शब्दाचा अर्थ ऑटोकॅड तंत्रज्ञान

ऑटोकॅड ड्राफ्ट्समन म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

ऑटोकॅड ड्राफ्ट्समन म्हणजे काय?

4
खाजगी कंपनी किंवा फार्म मध्ये तसेच कन्स्ट्रक्शन फील्ड     
मध्ये आजच्या युगात autocad ड्राफ्ट्समन ची फार मोठी गरज आहे, पूर्वीच्या काळी संगणक नव्हते तेंव्हा कोणतेही यांत्रिक अथवा अर्चिटेक डिझाईन बनवण्यासाठी पारंपरिक पद्धत वापरत, पारंपरिक पद्धतीमध्ये ट्रेसपपेर,पेन्सिल आणि इतर साहित्य वापरून स्वतः line to line डिझाईन बनवावे लागत असे,ही पद्धत तशी वेळखाऊ आणि कमी उत्पादन देणारी होती,
          पण आजच्या युगात संगणकामुळे कित्येक अवघड आणि वेळखाऊ कामे सोपी झाली आहेत,
त्यापैकीच एक autocad draftsman चे काम आहे,
Autocad हे एक drafting साठिचे उत्तम सॉफ्टवेर आहे, याचा वापर करून ड्राफ्ट्समन वेगवेगळ्या प्रकारची डिझाइन तयार करत असतो,तसेच त्याची प्रिंट प्रिंटरच्या किंवा प्लॉटरच्या साहाय्याने घेतो.
       थोडक्यात काय तर संगणकावरील autocad सॉफ्टवेअर चा वापर करून जो डिझाईन तयार करतो त्याला autocad draftsman म्हणतात.
उत्तर लिहिले · 16/7/2017
कर्म · 205
0
मी तुम्हाला मदत करू शकेन. ऑटो कॅड ड्राफ्ट्समन (AutoCAD Draughtsman) म्हणजे एक असा व्यक्ती जो AutoCAD सॉफ्टवेअर वापरून तांत्रिक रेखाचित्रे (Technical Drawings) तयार करतो.

ऑटोकॅड ड्राफ्ट्समनची भूमिका:

  • इंजिनियर आणि आर्किटेक्ट यांनी दिलेल्या डिझाइननुसार रेखाचित्रे बनवणे.
  • तांत्रिक स्पेसिफिकेशन्स (Technical Specifications) आणि मानकांचे (Standards) पालन करणे.
  • विविध क्षेत्रांसाठी रेखाचित्रे तयार करणे, जसे की बांधकाम, उत्पादन, आणि अभियांत्रिकी.
  • रेखाचित्रांमध्ये सुधारणा करणे आणि अंतिम रूप देणे.

आवश्यक कौशल्ये:

  • AutoCAD सॉफ्टवेअरचे ज्ञान.
  • तांत्रिक रेखाचित्रण (Technical Drawing) कौशल्ये.
  • गणितीय आणि भूमितीय संकल्पनांचे ज्ञान.
  • संबंधित क्षेत्रातील मानकांची माहिती.
  • बारीक तपशीलांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता.

उपयुक्तता:

  • बांधकाम क्षेत्रात इमारती आणि इतर संरचनांचे रेखाचित्रण करण्यासाठी.
  • उत्पादन क्षेत्रात उत्पादन भागांचे रेखाचित्रण करण्यासाठी.
  • अभियांत्रिकी क्षेत्रात विविध उपकरणांचे आणि प्रणालींचे रेखाचित्रण करण्यासाठी.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5060

Related Questions

ऑटोकॅड 2013 मध्ये रबर शीट कशी तयार करायची?
ऑटोकॅड (AutoCAD) केल्यावर काय करावे?
कोणाला ऑटोकॅडवर काही ड्रॉइंग काढायचे असेल तर मला संपर्क करा?