6 उत्तरे
6 answers

आई म्हणजे काय ?

13
बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती


"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

 तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..



पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

 कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??


तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

 पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.


आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो


आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,


ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔



हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....✍🏻


या मेसेज़ला शेयर करायला कोणतीच शपथ नाहिये.
आवडला तर नक्कीच शेयर करा..🤗



R a aje
उत्तर लिहिले · 12/7/2017
कर्म · 65405
9
.             *आई म्हणजे काय*?


आई म्हणजे आई असते!

आई म्हणजे ममता असते!

मायेची पाखरण करणारी एक स्त्री म्हणजे आई असते!

त्याच्या पाळण पोषणासाठी कष्टाचा डोंगर उचलणारी आई असते!

आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी, स्वताची चाळणी करून घेणारी आई असते!

एखादी स्त्री जेव्हा स्वतःच्या मुलाला(मुलीला) जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते, आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या बाळाची आई असते!

स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई असते!


आई साठी काय लिहू?

आई साठी कसे लिहू?

आई साठी पुरतील एवढे,

शब्द नाहीत कोठे लिहू?



मायेचा सागर आहे आई!

प्रेमाची घागर आहे आई!

यशवंत दिनकर पेंढरकर यांनी "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगितलेली आहे.🙏


मराठीमध्ये आई या विषयावर अनेक कविता रचलेल्या आहेत.
त्यातील एक श्री. फ. मु. शिंदे यांनी लिहिलेली "आई" ही अमूल्य कविता वाचा.

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही!

जत्रा पांगते पालं उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात

आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही!

आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतली जागा!

घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

पिकं येतात जातात
माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान'
दिसत नसलं डोळ्यांना तरी
खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण!

याहून का निराळी असते आई?
ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?

आई खरंच काय असते?
लेकराची माय असते.
वासराची गाय असते.
दुधाची साय असते.
लंगड्याचा पाय असते.
धरणीची ठाय असते.

आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!❤





शेवटी~~~

आई, हजार जन्म घेतले तरी

एका जन्माचे ऋण फीटणार नाही!

आई, लाख चुका होतील मज कडून

तुझं समजावनं मिटणार नाही!✍
उत्तर लिहिले · 4/12/2017
कर्म · 10420
0

आई म्हणजे एक अशी व्यक्ती जी आपल्याला जन्म देते, आपले पालनपोषण करते आणि आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते.

आईच्या काही महत्वाच्या भूमिका:

  • ती आपली पहिली शिक्षक असते.
  • ती आपली रक्षक असते.
  • ती आपली मैत्रीण असते.
  • ती आपल्याला चांगले संस्कार देते.
  • ती आपल्याला जगायला शिकवते.

आई ही एक प्रेमळ, काळजी घेणारी आणि त्याग करणारी व्यक्ती असते. ती आपल्या कुटुंबासाठी नेहमीच समर्पित असते.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

युनिसेफParenting (इंग्रजी)
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1080

Related Questions

अस्पृश्य म्हणजे नेमके कोण?
समाजवादी पाच मुलतत्वे थोडक्यात लिहा?
आधुनिक समाजात पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत का?
जात आणि वर्ग?
सामाजिक वैशिष्ट्ये काय आहेत?
कुटुंब सामाजिक करण्याचे साधन आहे का?
दलित शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो?