व्यवसाय
व्यवसाय मार्गदर्शन
व्यवस्थापन
व्यवसाय सुरू करणे
व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळेल का?
2 उत्तरे
2
answers
व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळेल का?
8
Answer link
व्यवसाय सुरु करायचा विचार केल्यानंतर कित्येक प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभे असतात. यातील सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे सुरुवात कशी करावी आणि यांनतर पडणारा प्रश्न म्हणजे व्यवसाय सुरु करायचा म्हणजे काय काय करावे लागते ? बऱ्याचदा काही स्टेप मागे पुढे झाल्यामुळे किंवा विसरल्यामुळे व्यवसाय सुरु करण्यात उशीर होतो, आणि अर्थातच यामुळे आपलेच नुकसान होते. व्यवसायाची पार्श्वभूमी नसल्यामुळे हा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. पण जर व्यवसायाचे टप्पे काळजीपूर्वक अभ्यासले आणि त्यावर योग्य काम केले तर तुम्हाला व्यवसाय करताना काहीच अडचण येणार नाही.
म्हणूनच मी तुम्हाला व्यवसाय सुरु करतानाचे टप्पे थोडक्यात सांगणार आहे. यात टप्प्यांत कुठेही टेक्निकल ज्ञान नाही तर फक्त प्रत्यक्ष काम करताना कशा प्रकारे पायऱ्या पार कराव्यात याची माहिती आहे.
व्यवसायाचे टप्पे
१. व्यवसाय निवड व सर्व्हे
योग्य व्यवसाय निवड हि व्यवसायाची पहिली पायरी असते. तुमची गुंतवणूक, अनुभव, शिक्षण, क्षमता इ. बाबी पाहून योग्य व्यवसाय निवडावा. यांनतर लगेच स्थानिक परिसरात निवडलेल्या व्यवसायासंदर्भात सर्व्हे करावा
२. व्यवसाय नोंदणी
व्यवसायाच्या रचनेनुसार व्यवसायाची योग्य नोंदणी करणे आवश्यक असते. मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायासाठी SSI नोंदणी करावी.
३. लायसन्स व सर्टिफिकेट्स
तुम्ही निवडलेल्या व्यवसायासाठी कोणकोणते लायसन्स लागतात याची माहिती घेऊन त्यासाठी योग्य ते अर्ज करावेत. जर आवश्यकता असेल तर सर्टिफिकेट्स मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत (लॅब सर्टिफिकेट्स, ISO ई.)
४. कायदेशीर पूर्तता
व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींची माहिती घेऊन त्याची पूर्तता करावी. यासाठी एखाद्या सल्लागाराची मदत घ्यावी.
५. सबसिडी
जर तुमचा प्रोजेक्ट PMEGP अंतर्गत येत असेल तर KVIC च्या वेबसाईट वर जाऊन सबसिडी साठी ऑनलाईन अर्ज करावा. हा अर्ज व्यवसाय सुरु करण्याआधी करणे आवश्यक असते.
६. मशिनरी स्रोत
मशिनरी सप्प्लायर्स ची माहिती घेऊन त्यांना भेट द्यावी... मशिनरींची माहिती घ्यावी व कोटेशन्स घ्यावेत
७. कच्चा माल स्रोत
कच्च्या मालाचा पुरवठा कसा होणार याचा अभ्यास करावा. पुरवठादारांची माहिती घेऊन ठेवावी. कोटेशन घेऊन ठेवावेत
८. प्रोजेक्ट रिपोर्ट
कर्ज घ्यायचे असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट अनिवार्य असते. प्रोजेक्ट रिपोर्ट साठी मशिनरी, कच्चा माल कोटेशन्स आवश्यक असतात. प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यासाठी CA ची मदत घेऊ शकता.
९. कर्ज
प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून झाल्यानंतर (KVIC कडे अर्ज केला असेल तर KVIC चे अप्रूव्हल आल्यानंतर) बँकेकडे कर्जासाठी अर्ज करावा.
१०. बांधकाम
बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर कारखान्याचे बांधकाम सुरु करावे
११. मशिनरी इन्स्टॉलेशन
बांधकाम सुरु झाल्यानंतर मशिनरींची ऑर्डर द्यावी. बांधकाम होईपर्यंत मशिनरी बनवून तयार होतात. मशिनरी इन्स्टॉलेशन करून घ्यावे
१२. कच्चा माल उपलब्धता
कच्च्या मालाची उपलब्धता तात्काळ करून घ्यावी.
१३. पॅकिंग मटेरियल
पॅकिंग मटेरिअलची उपलब्धता करावी. काही सप्लायर्स कडून कोटेशन घेऊन त्यातून चांगला सप्लायर निवडावा.
१४. कामगार व स्टाफ भरती
कंपनी सेटअप होताना कामगार व स्टाफ भरती करून घ्यावी व त्यांना योग्य ते आवश्यक ट्रेनिंग द्यायला सुरुवात करावी.
१५. प्रोसेसिंग व पॅकिंग
प्रोसेसिंग ची योग्य माहिती झाल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन घ्यायला सुरुवात करावी, पहिले पॅकिंग करता योग्य काळजी घ्यावी. व त्यात काही बदल आवश्यक आहेत का याचाही अंदाज घ्यावा.
१६. मार्केटिंग व ब्रॅण्डिंग
कारखान्याचे बांधकाम सुरु करतानाच मार्केटिंग व ब्रॅण्डिंग बद्दल तयारी सुरु करावी. अपेक्षित ग्राहक कोण कोणते असतील याची माहिती गोळा करावी. लोगो डिझाईन, ट्रेड मार्क रजिस्ट्रेशन, मार्केटिंग मटेरियल, प्रोडक्ट डिझाईन याची पूर्तता करून घ्यावी. लोगो डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन साठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. योग्य प्रकारे जाहिराती सुरु करून मार्केटिंग सुरु करावी. प्रत्यक्ष विक्री सुरु होईपर्यंत तुमच्या ब्रँड ची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यावी.
१७. सबसिडी पूर्तता
कंपनी पूर्णपणे उभी राहिल्यानंतर व काम सुरु झाल्यानंतर सबसिडी ची पूर्तता करून घ्यावी. यासाठी भरपूर कागदपत्रे आवश्यक असतात. शक्य झाल्यास कन्सल्टन्ट ची मदत घ्यावी. (PMEGP सबसिडी करिता कन्सलटंट ची गरज नाही, बँक पूर्ण कार्यवाही करते)
१८. टॅक्सेशन पूर्तता
आवश्यक ते टॅक्स रजिस्ट्रेशन करून घ्यावे. उदा. VAT किंवा आता GST ई.
१९. विक्री सुरुवात
आता प्रत्यक्ष विक्रीची सुरुवात होते. मार्केट चा पूर्ण सर्व्हे करून विक्रीची सुरुवात करावी. सेल्स प्रतिनिधींना योग्य मार्गदर्शन करावे. किमान एक सेल्स मॅनेजर नेमावा जो अनुभवी असेल. विक्री ची सुरुवात हि व्यवसायाची सर्वात महत्वाची पायरी असते. कारण आता फक्त यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.
>> विक्री सुरु झाल्यानंतर सहा महिने फक्त ग्राहक वाढवण्यावर भर द्यावा. नफ्या तोट्याचा हिशोब दूर ठेवावा.
>> सहा महिन्यांनी प्रत्यक्ष व्यवसाय करताना येणाऱ्या अडी अडचणींवर अभ्यास करून मार्ग शोधावा. योग्य आर्थिक ताळेबंद मांडावा.
>> किमान दोन वर्षे फायच्याच विचार न करता कंपनी कोणत्याही परिस्थित चालू राहील याची काळजी घ्यावी.
>>कोणत्याही प्रकारे उधारीच्या चक्रात अडकू नका. मार्केट मध्ये उधारी आवश्यक असली तरी तुमच्या टर्नओव्हर च्या ३०% पेक्षा जास्त उधारी होणार नाही याची काळजी घेत राहा.
हे तुमच्या व्यवसायासाठी काही महत्वाचे टप्पे आहेत. यावर योग्य अंमल केल्यास व्यवसाय सुरु करताना कोणतीही अडचण येत नाही. पण याचबरोबर व्यवसाय कसा करावा याचेही ज्ञान घेणे आवश्यक असते. परंतु त्याबद्दल ठोकताळे पद्धतीने माहिती देणे शक्य नसते, कारण प्रत्येकासाठी व्यवसायाच्या स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या असतात. याकरिता सल्लागाराची किंवा अनुभवी व्यक्तींची मदत घेतल्यास उत्तम.
जय महाकाल
0
Answer link
व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त माहिती खालीलप्रमाणे:
तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा आहे हे निश्चित करा.
तुमची आवड, कौशल्ये आणि बाजारातील मागणी यांचा विचार करा.
तुम्ही निवडलेल्या व्यवसायासाठी बाजारात किती मागणी आहे हे तपासा.
तुमचे प्रतिस्पर्धी कोण आहेत आणि त्यांची बलस्थाने काय आहेत, हे शोधा.
तुमच्या संभाव्य ग्राहकांची माहिती मिळवा.
व्यवसाय योजना (Business plan) तयार करा. त्यात तुमच्या व्यवसायाचे ध्येय, उद्दिष्ट्ये, विपणन योजना (marketing plan) आणि आर्थिक अंदाज लिहा.
व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागेल याचा अंदाज घ्या.
भांडवल उभारणीसाठी विविध पर्याय तपासा (कर्ज, गुंतवणूकदार).
व्यवसाय नोंदणी करा.
आवश्यक परवाने आणि परवानग्या मिळवा.
GST आणि इतर कर संबंधित कायदे समजून घ्या.
व्यवसायासाठी योग्य जागा निवडा.
आवश्यक उपकरणे आणि सामग्री खरेदी करा.
तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करा.
सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन माध्यमांचा वापर करा.
उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करा.
ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करा.
नवीन ट्रेंड आणि तंत्रज्ञान शिका.
तुमच्या व्यवसायात सतत सुधारणा करा.
धैर्य आणि चिकाटी: कोणताही व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी येतात, त्यामुळे धीर सोडू नका.
नेटवर्किंग: इतर व्यावसायिक आणि उद्योजकांशी संपर्क साधा.
मार्गदर्शन: अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्या.
1. व्यवसायाची निवड:
2. बाजारपेठ संशोधन:
3. व्यवसाय योजना तयार करणे:
4. आर्थिक नियोजन:
5. कायदेशीर प्रक्रिया:
6. जागा आणि उपकरणे:
7. विपणन आणि जाहिरात:
8. ग्राहक सेवा:
9. सतत शिका आणि सुधारणा करा:
इतर महत्वाचे मुद्दे:
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आवश्यक आहे. All the best!