भूगोल पिन कोड

सातारा पिन कोड काय आहे?

3 उत्तरे
3 answers

सातारा पिन कोड काय आहे?

3
ऑनलाईन पिन कोड नंबर शोधणे
👇

*PIN* Code म्हणजे काय व 

 पिनकोडच्या मागचं लॉजिक खालीलप्रमाने आहे : 

पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर होय. १५ ऑगस्ट १९७२ पासून पिनकोड भारतामध्ये अस्तित्वात आले. हा तो काळ होता जेव्हा संवादाचे मुख्य माध्यम हे पत्रव्यवहार होते. हा पत्रव्यवहार अधिक सुलभ व्हावा म्हणून ही पिनकोडची संकल्पना अस्तित्वात आली. पत्रावर पिनकोड लिहिला असल्याकारणाने पत्र योग्य जागी पोचलं जातं, ही गोष्ट तुम्हाला देखील माहिती आहे. परंतु तुम्हाला या पिनकोड मागचं लॉजिक माहिती आहे का? हे पिनकोड कसे ठरवले गेले हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहित, तर आज जाणून घ्या. 

पिनकोडचा पहिला क्रमांक विभाग कोणता आहे ते दर्शवतो 

उत्तर- १ आणि २ 
 पश्चिम- २ आणि ४ 
 दक्षिण- ५ आणि ६ 
 पूर्व- ७ आणि ८ 
 आर्मी- ९ 

एकूण ९ पिन क्षेत्रे आहेत ज्यापैकी ८ क्रमांक भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी वापरली जातात तर ९ हा क्रमांक सैन्यासाठी स्वतंत्ररित्या वापरला जातो. 

पिनकोडचा दुसरा क्रमांक राज्याचा उपविभाग किंवा पोस्टल क्षेत्र दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले दोन क्रमांक खालील क्षेत्रे दर्शवतात. 

पिनकोडचा तिसरा क्रमांक जिल्हा कोणता आहे ते दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले तीन क्रमांक जिल्हा दर्शवतात. 

पिनकोडचे शेवटचे तीन क्रमांक त्या जिल्हातील विभाग किंवा पोस्ट ऑफिसचे स्थान दर्शवतात जेथे पत्र पोचवायचे आहे. 

इथे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  मालवणचे उदाहरण घेऊया. 

मालवणचा पिनकोड आहे – ४१६६०६ 
 यामधील ४ हा क्रमांक पश्चिम विभाग दर्शवतो. पहिले दोन क्रमांक म्हणजे ४१ हा क्रमांक हे क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे असे दर्शवते. पहिले तीन क्रमांक म्हणजे ४१६ हा क्रमांक हे क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे असे दर्शवतो. आणि उरलेले शेवटचे तीन क्रमांक अर्थात ६०६ हा क्रमांक मालवण पोस्ट ऑफिसमध्ये पत्र पोचवायचे आहे असे दर्शवतो.

👇

ऑनलाईन पिन कोड शोधणे

👇
.
पिन कोड शोधणं
उत्तर लिहिले · 27/7/2017
कर्म · 28530
1
४१५००१ हा सातारा पिन कोड आहे.
उत्तर लिहिले · 26/7/2017
कर्म · 210095
0

सातारा जिल्ह्यासाठी पिन कोड खालीलप्रमाणे आहेत:

  • सातारा शहर: ४१५००१
  • कराड: ४१५११०
  • वाई: ४१२८०३
  • फलटण: ४१५५२३

कृपया लक्षात घ्या की हे फक्त काही पिन कोड आहेत आणि सातारा जिल्ह्यात अनेक गावे आणि पोस्ट ऑफिस आहेत ज्यांचे पिन कोड वेगळे असू शकतात. विशिष्ट पिन कोड शोधण्यासाठी, तुम्ही इंडिया पोस्ट (https://www.indiapost.gov.in/) वेबसाइटला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5280

Related Questions

रशियामधील अंतर्गत या दहावीची कारणे थोडक्यात लिहा?
भारताच्या शेजारील देश?
नंदूरबार जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
भारतका छोटा राज्या कौनसा है?
सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे?
महाराष्ट्राला किती लांब समुद्रकिनारा लाभला आहे?