राजकारण माहिती अधिकार मुख्यमंत्री मंत्री अधिकारी मंत्रीमंडळ

कॅबिनेट मंत्री म्हणजे कोणते मंत्री व त्यांचे काम आणि अधिकार काय?

2 उत्तरे
2 answers

कॅबिनेट मंत्री म्हणजे कोणते मंत्री व त्यांचे काम आणि अधिकार काय?

3
भारतीय घटनेच्या कलम ५२ ते ७८ मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतुद आहे. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्री परिषद यांचा समावेश होतो.
  भारतीय घटनेचा कलम ७४ व ७५ मध्ये मंत्रिमंडळ व पंतप्रधान या विषयी तरतुद आहे.कलम ७५ राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची नेमणुक केली जाते आंणि इतर मंत्र्यांच्या पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार नेमणुक केलीजाते.पंतप्रधान आपल्या पक्षातील निवडून आलेल्या प्रतिनिधींची नेमणुक करतो या नेमणुकीस राष्ट्रपतींची औपचारीक मान्यता घेतो.एखादा मंत्री त्याच्या नेमणुकीच्या वेळी संसदेच्या वेळी संसदेच्या सदस्य नसेल तर त्याला ६ महिन्याच्या आत दोन्हीपैकी एक सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त करावे लागते.मंत्र्यांचे प्रकार – कॅबिनेट मंत्री
कॅबिनेट मंत्री हे प्रथम दर्जाचे मंत्री मानले जातात. महत्वाच्या खात्यांसाठी पंतप्रधान कॅबिनेट मंत्री नेमतात. कॅबिनेट मंत्र्याच्या परिषदेत पंतप्रधान अध्यक्ष असतो.
  १) कायदे विषयक अधिकार – मंत्रीपदाच्या कायदे निर्मितीत पुढाकार घेतो.
२) आर्थिक अधिकार – अंदाजपत्रक, आर्थिक विधेयके या विषयी जबाबदारी मंत्रीमंडळाला पार पाडावी लागते. कारण अर्थ विधेयकाबाबत अविश्वास प्रकट केला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.
३) प्रशासकीय अधिकार – मंत्रि परिषद सनदी सेवकांच्या साह्याने धोरण ठरवितो व त्याचीअंबलबजावणी करतो. मंत्री परिषदेच्या सल्ल्याने राष्ट्रपती विविध नेमणुका करतो.
४) राजनैतिक अधिकार – मंत्रि परिषद परराष्ट्र धोरणाची आखणी करतो व राष्ट्रपतीच्या नावाने परराष्ट्राशी करारआणि तह करतो.
उत्तर लिहिले · 2/8/2017
कर्म · 210095
0

कॅबिनेट मंत्री म्हणजे काय:

कॅबिनेट मंत्री हे सरकारमधील महत्वाचे मंत्री असतात. ते सामान्यतः सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ आणि अनुभवी सदस्य असतात. कॅबिनेट मंत्र्यांकडे मंत्रालयाचा कारभार सोपवला जातो.

कॅबिनेट मंत्र्यांची कामे:

  1. धोरण निश्चिती: कॅबिनेट मंत्री आपल्या मंत्रालयाशी संबंधित धोरणे ठरवतात.
  2. कायदे तयार करणे: हे मंत्री कायदे बनवण्यात आणि मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
  3. अर्थसंकल्प: आपल्या विभागासाठी अर्थसंकल्प तयार करणे आणि सादर करणे.
  4. निर्णय घेणे: कॅबिनेट बैठकांमध्ये (Cabinet meetings) महत्वाचे निर्णय घेतले जातात, ज्यात कॅबिनेट मंत्र्यांचा सहभाग असतो.
  5. अंमलबजावणी: मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे.

कॅबिनेट मंत्र्यांचे अधिकार:

  • मंत्रालयाचे प्रमुख: ते त्यांच्या मंत्रालयाचे प्रमुख असतात आणि मंत्रालयाचे कामकाज त्यांच्या देखरेखेखाली चालते.
  • सचिवीय सहाय्य: मंत्रालयातील सचिव (Secretary) आणि इतर अधिकारी त्यांना मदत करतात.
  • धोरणात्मक निर्णय: धोरणात्मक निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार असतो.
  • प्रतिनिधित्व: ते सरकारचे विधानमंडळात प्रतिनिधित्व करतात.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2920

Related Questions

२०२५ च्या महाराष्ट्रातील मंत्र्यांची यादी सांगा?
कुणाला कुठले खाते मिळाले, यादी?
महाराष्ट्रातील सन २०२२ चे कॅबिनेट मंत्र्यांची नावे, पक्ष व पद माहिती मिळेल का?
मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची नावे व पदे सांगा?
नवीन मंत्रिमंडळाची नावे व त्यांची पदे सांगा?
नवीन बदललेल्या मंत्रिमंडळाची, त्यांच्या अगोदरच्या खात्यासहित, पूर्ण माहिती मिळेल का?