मानहानी
0
Answer link
न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत:
- बदनामीकारक विधान: तुमच्याबद्दल केलेले विधान हे खोटे आणि बदनामीकारक असणे आवश्यक आहे, ज्यामुळे समाजात तुमची प्रतिमा मलिन होते.
- प्रसारण: हे विधान तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवे. म्हणजेच, ते विधान फक्त तुम्हाला बोलून उपयोग नाही, तर इतर कोणीतरी ते ऐकलेले किंवा वाचलेले असावे.
- ओळख: ते विधान तुमच्याबद्दलच आहे हे सिद्ध व्हायला हवे. जरी त्यात तुमचे नाव नसेल, तरी लोकांना ते वाचून किंवा ऐकून असे वाटले पाहिजे की ते तुमच्याबद्दलच आहे.
- नुकसान: खोट्या विधानामुळे तुम्हाला काहीतरी नुकसान झाले हे सिद्ध करणे आवश्यक आहे. जसे की, तुमची नोकरी जाणे, समाजात मान कमी होणे किंवा मानसिक त्रास होणे.
जर हे सर्व मुद्दे पूर्ण होत असतील, तर तुम्ही न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करू शकता.
अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:
- Defamation Law in India
- JUDGMENT WRITING MANUAL (Page 278)
7
Answer link
02/09/2020...
◆ एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, असं लिखाण किंवा वक्तव्य कुणी केल्यास त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करता येतो. भारतात दोन प्रकारचे अब्रुनुकसानीचे खटले चालतात - सिव्हिल आणि क्रिमिनल. हे दोन्ही खटले एकदाच भरता येतात, पण दोन्ही खटले वेगवेगळे चालवले जातात.
◆ सिव्हिल प्रकरणात दंडासाठी खटला भरला जातो तर क्रिमिनिल प्रकरणात शिक्षा आणि दंड दोन्ही द्यावे लागू शकतात.
◆ क्रिमिनिल अब्रुनुकसानीसाठी भारतीय दंड विधान 499 आणि 500 ही कलमं लावली जातात.
◆ अब्रुनकुसानीच्या प्रकरणात तो खटला भरणाऱ्या व्यक्तीवर हे पटवून देण्याची जबाबदारी असते की दुसऱ्या व्यक्तीच्या कथित वक्तव्याने त्याची प्रतिमा मलीन झाली आहे.
◆ 【काय असते प्रक्रिया】
ज्या व्यक्तीने हा खटला भरला आहे, त्याला आपली तक्रार पुराव्यासह सादर करावी लागते. न्यायालयात तक्रार मिळाल्यानंतर आणि जबाब नोंदवल्यानंतर जर न्यायालयाला हा खटला सुरू करण्याइतपत पुरावे मिळाले असतील तर आरोपींना समन्स जारी केले जातात.
◆ ज्या व्यक्तीने अब्रुनुकसान केलं आहे, त्याला नोटीस पाठवली जाते. जर त्या व्यक्तीनं आपला गुन्हा मान्य केला नाही तर कोर्ट मग तक्रारदार आणि बाकीच्या साक्षीदारांना बोलवतं.
◆ जर अब्रुनुकसानीमुळे दंड भरावा लागत असेल तर आधी नोटीस दिली जाते. त्यानंतर 10 टक्के रक्कम कोर्टात भरली जाते. जर हे सिद्ध केलं की ते वक्तव्य सत्य आहे, जनहितार्थ आहे तर अब्रुनुकसानीचा दावा फेटाळला जातो.

6
Answer link
अब्रू ही मानवाची मूल्यवान संपत्ती असते.माणसाच्या चांगल्या कृतीतून समाजात चांगली प्रतिमा ही तयार होते. आणि वाईट कृतीतून समाजात वाईट प्रतिमा तयार होते. त्यामुळे आपली प्रतिमा ही समाजात कायम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती ही करत असते. पण जर का समाजात आपली प्रतिष्ठा वाढली आणि उत्कृष्ट अशी प्रतिमा तयार झाली की या प्रतिमेला तडा जाता कामा नये याची विषेष काळाजी घेतली जाते. कारण प्रतिष्ठा घालवण्यास वेळ लागत नाही आणि हिच प्रतिष्ठा कमवायला वेळ लागतो. त्यामुळे ही प्रतिमा काळजीपूर्वक जपण्याचा प्रयत्न केला जातो.माध्यमांचा अभ्यास करत असताना हा कायदा प्रामुख्याने दिसून येतो. मानहानीकायदा हा भारतामध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम – ४९९ मध्ये नमूद करण्यात आलेला असून हा कायदा लिखित स्वरुपात आहे. या कायद्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडातात त्यामध्ये मौखिक अब्रुनुकसानी आणि लिखित अब्रुनुकसानी यांचा समावेश होतो. गेलेली अब्रू परत मिळविणे कठीण असते. मौखिक अब्रुनुकसानी म्हणजेच एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीविषयी निंदानालस्ती करणारे उदगार काढते त्यावेळी संबंधित व्यक्तीची प्रतिमा ही ढासळते. त्याचप्रमाणे लिखित अब्रुनुकसानिमध्ये एका व्यक्तीने दुसर्या व्यक्ती विषयी बेअब्रु करणारा मजकूर लिहिणे तसेच छापणे की ज्याच्यामुळॆ समोरच्या व्यक्तीची समाजात असणारी प्रतिष्ठा कमी होते. अलिखाण,वक्तव्य,हावभाव,चित्र,आकृती वगैरे कोणत्याही साधनाने कोणत्याही व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या अब्रूस धक्का लावला,तर अब्रु नुकसानी होते.प्राचीन भारतामध्ये निष्ठुर,अश्लील इ.अपशब्दांचे प्रकार असत. त्यांचा उच्चार गुन्हाच समजत. सत्य हा बचाव नसे.
सामाजिक उच्चनीचते वर शिक्षेचे प्रमाण अवलंबून असे.इंग्लंडप्रमाणे आधुनिक भारतातही लेखी बदनामी वा तोंडी बदनामी असे अब्रुनुकसानीचे दोन प्रकार आहेत. योग्य समर्थन किंवा कारण नसता दुसऱ्याच्या अब्रूला धक्का देणाऱ्या असत्य मजकुरांचे लेख, चिन्हे, चित्रे इत्यादींच्या द्वारे प्रकाशन म्हणजे लेखी बदनामी. तसा मजकूर बोलण्याने व्यक्त करणे म्हणजे तोंडी बदनामी. लेखी बदनामी कायम स्वरूपाची असल्यामुळे ती गंभीर स्वरूपाची मानतात. भारतात दोन्ही स्वरूपांची बदनामी अपकृत्य ही होते व गुन्हाही होतो. मृतव्यक्तीबद्दलची मानहानिकारक विधाने संबंधिताना मनस्ताप कारक होत असल्याने गुन्हा होतो.उदा. बाळासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरती पालघर येथिल दोन मुलीने केलेले वक्तव्य. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आक्रमक,भयंकर,खोटा,किंवा अब्रुनुकसान करणारा संदेश पाठवणे गुन्हा आहे.संस्था,समूह व कंपनी यांचीही अब्रुनुकसानी होऊ शकते. आलंकारिक,सूचकभाषाही अब्रुनुकसान कारक असते. जर आपल्या समाजातील प्रतिष्ठेवर कोणी शिंतोडे उडवल्यामुळे तडा गेला आहे, अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर दुखावलेली व्यक्ती न्यायाच्या कोर्टात दोषी व्यक्तीविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू शकते अब्रुनुकसानी ही कोणी व्यक्तीजर अब्रुनुकसानी कारक चारचौघात बोलल्यामुळे देखील होऊ शकते किंवा तत्सम प्रकारचा मजकूर कुठे छापून प्रसिद्ध केला, खाणाखुणांमुळे किंवा अब्रुनुकसानीकरक दृष्यांमुळे सुद्धा होऊ शकते.एखाद्या व्यक्तीच्या समाजातील प्रतिष्ठेला बाधा येईल अशाप्रकारचा असत्य आरोप, वरील नमूद केलेल्या कृतीद्वारे केल्यास अशी कृती करणाऱ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करता येतो.बरेच राजकारणी लोक हे भाषण करत असताना विरोधी पक्षात असलेल्या व्यक्ती विषयी माध्यमांसमोर वाटेल ते बोलणे, किंवा एखादा त्यासंबंधी लेख हे स्वत:च्या मुखपृष्ठात छापून आणणे हे देखिल अब्रुनुकसानिचे उदाहरण म्हणता येईल. त्याचप्रमाणे समाजातील एखाद्या व्यक्तीविरुद्ध कोणी भ्रष्टाचाराचे किंवा पैसे खाल्ल्याचे आरोप केले तर असे आरोप करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दुखावलेली व्यक्ती कोर्टात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करू शकते.उदा. माजीमुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भाजप नेते नितीन गडाकरी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. व्यक्तीस दोन वर्षांपर्यंत साधी जेल किंवा आथिर्क दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.