शरीर घरगुती उपाय चरबीच्या गाठी आरोग्य

उद्धव शिंदे सर, मला चरबीच्या गाठी येत आहेत, त्या कमी करण्यासाठी काय करावे? व त्यावर उपाय काय आहे? वजन ७२ आहे, वय २३ आहे. कृपया पूर्ण मार्गदर्शन करा.

2 उत्तरे
2 answers

उद्धव शिंदे सर, मला चरबीच्या गाठी येत आहेत, त्या कमी करण्यासाठी काय करावे? व त्यावर उपाय काय आहे? वजन ७२ आहे, वय २३ आहे. कृपया पूर्ण मार्गदर्शन करा.

9
शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहे. साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.प्रमाण कमी झाल्यास होणाऱ्या परिणामाची जबाबदारी स्वतःची राहील.
कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे. हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
   कपालभाती, प्राणायाम केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझोल होते ( माझा स्वतःचा अनुभव आहे).कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.
  एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी गुरुकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते.
    दररोज करा सूर्य नमस्कार कपालभाती योग। होणार नाही कोणाताच रोग।।
उत्तर लिहिले · 1/8/2017
कर्म · 210095
0
मला तुमच्या प्रश्नाची जाणीव आहे, परंतु मी वैद्यकीय सल्लागार नाही. त्यामुळे मी तुम्हाला अचूक आणि खात्रीशीर माहिती देऊ शकत नाही. चरबीच्या गाठी (Lipoma) कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत, पण कृपया डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे:

चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी उपाय:

  • व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते आणि चरबीच्या गाठींवरही परिणाम होऊ शकतो.
  • आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा.
  • वजन नियंत्रण: तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • गरम पाण्याचा शेक: गाठींवर गरम पाण्याचा शेक दिल्याने आराम मिळू शकतो.
  • डॉक्टरांचा सल्ला: चरबीच्या गाठींसाठी योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उपचार:

  • Liposuction: या शस्त्रक्रियेत चरबी शोषून घेतली जाते.
  • Injection: काहीवेळा डॉक्टर स्टेरॉइडचे इंजेक्शन देतात, ज्यामुळे गाठी लहान होतात.
  • सर्जिकल काढणे: शस्त्रक्रिया करून गाठ काढली जाते.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. MyUpchar: चरबीच्या गाठी होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार https://www.myupchar.com/mr/disease/lipoma
  2. OnlyMyHealth: चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी उपाय https://www.onlymyhealth.com/home-remedies-for-lipoma-1374349144
टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1240