3 उत्तरे
3
answers
न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का बांधली असते?
15
Answer link
न्यायदेवता आंधळी आहे . ती फक्त नियम आणि पुरवयनाच्या आधारे न्याय देते असे आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल. न्यायदेवतेची मूर्ती पहिली तर डोळ्यावर काली पट्टी बांधलेली दिसते. हि संकल्पना मूळ ग्रीक मधील टेनिस या न्यायदेवतेपासून आली आहे.
न्यायदेवतेच्या हातात तराजू आहे आणि डोळे बांधलेलं आहेत. न्यायदेवता न्याय देताना राजकीय, सामाजिक, आर्थिक बाबींमुळे विचलित न होता त्या बाबींकडे न बघता समान न्याय देते हे दर्शवण्यासाठी डोळ्यावर पट्टी असते. आणि हातात तराजू आहे कारण डोळे बांधून न्याय देताना तराजू मध्ये पुरावे आणि नियमांच्या आधारे योग्य न्याय दिला जातो हे प्रतीत होते. न्यायदेवतेसमोर सर्व समान आहेत आणि सर्वाना समान न्याय दिला जातो हे दर्शवण्यासाठी या संकल्पना तयार केल्या आहेत.
4
Answer link
न्यायदेवता ही निःपक्षपातीपणे निर्णय देत असते, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण निरपराधी व्यक्तीस सजा होऊ नये हे ध्येय आहे, गुन्हा करणारा व दावेदार यांचे दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून जो योग्य निर्णय असेल तो न्यायदेवता देत असते, त्यात कुठलाही भेदभाव ठेवत नाही, हा भेदभाव न्यायदेवतेला दिसत नाही त्याचे प्रतीक म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते.
0
Answer link
न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असण्याचे कारण खालीलप्रमाणे आहे:
- अंधत्व: न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, कारण न्याय करताना कोणताही भेदभाव होऊ नये. न्याय सर्वांसाठी सारखाच असावा, मग तो गरीब असो वा श्रीमंत, उच्चवर्णीय असो वा निम्न वर्णीय. कोणाच्याही Background चा विचार न करता न्याय नि:पक्षपातीपणे व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
- समतोल: डोळ्यावर पट्टी बांधणे हे न्यायाच्या मूलभूत सिद्धांताचे प्रतीक आहे, जे कायद्याच्या दृष्टीने समानता दर्शवते.
- वस्तुनिष्ठता: न्यायमूर्तींनी केवळ वस्तुस्थिती आणि कायद्यावर आधारित निर्णय घ्यावा, यासाठी न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते.
अतिरिक्त माहिती:
न्यायदेवतेच्या हातात असलेले तराजू हे न्यायाचे वजन आणि सत्यता दर्शवतात. याचा अर्थ असा आहे की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले जाते आणि मग कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेतला जातो.
मला आशा आहे की हे उत्तर तुम्हाला उपयुक्त वाटेल.