5 उत्तरे
5 answers

भारताचे क्षेत्रफळ किती?

13
♥ भारताच्या सीमा व क्षेत्रफळ :-
=================
भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो.
भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे.
♥ जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार
१) रशिया २) कँनडा ३) चीन ४) अमेरिका ५) ब्राझील ६) ऑस्ट्रेलिया व ७) भारत

भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी. आहे, तर एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी. आहे.
भारताची जल सीमा किना–यापासुन १२ नॉटिकल मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. यानंतर आंध्रप्रदेशाचा क्रमांक लागतो.

भारतास एकूण १५,१६८ कि.मी. लांबीची भू-सीमा लाभली आहे. ती खालील प्रमाणे-

♥ संबंधित देश — सीमेचे नाव — लांबी ♥
=======================

चीन — मॅकमोहन रेषा — ४२५०कि.मी.

नेपाल — १०५० कि.मी.
पाकिस्थान — रॅडक्लिफ लाईन — ४०९०कि.मी.
भूतान — ०४७५ कि.मी.
बांग्लादेश — रॅडक्लिफ लाईन — ३९१०कि.मी.
अफगाणिस्थान—ब्रम्हदेश— १४५०कि.मी.
========================
भारताच्या दक्षिण बाजूस हिंदी महासागर आहे. पश्चिम बाजूस अरबी समुद्र तर पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. समुद्रमार्गे श्रीलंका हा देश भारतास सर्वात जवळ आहे. मन्नारचे आखात व पाल्कच्या सामुद्रधुनीमुळ श्रीलंका भारतापासून वेगळी झाली आहे.


धन्यवाद🌹
उत्तर लिहिले · 24/7/2017
कर्म · 28530
1
भारत हा दक्षिण आशिया मधील एक प्रमुख देश  आहे.हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे.
भारत क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.की.मी आहे (२.३%पाकिस्तान व चीनशी १,२०,८४९ वर्ग किमी वादग्रस्त विभाग मिळून).आशियाखंडातील तिसर्या क्रमांकाचा देश आहे.भारताची लांबी.(दक्षिण-उतर) - ३२१४ कि.मीभारताची रुंदी (पूर्व-पच्छिम) - २,९३३ कि.मी
उत्तर लिहिले · 24/7/2017
कर्म · 210095
0

भारताचे एकूण क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौरस किलोमीटर आहे.

हे क्षेत्रफळ जगाच्या एकूण भूभागाच्या २.४% आहे.

यामध्ये ७,००० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारपट्टीचा भाग देखील आहे.

भारताच्या भूभागामध्ये विविध प्रकारचे भौगोलिक प्रदेश आहेत.

  1. उत्तर पर्वतीय प्रदेश (हिमालय)
  2. विस्तीर्ण मैदानी प्रदेश
  3. वाळवंटी प्रदेश
  4. द्वीपकल्पीय पठार
  5. समुद्रकिनारपट्टीचे प्रदेश
  6. बेटे
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2100

Related Questions

श्रीकांत चंद्रकांत जाधव यांच्याबद्दल माहिती द्या?
जगातील सर्वात लहान माणूस किंवा स्त्री कोण आहे?
जगात सर्वात जास्त उंच माणूस कोण?
जगातील सर्वात चांगली भाषा कोणती?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील. सर्वात मोठा जिल्हा कोणता?
भारतात किती तालुके?
राम चा उलट काय होतो?