2 उत्तरे
2
answers
दक्षिण भारताची गंगा कोणती नदी आहे? कावेरी की गोदावरी?
0
Answer link
दक्षिण भारतातील व आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. भारतातील गंगा नदीच्या खालोखाल नदीचे पात्र आहे. हिला दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतात. सह्यान्द्री पर्वतात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबककेश्वरच्या ब्रम्हगिरीच्या टेकडी गोदावरीचा उगम झालेला आहे. दख्खनच्या पठारावरून वाहणारी ही नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश वाहत जाऊन मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करून पूर्वेस बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. गोदावरीची एकूण लांबी सुमारे १४६५ कि मी असून तिचे नदिप्रणालीचे क्षेत्र १५३७७९ चौ कि मी आहे. महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यातून दरवर्षी सुमारे ३७८३० दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह वाहतो.संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे.
0
Answer link
कावेरी नदी ही दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते.
कावेरी नदीला दक्षिण भारतातील एक पवित्र नदी मानले जाते आणि तिची तुलना उत्तर भारतातील गंगा नदीशी केली जाते.
गोदावरी नदीला 'दक्षिण गंगा' म्हणून देखील ओळखले जाते, परंतु कावेरी नदीला 'दक्षिण भारताची गंगा' म्हणून अधिक मानले जाते.
अधिक माहितीसाठी: