3 उत्तरे
3
answers
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल माहिती?
1
Answer link
लोकमान्य टिळक
बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १,इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
इ.स. १९१० च्या सुमारास घेतलेले लोकमान्य टिळकांचे प्रकाशचित्रजन्म:जुलै २३,इ.स. १८५६
रत्नागिरी(टिळक आळी), रत्नागिरी जिल्हा,महाराष्ट्र, ब्रिटिश भारतमृत्यू:ऑगस्ट १, इ.स. १९२०
पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारतचळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढासंघटना:अखिल भारतीय काँग्रेसपत्रकारिता/ लेखन:केसरी
मराठापुरस्कार:लोकमान्य, भारतीय असंतोषाचे जनक .प्रमुख स्मारके:मुंबई दिल्ली इधर्म:हिंदूप्रभाव:छत्रपती शिवाजी महाराज तात्या टोपे महाराणा प्रतापप्रभावित:चाफेकर बंधु, स्वातंत्र्यवीर सावरकर, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणविस , अमित शहा, राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे ,छत्रपती खा. उदयनराजे भोसले .वडील:गंगाधर रामचंद्र टिळकआई:पार्वतीबाई टिळकपत्नी:सत्यभामाबाईअपत्ये:श्रीधर बळवंत टिळक[१]तळटिपा:"स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच "
बालपणसंपादन करा
टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्नागिरीमधीलमधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते[२]. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे टिळकांच्या मातोश्रींनी घोर उपासना करून लोकमान्य टिळकांसारखे पुत्ररत्न प्राप्त करुन घेतले होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.[३]
त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.[४] पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्यूपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला.[५]

Family of Lokmany Bal Gangadhar Tilak
(छायाचित्र : टिळक कुटुंबीय- लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई उर्फ तापीबाई आणि मुली व नातवंडे यांच्याबरोबर. छायाचित्रण वर्ष अज्ञात)
कसरतीचे महत्त्वसंपादन करा
इ.स. १८७२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनीडेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी व्यायामशाळेत जाऊन नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौकाचालन (rowing) हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यास झाला.[६]
कॉलेज जीवनसंपादन करा
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना त्यांना अनेक मान्यवंत शिक्षकांच्या हाताखाली शिकता आले. प्रोफेसर वर्ड्स्वर्थ आणि प्रोफेसर शूट यांनी त्यांची अभिजात इंग्रजी साहित्यातील रुची वाढवली तर गणित शिकवणाऱ्या प्रोफेसर केरूअण्णा छत्रे यांनी त्यांच्यावर विशेष छाप टाकली. कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचनपण प्रचंड होते. त्यांनी संस्कृत धर्मग्रंथे, इंग्रजीमधील राजनीती आणि अतिभौतिकी (मेटा-फिजिक्स) वरील पुस्तके (विशेषतः हेगेल, कांट, स्पेन्सर, मिल, बेंथम, व्हॉल्टेअर आणि रूसो) तसेच मराठीमधील संतसाहित्याचे वाचन केले. कॉलेजमधील मित्रांमध्ये ते स्पष्टवक्ते आणि बेधडक म्हणून प्रसिद्ध होते.इ.स. १८७७ मध्ये, गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बी.ए. झाले. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी एल्एल.बी.. करण्याचे ठरवले. त्यांची गणितातील रुची आणि संशोधनाची आवड पाहता एल्एल.बी. करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, " ज्या अर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की, कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल. मला वाटत नाही की माझे आयुष्य ब्रिटिश साम्राज्याविरोधात संघर्षाशिवाय व्यतीत होईल."
सामाजिक मते व उद्गारसंपादन करा
इंग्रजांचे अंधानुकरणसंपादन करा
इंग्रजांचे अंधानुकरण करणार्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का? असा त्यांचा सवाल होता.[७]
प्लेगविरोधी फवारणीस विरोध
टिळक-आगरकर मैत्री व वाद
दु्ष्काळ
प्लेगची साथ, राजद्रोहाचा खटला व तुरुंगवास
जहालवाद विरुद्ध मवाळवादसंपादन करा
तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.
लाल-बाल-पालसंपादन करा

लाल बाल पाल
लाला लजपतराय, बाल आणि पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिपुटीला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.
बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा
पत्रकारितासंपादन करा

केसरीतील अग्रलेख

मराठातील अग्रलेख
टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकार्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणार्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली.इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहा ब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.[१८]
साहित्य आणि संशोधनसंपादन करा
टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas)[१९] त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनीभगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह खालीलप्रमाणे आहेत, टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.[२०]
The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित.
कौटुंबिक जीवनसंपादन करा
कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्नीचा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.[२१]
प्रसिद्ध घोषणा/वचनेसंपादन करा
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

https://rmvs.maharashtra.gov.in/
ह्या संकेतस्थळावय तुम्हाला न . च . केळकर ह्यांनी लिहिलेले
" लोकमान्य टिळक यांचे चरित्र " वाचायला मिळेल
पण उत्तरार्ध ( भाग - ३)
फक्त तुम्हाला संकेतस्थळावर बाराखडीचा जो तक्ता दिसेल त्यातील न शब्दावर क्लिक करा म्हणजे पटकन शोध घेता येईल

0
Answer link
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ होते. त्यांना 'लोकमान्य' ही उपाधी लोकांनी दिली, ज्याचा अर्थ 'लोकांमध्ये आदरणीय' असा होतो.
जन्म आणि शिक्षण:
- जन्म: २३ जुलै १८५६, चिखली, महाराष्ट्र.
- शिक्षण: बी.ए., एल्एल.बी. (LLB).
कारकीर्द:
- १९१८ मध्ये होमरूल लीगची स्थापना.
- 'केसरी' आणि 'मराठा' वृत्तपत्रांचे संपादन.
- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांपैकी एक.
- 'गीतारहस्य' नावाचा ग्रंथ त्यांनी कारागृहात असताना लिहिला.
राजकीय विचार:
टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या तत्वांचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीयांना एकत्र आणून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यास प्रेरित केले.
सामाजिक योगदान:
टिळकांनी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले.
मृत्यू:
१ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले.
अधिक माहितीसाठी:
तुम्ही खालील लिंकवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता: