शब्दाचा अर्थ मराठी कविता कविता साहित्य

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचे स्पष्टीकरण काय?

5 उत्तरे
5 answers

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचे स्पष्टीकरण काय?

7
कृपया संपूर्ण कविता वाचून घ्यावी,


देणाऱ्याने देत जावे ...विंदा करंदीकर - एक जीवनकवी !

आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात ; जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. अशा वेळी जगणे परावलंबी होऊन जाते. अशा विमनस्क अवस्थेत मनाला उभारी मिळणे खूप आवश्यक होउन जाते अन्यथा दैनंदिन जीवनातील रुक्ष जीवनशैलीतली व्यावहारिक शुष्कता मनात खोल रुजते अन माणूसपणच हरवून जाते. अशा अवस्थेत जीवनाला वळण देणारी एखादी भव्य कविता समोर आली तर जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलून जातात. विंदा करंदीकरांची अशीच एक कविता आहे जी जगणे सुसह्य करते अन जीवनातले नवे अर्थ नव्या संदर्भाने समोर मांडते. कवितेचे नावच आहे 'घेता'. यावरून यातील आशयाची कल्पना यावी. अगदी उदात्त आशयाची ही कविता वाचकाला समृद्ध करून जाते यात संदेह नाही...

देणार्‍याने देत जावे

"देणार्‍याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी

वेड्यापिशा ढगाकडून

वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे."


या कवितेत त्यांनी कोणाकडून काय घ्यावे याचे जे वर्णन केले आहे ते त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. अत्यंत लालित्यपूर्ण अशा या वर्णनात वीररस आणि भक्तीरस यांचा मनोहारी संगम आहे, शिवाय त्यात गेयतादेखील आहे. 'हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी' हे वर्णन प्रत्येक मरगळलेल्या मनगटात रग भरणारे आहे, यात एक अलौकिक जोश आहे. जीवनातल्या त्याच त्या गोष्टींना कंटाळून एक साचेबद्ध आकार आयुष्याला जेंव्हा प्राप्त होतो तेंव्हा 'वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे' अशी अभूतपूर्व शिकवण इथे आहे. 'रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे' असे सांगताना कवी अगदी हळुवारपणे माती आणि रक्ताचे नाते अधोरेखित करतात. मनापासून ते नात्यापर्यंतची कुठलीही समस्या समोर आली तर तिचे मूळ आपल्या मनात - पर्यायाने विचारांच्या अंकुरात याचे उत्तर सापडते. पण हे उत्तर नजरेस पडण्यासाठी मातीशी नाळ घट्ट पाहिजे. म्हणून रक्तातल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे असे कवी म्हणतात. जीवनातला जोश आणि होश दोन्ही कमी होत चालल्यावर 'उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी' असं बेभान पण संयत सांगणं इथे आहे. 'भरलेल्याश्या भिमेकडून तुकोबाची माळ घ्यावी' या पंक्तीतून कवितेचा बाज बदलतो आणि आशय अधिक गडद होतो.
भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले की मग येते ती निवृत्ती अन त्यातून देण्याची भावना आपल्या ठायी निर्माण होते. ही भावनाच द्यायला शिकवते अन शेवटी विंदा कवितेला कलाटणी देतात अन लिहितात की,
'घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे !"

ही कविता मरगळलेल्या मनाला उभारी देते, पिचलेल्या मनगटात जोश भरते आणि अनेकविध प्रश्न माथी मिरवत जगण्याचे अर्थ हुडकत फिरणारया संभ्रमित मनाला उत्तुंग असे प्रेरणादायी उत्तर देते.
उत्तर लिहिले · 24/7/2017
कर्म · 28530
2
देणा-याने देत जावे घेनाय्राने  घेत जावे घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावे.

स्पष्टीकरण -

देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देणाऱ्याचा दानशुरपणा आपण आपल्या अंगी बाणावा.

म्हणजेच देणाऱ्यापप्रमाणे आपण सुद्धा इतरांना देणारे व्हावे.
उत्तर लिहिले · 24/7/2017
कर्म · 80330
0

'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' या प्रसिद्ध ओळी वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील आहेत. या ओळींचा अर्थ अनेक प्रकारे लावला जातो, त्यापैकी काही प्रमुख अर्थ खालीलप्रमाणे आहेत:

*परोपकार आणि सामाजिक बांधिलकी:

  • या ओळींमध्ये देणारा म्हणजे समाजाला सतत काहीतरी देणारा व्यक्ती आहे. तो ज्ञान, संपत्ती, मदत किंवा इतर काहीही देऊ शकतो.
  • घेणारा म्हणजे ज्याला गरज आहे, जो दुर्बळ आहे आणि ज्याला मदतीची अपेक्षा आहे.
  • कवी म्हणतात की, देणाऱ्याने नेहमी देत राहावे आणि घेणाऱ्याने घेत राहावे. एक दिवस असा येतो की घेणारा माणूस देणाऱ्याच्या बरोबरीचा होतो, म्हणजे तो स्वतः दुसऱ्यांना मदत करण्यास सक्षम होतो.
  • याचा अर्थ असा आहे की, आपण समाजाला सतत काहीतरी देत राहिले पाहिजे आणि गरजूंना मदत करत राहिले पाहिजे.

*कृतज्ञता आणि परतफेड:

  • घेणाऱ्याने फक्त घेतच राहू नये, तर एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, म्हणजे देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्याला त्याच्या कामात मदत करावी.
  • याचा अर्थ असा होतो की, ज्यांनी आपल्याला मदत केली, त्यांचे आभार मानावेत आणि शक्य असल्यास त्यांना मदत करावी.

*सामर्थ्य आणि सक्षमीकरण:

  • घेणारा जेव्हा देणाऱ्याचे हात घेतो, तेव्हा तो स्वतः सक्षम होतो आणि दुसऱ्यांना मदत करण्यास तयार होतो.
  • याचा अर्थ असा आहे की, मदतीवर अवलंबून न राहता स्वतःला सक्षम बनवा आणि इतरांनाही सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा.

*मानवता आणि प्रेम:

  • या ओळी आपल्याला प्रेम, सहानुभूती आणि मानवतेचा संदेश देतात.
  • समाजात एकमेकांना मदत करणे, प्रेमळ व्यवहार करणे आणि आपुलकी जपणे हे महत्त्वाचे आहे.

**संदर्भ:**

  • वि. वा. शिरवाडकर यांचे ‘नटसम्राट’ नाटक

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1040

Related Questions

एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले?
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेचा परामर्श द्या?
लोककथांचे वाड्मयीन सौंदर्य विशद करा?
लोकसाहित्याची स्वरूप व व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करा?
मराठी बालपुस्तकांचा इतिहास थोडक्यात स्पष्ट करा?
साहित्याचे प्रकार लिहा?