कायदा न्यायव्यवस्था मानहानी

मानहानीचा दावा करणे म्हणजे काय? ही केस असते का, जरा सविस्तर सांगा?

2 उत्तरे
2 answers

मानहानीचा दावा करणे म्हणजे काय? ही केस असते का, जरा सविस्तर सांगा?

6
अब्रू ही मानवाची मूल्यवान संपत्ती असते.माणसाच्या चांगल्या कृतीतून समाजात चांगली प्रतिमा ही तयार होते. आणि वाईट कृतीतून समाजात वाईट प्रतिमा तयार होते. त्यामुळे आपली प्रतिमा ही समाजात कायम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती ही करत असते. पण जर का समाजात आपली प्रतिष्ठा वाढली आणि उत्कृष्ट अशी प्रतिमा तयार झाली की या प्रतिमेला तडा जाता कामा नये याची विषेष काळाजी घेतली जाते. कारण प्रतिष्ठा घालवण्यास वेळ लागत नाही आणि हिच प्रतिष्ठा कमवायला वेळ लागतो. त्यामुळे ही प्रतिमा काळजीपूर्वक जपण्याचा प्रयत्न केला जातो.माध्यमांचा अभ्यास करत असताना हा कायदा प्रामुख्याने दिसून येतो. मानहानीकायदा हा भारतामध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम – ४९९ मध्ये नमूद करण्यात आलेला असून हा कायदा लिखित स्वरुपात आहे. या कायद्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडातात त्यामध्ये मौखिक अब्रुनुकसानी आणि लिखित अब्रुनुकसानी यांचा समावेश होतो. गेलेली अब्रू परत मिळविणे कठीण असते. मौखिक अब्रुनुकसानी म्हणजेच एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीविषयी निंदानालस्ती करणारे उदगार काढते त्यावेळी संबंधित व्यक्तीची प्रतिमा ही ढासळते. त्याचप्रमाणे लिखित अब्रुनुकसानिमध्ये एका व्यक्तीने दुसर्या व्यक्ती विषयी बेअब्रु करणारा मजकूर लिहिणे तसेच छापणे की ज्याच्यामुळॆ समोरच्या व्यक्तीची समाजात असणारी प्रतिष्ठा कमी होते. अलिखाण,वक्तव्य,हावभाव,चित्र,आकृती वगैरे कोणत्याही साधनाने कोणत्याही व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या अब्रूस धक्का लावला,तर अब्रु नुकसानी होते.प्राचीन भारतामध्ये निष्ठुर,अश्लील इ.अपशब्दांचे प्रकार असत. त्यांचा उच्चार गुन्हाच समजत. सत्य हा बचाव नसे.
सामाजिक उच्चनीचते वर शिक्षेचे प्रमाण अवलंबून असे.इंग्लंडप्रमाणे आधुनिक भारतातही लेखी बदनामी वा तोंडी बदनामी असे अब्रुनुकसानीचे दोन प्रकार आहेत. योग्य समर्थन किंवा कारण नसता दुसऱ्याच्या अब्रूला धक्का देणाऱ्या असत्य मजकुरांचे लेख, चिन्हे, चित्रे इत्यादींच्या द्वारे प्रकाशन म्हणजे लेखी बदनामी. तसा मजकूर बोलण्याने व्यक्त करणे म्हणजे तोंडी बदनामी. लेखी बदनामी कायम स्वरूपाची असल्यामुळे ती गंभीर स्वरूपाची मानतात. भारतात दोन्ही स्वरूपांची बदनामी अपकृत्य ही होते व गुन्हाही होतो. मृतव्यक्तीबद्दलची मानहानिकारक विधाने संबंधिताना मनस्ताप कारक होत असल्याने गुन्हा होतो.उदा. बाळासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरती पालघर येथिल दोन मुलीने केलेले वक्तव्य. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आक्रमक,भयंकर,खोटा,किंवा अब्रुनुकसान करणारा संदेश पाठवणे गुन्हा आहे.संस्था,समूह व कंपनी यांचीही अब्रुनुकसानी होऊ शकते. आलंकारिक,सूचकभाषाही अब्रुनुकसान कारक असते. जर आपल्या समाजातील प्रतिष्ठेवर कोणी शिंतोडे उडवल्यामुळे तडा गेला आहे, अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर दुखावलेली व्यक्ती न्यायाच्या कोर्टात दोषी व्यक्तीविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू शकते अब्रुनुकसानी ही कोणी व्यक्तीजर अब्रुनुकसानी कारक चारचौघात बोलल्यामुळे देखील होऊ शकते किंवा तत्सम प्रकारचा मजकूर कुठे छापून प्रसिद्ध केला, खाणाखुणांमुळे किंवा अब्रुनुकसानीकरक दृष्यांमुळे सुद्धा होऊ शकते.एखाद्या व्यक्तीच्या समाजातील प्रतिष्ठेला बाधा येईल अशाप्रकारचा असत्य आरोप, वरील नमूद केलेल्या कृतीद्वारे केल्यास अशी कृती करणाऱ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करता येतो.बरेच राजकारणी लोक हे भाषण करत असताना विरोधी पक्षात असलेल्या व्यक्ती विषयी माध्यमांसमोर वाटेल ते बोलणे, किंवा एखादा त्यासंबंधी लेख हे स्वत:च्या मुखपृष्ठात छापून आणणे हे देखिल अब्रुनुकसानिचे उदाहरण म्हणता येईल. त्याचप्रमाणे समाजातील एखाद्या व्यक्तीविरुद्ध कोणी भ्रष्टाचाराचे किंवा पैसे खाल्ल्याचे आरोप केले तर असे आरोप करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दुखावलेली व्यक्ती कोर्टात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करू शकते.उदा. माजीमुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भाजप नेते नितीन गडाकरी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.  व्यक्तीस दोन वर्षांपर्यंत साधी जेल किंवा आथिर्क दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
उत्तर लिहिले · 27/7/2017
कर्म · 210095
0
मानहानीचा दावा म्हणजे काय हे सोप्या भाषेत खालीलप्रमाणे:

मानहानी म्हणजे काय:

  • जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल समाजात चुकीची माहिती पसरवते, ज्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा खराब होते, त्याला मानहानी म्हणतात.

मानहानीचा दावा:

  • जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्याची समाजात मानहानी झाली आहे, तेव्हा तो न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करू शकतो.
  • या दाव्यात, तो व्यक्ती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की त्याच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे आणि त्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे.

दाव्याची प्रक्रिया:

  1. तक्रार दाखल करणे: ज्या व्यक्तीची मानहानी झाली आहे, तो न्यायालयात तक्रार दाखल करतो.
  2. पुरावे सादर करणे: तक्रारदार व्यक्तीला हे सिद्ध करावे लागते की त्याच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे आणि त्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे.
  3. प्रतिवादीचे उत्तर: ज्या व्यक्तीवर मानहानीचा आरोप आहे, त्याला न्यायालयात आपले म्हणणे मांडावे लागते.
  4. न्यायालयाचा निर्णय: न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निर्णय देते. जर न्यायालयाने मानहानी झाली आहे असे ठरवले, तर ते नुकसान भरपाई देण्याचा आदेश देऊ शकते.

मानहानी कोणत्या प्रकारची असू शकते:

  • तोंडी मानहानी: बोलून केलेली मानहानी.
  • लेखी मानहानी: लेखी स्वरूपात, जसे की वृत्तपत्रात किंवा सोशल मीडियावर केलेली मानहानी.

हे लक्षात ठेवा: प्रत्येक चुकीची गोष्ट मानहानी नसते. मानहानी होण्यासाठी, समाजात तुमच्या प्रतिमेला खरोखरच नुकसान झाले पाहिजे हे महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी, आपण कायदेविषयक सल्लागाराची मदत घेऊ शकता.

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि कायदेशीर सल्ला म्हणून वापरली जाऊ नये.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2480

Related Questions

न्यायालयात मानहानीचा दावा कशाच्या आधारे दाखल केला जातो?
मुलीने केलेल्या खोट्या आरोपाबद्दल अब्रुनुकसानीचा दावा करता येऊ शकतो का?