अन्न
वजन-उंची
ओट्स
आहार
मी एका उत्तरामध्ये वाचले की वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जेवणात ओट्सचा वापर करा. हे ओट्स काय आहे?
2 उत्तरे
2
answers
मी एका उत्तरामध्ये वाचले की वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जेवणात ओट्सचा वापर करा. हे ओट्स काय आहे?
5
Answer link
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रीय घरांमध्ये मऊभात, मेतकूट, तूप, पापड किंवा पोहे, सांजा, थालीपीठ, धिरडी असा नाश्ता असायचा.
माणसं आरोग्याच्या दृष्टीनं जागरूक झाल्यावर आणि परदेशाचं वारं आपल्याकडे आल्यावर ‘ब्रेकफास्ट सिरीयल्स’चा जमाना आला. त्यात कॉर्नफ्लेक्सनं बाजी मारली होती; पण अलिकडे मात्र ओटमील, रोल्ड ओट्स वगैरे खाण्याकडे अनेकांचा कल दिसतो.
हे ‘ओट्स’ म्हणजे काहीतरी मॉडर्न असं अनेकांना वाटतं. पण तसं नाही, ‘ओट्स’ म्हणजे मराठीत ‘जव’.
‘अवेना सतीवा’ असं शास्त्रीय नाव असलेले ‘ओट्स’. इजिप्तमधील उत्खननात ख्रिस्तपूर्व २000 मधील अवशेषात सापडले आहेत.
इतर धान्यांच्या कणसात जसे साल असलेले दाणे असतात, तशीच रचना ओट्सच्या बाबतीतही असते. ओट्सच्या दाण्यांना ओटग्रोट्स असं म्हणतात. हे दाणे दळून केलेल्या पिठाला ‘ओटमील’ असं म्हणतात. ओटमील आणि ओटब्रॅन म्हणजे ओट्सवरचा कोंडा. यांची खासियत म्हणजे त्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेला चोथा भरपूर प्रमाणात असतो. यापैकी निम्मा चोथा पाण्यात विरघळणारा आणि उरलेला निम्मा न विरघळणारा असतो. पाण्यात विरघळणार्या चोथ्यामध्ये बीटा ग्लुकॅन्स नावाचा घटक असतो, ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विघातक कोलेस्टेरॉल कमी होतं आणि चांगलं मात्र तसंच राहतं. ओटमीलमध्ये असाही घटक आहे, ज्यामुळे त्याला अँण्टिऑक्सिडंट हा गुणधर्म प्राप्त होतो.
ओट्समधील विरघळणार्या चोथ्यामधील बीटा ग्लुकॅन पोटात गेल्यावर थलथलीतपणा निर्माण करतं. त्यामुळे जठरातील आणि लहान आतड्यातील अन्नामध्ये घट्टपणा येतो. त्यामुळे पचन हळूहळू होऊन रक्तामध्ये ग्लुकोजचं शोषण हळूहळू होतं. त्यामुळे जेवण झाल्यावर रक्तातील साखरेची पातळी लगेच खूप वाढत नाही आणि जेवणापूर्वीची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. साध्या शब्दात सांगायचं तर मधुमेहींच्या आहारात ओट्स असतील, तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.
‘ओट्स’मधील काही घटकांमुळे ब्रेस्ट कॅन्सरसारख्या हार्मोन्स संबंधित रोगांची शक्यता कमी होते. प्रोस्टेट, ओव्हेरियन कॅन्सरच्या बाबतीतही हे होईल, असं वैज्ञानिकांना वाटतं. आंतरराष्ट्रीय संशोधनातील निष्कर्षांनुसार चोथ्याचं प्रमाण खूप असलेला ओट्ससारखा आहार असलेल्या स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी असते. त्यामुळे त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी संभवतो. ‘ओट्स’मधील न विरघळणार्या चोथ्यामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यताही कमी होते. रोज ओट्स खाल्ल्याने त्यातील विरघळणार्या चोथ्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहण्यास मदत होते.
ओट्समधील पाण्यात न विरघळणारा चोथा स्पंजासारखा असतो. स्वत:च्या वजनाच्या कित्येक पट जास्त वजन असलेला द्रव तो शोषून घेतो. त्यामुळे मोठय़ा आतड्यातील टाकाऊ पदार्थ (शौच) जड होतो, फुगतो. त्यामुळे मलोत्सर्जन सुलभ होतं. ओट्समधला पाण्यात विरघळणारा चोथा पोटामध्ये गेल्यावर थलथलीत पदार्थ निर्माण होतो, त्यामुळे पचन हळूहळू होतं. त्यामुळे लवकर भूक लागत नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने ओट्समधील प्रथिनांची तुलना मांस, दूध आणि अंड्यामधील पूर्ण प्रथिनांशी, सोयाबीनमधल्या प्रथिनांशी करून त्यांना समान गुणधर्मी ठरवलं आहे. सर्व अपरिहार्य अमीनो आम्लं असल्यानं ओट्समधील प्रथिनांची गुणवत्ता खूप वाढते. ही प्रथिनं शरीराचं कार्य उत्तम आणि जलद पद्धतीनं होण्यास मदत करतात.
- धन्यवाद

0
Answer link
ओट्स (Oats) हे एक धान्य आहे, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे तृणधान्य 'एव्हिना सॅटिवा' नावाच्या वनस्पतीपासून मिळते. ओट्समध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि ते वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
ओट्सचे फायदे:
- वजन कमी करण्यासाठी: ओट्समध्ये फायबर (Fiber) भरपूर असल्याने ते खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
- वजन वाढवण्यासाठी: ओट्समध्ये कॅलरीज (Calories) आणि कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) भरपूर असतात, ज्यामुळे ते वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
- पोषक तत्वे: ओट्समध्ये लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक (Iron, Magnesium, Phosphorus and Zinc) यांसारखी खनिजे असतात, जी आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
ओट्स खाण्याचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही ओट्स दुधात किंवा पाण्यात शिजवून खाऊ शकता. तसेच, ओट्सचे लाडू, उपमा किंवा डोसा असे विविध पदार्थ बनवून देखील त्याचा आहारात समावेश करू शकता.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: