ड्राफ्ट पाठवावा. शंका असल्यास संस्थेत ०२४०-२३८१३७० या दूरध्वनीवर संपर्क साधून शंकानिरसनकरता येते.प्रवेश परीक्षा : पात्र विद्यार्थ्यांना एप्रिल २०१३ मध्येघेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेसाठीआमंत्रित केले जाते. परीक्षा नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद या केंद्रांवर घेतली जाते.लेखी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल. या परीक्षेत ६० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘आय.क्यू. टेस्ट’ घेतली जाते. तसेच व्यक्तिगत मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीत तोंडी प्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सामान्य ज्ञान तसेच ताज्या घडामोडींशी संबंधित प्रश्न इंग्रजीत विचारले जातात.परीक्षेचा निकाल : निवड झालेल्या मुलांना दूरध्वनीवरून तसेच पत्राद्वारे निवडीविषयी कळविण्यात येते. प्रवेश निश्चितीच्या दृष्टीनेमे महिन्याच्या पहिल्या / दुसऱ्या आठवडय़ात अॅडव्हान्स फी जमा करावी लागते. दहावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर ६० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळालेल्या मुलांचा प्रवेश निश्चित होतो.एस.पी.आय.मधील प्रशिक्षण : अकरावी-बारावी शैक्षणिकप्रशिक्षण सी.बी.एस.ई. आधारित ‘स्टेपिंग स्टोन’ या औरंगाबादमधील उत्तम संस्थेत होते तर एन.डी.ए. लेखी परीक्षेची तयारी एस.पी.आय. संस्थेत होते. प्रशिक्षणा दरम्यान वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागीहोणे अनिवार्य असून इंग्रजी संभाषणकौशल्य, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, समूहचर्चादेखील घेतली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वागीणविकास होतो. एस.एस.बी. मुलाखतीची तयारीदेखील येथे करण्यात येते. ज्यासाठी काही निवृत्त अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकरतात.एस.पी.आय. औरंगाबाद ही राज्य सरकारचीएकमेव संस्था असून त्यात प्रवेश मिळणे विद्यार्थ्यांच्या करिअरला उभारी देणारे ठरते. या संस्थेच्या नावाचा वापर किंवा त्यांच्यासारखी संस्था म्हणवल्या जाणाऱ्या अनेक संस्था औरंगाबाद तसेच राज्यातील काही शहरांत फोफावत आहेत. अशा संस्थांपासून सावध राहणे आवश्यक आहे. वृत्तपत्रात मोठय़ा जाहिराती तसेच आकर्षित करणारे हॅण्डबिल्स आणि प्रॉस्पेक्ट्स छापून याच नावाशी साधम्र्य असणाऱ्या संस्थांची प्रवेशाआधी सविस्तर माहिती घेणे म्हणूनच अत्यावश्यक ठरते.

सौजन्य :- लोकसत्ता
उत्तर लिहिले · 4/8/2017
कर्म · 210095
0

NDA (National Defence Academy) परीक्षेची तयारी कशी करावी आणि ती पास कसे व्हावे यासाठी काही महत्वाचे मुद्दे:

1. परीक्षेचे स्वरूप समजून घ्या:

  • NDA परीक्षा UPSC (Union Public Service Commission) द्वारे घेतली जाते.
  • यात दोन मुख्य भाग असतात:
    • गणित (Mathematics)
    • सामान्य ज्ञान (General Ability Test)
  • प्रत्येक पेपर 300 गुणांचा असतो आणि एकूण परीक्षा 900 गुणांची असते.
  • गणित विषयात बीजगणित, त्रिकोणमिती, भूमिती, सांख्यिकी आणि कलन (Calculus) यावर प्रश्न विचारले जातात.
  • सामान्य ज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी (Current Affairs) यांचा समावेश असतो.

2. अभ्यासक्रम (Syllabus):

  • UPSC च्या वेबसाइटवर NDA परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तो डाउनलोड करा आणि त्यानुसार तयारी करा.
  • प्रत्येक विषयासाठी योग्य वेळ द्या आणि नियमित अभ्यास करा.

3. अभ्यासाचे साहित्य:

  • गणित: 11वी आणि 12वी च्या NCERT पुस्तकांचा अभ्यास करा. R.D. Sharma किंवा M.L. Aggarwal यांसारखी संदर्भ पुस्तके वापरा.
  • सामान्य ज्ञान: NCERT ची सामाजिक शास्त्राची पुस्तके (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र) वाचा. चालू घडामोडींसाठी वृत्तपत्रे आणि मासिके नियमित वाचा.

4. तयारी कशी करावी:

  • वेळेचे नियोजन: अभ्यासासाठी एक टाइम टेबल तयार करा आणि त्याचे पालन करा. प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ द्या.
  • सराव: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Previous Year Question Papers) सोडवा. यामुळे परीक्षेच्या स्वरूपाची आणि प्रश्नांच्या प्रकारांची कल्पना येईल.
  • समूह अभ्यास: मित्रांसोबत किंवा स्टडी ग्रुपमध्ये अभ्यास करा. यामुळे शंकांचे निरसन करणे सोपे जाईल.
  • टेस्ट सिरीज: नियमितपणे मॉक टेस्ट द्या. ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा.

5. शारीरिक चाचणीची तयारी:

  • NDA मध्ये लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणी (Physical Test) होते.
  • धावणे, पुश-अप्स, सिट-अप्स आणि इतर शारीरिक व्यायाम नियमित करा.

6. मुलाखतीची तयारी:

  • शारीरिक चाचणीनंतर मुलाखत (Interview) होते.
  • मुलाखतीमध्ये आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
  • सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर लक्ष ठेवा.
  • आपल्या आवडीच्या क्षेत्राबद्दल माहिती ठेवा.

7. सकारात्मक दृष्टिकोन:

  • परीक्षेची तयारी करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
  • आत्मविश्वास ठेवा आणि नियमित अभ्यास करा.
  • वेळेवर झोप घ्या आणि आरोग्य चांगले ठेवा.

8. मार्गदर्शन:

  • तुम्ही NDA च्या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेऊ शकता.
  • तसेच, ऑनलाइन मार्गदर्शन उपलब्ध आहे.

टीप: अधिक माहितीसाठी UPSC च्या वेबसाइटला भेट द्या:

UPSC Official Website

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1440

Related Questions

कर्मचारी भरतीचे मार्ग व स्रोत स्पष्ट करा?
मी गेल्या तीन वर्षांपासून पोलीस शिपाई भरती करतोय, मला अजून यश आले नाही?
खरोखर बांधकाम मजूर होण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?
कामगारांच्या भूमिकेमध्ये जाणवणारे ताणतणाव कोणते?
कामगारांच्या भूमिकेत जाणवणारे ताण-तणाव कोणते?
रोजगाराचा हक्क मिळवणे ही एक अडथळ्याची शर्यत आहे, हे स्पष्ट करा?
महाराष्ट्र कटक मंडळ कोठे आहे?