भाषा मराठी भाषा जात व कुळे बोलीभाषा

वंजारीची भाषा कोणती असते, मराठी का?

2 उत्तरे
2 answers

वंजारीची भाषा कोणती असते, मराठी का?

6
वंजारी ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात आहे. सुमारे चारशे वर्षापुर्वी या समाजाने राजस्थानातुन येथे स्थलांतर केले. हा समाज मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर व गोवा या भागांत कमी जास्त लोक्संखेने पसरलेल्या या जातीतील लोक प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज. भारतात व अन्य देशांतही आढळतो. वंजारी समाज हा महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर या राज्जात कमी जास्त लोक्संखेने आणि प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातीलएक प्रमुख क्षत्रिय भटका समाज.भारतात विविध राजांत सर्व समाजांसोबत मिळून मिसळून राहणारा शेतकरी पशुपालक समाज उपेक्षित राहिल्याने प्रगती थाबलेला समाज जाती व्यवस्थेचे चटके इतर क्षत्रिय समाजापेक्षा सर्वात जास्त सोसलेला समाज. या कारणाने आरक्षण मिळण्याने आज उभारत असेलेला समाज पण इतर क्षत्रिय समाजाकडून क्षत्रिय असूनही मान न मिळालेला समाजवंजारी समाजाचा त्यागाचा शौर्य पराक्रमाचा इतिहास आहे वंजारी समाज हा क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा बलशाली व कडवट लढाऊ गट आहे.महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा औरंगजेब भेटी वेळी छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वताच्या सोबत निवडक लोकांमध्ये वंजारी लोक निवडण्याचे कारणही हेच कि वंजारी समाज हा क्षत्रिय बलशाली व कडवट लढाऊ बाण्याचा आहे .तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेबांच्या माहेरगावी शिंदखेड राजा परिसरातील हजारो वंजारी तरुण मावळे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी होते .
हा समाज हिंदू असल्याने प्रत्येक राज्यातील बोलीभाषा हीच त्या समाजाची बोलीभाषा आहे, जसे महाराष्ट्रात मराठी, राजस्थान मध्ये राजस्थानी, पंजाबमध्ये पंजाबी इ.
उत्तर लिहिले · 30/7/2017
कर्म · 210095
0

वंजारी ही एक मोठी जमात आहे आणि त्यांची स्वतःची अशी कोणतीही एक विशिष्ट भाषा नाही.

भाषा आणि बोली:

  • वंजारी समाजामध्ये अनेक भाषा आणि बोली बोलल्या जातात.
  • मराठी: महाराष्ट्रातील वंजारी समाज मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेशी जोडलेला आहे. ते मराठी भाषेचा वापर करतात.
  • वंजारी बोली: काही वंजारी समुदायांमध्ये 'वंजारी' नावाची स्वतःची बोलीभाषा आहे, जी मराठी, हिंदी, आणि राजस्थानी भाषांच्या मिश्रणातून तयार झाली आहे.

त्यामुळे, वंजारी समाजाची भाषा मराठी आहे असे म्हणणे पूर्णपणे सत्य नाही, कारण ते त्यांच्या प्रदेशानुसार आणि समूहांनुसार वेगवेगळ्या भाषांचा वापर करतात.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1080

Related Questions

महाराष्ट्रातील बोलीभाषा सांगा आणि त्यांचे स्थान व व्याप्ती साहित्याच्या माध्यमातून स्पष्ट करा?
पूर्वी कोकणात कोणती बोलीभाषा होती?
भाषेच्या वापराचा हेतू आणि स्वरूप यावरून बोलीभाषा आणि साहित्य भाषा असे वर्गीकरण होते का?
कोल्हापुरी भाषेबद्दल काय लिहाल?
डांगी बोलीची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा?