जिल्हा नावाचा उगम इतिहास

धुळे जिल्ह्याचे नाव धुळे कसे पडले?

3 उत्तरे
3 answers

धुळे जिल्ह्याचे नाव धुळे कसे पडले?

6
प्राचीन ग्रंथांमध्ये धुळ्याचा उल्लेख धूलिकापट्टनम असा आहे. धनगर, गवळी समाजाच्या धुळोबा ह्या श्रद्धास्थानावरून धुळे नाव पडले असावे. तर पेशव्यांनी त्यांच्या एका ताळेबंदात धुळे म्हणजेच महमदपूर असे म्हटले आहे.
उत्तर लिहिले · 4/7/2017
कर्म · 4795
4
प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई रामायण-महाभारतामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंर यादव काळात राजा सेऊण चंद्राच्या नंतर सेऊण देश या नावानेही प्रचलीत होता. महाभारताच्या भिष्म पर्वात विविध प्रदेशांचा गोमता, मंदका, खंडा, विदर्भा व रुपवाहिका असा उल्लेख आढळतो. त्यातील खंडा म्हणजेच खानदेश असा अर्थ पाश्चात्य इतिहासकारांनी लावलेला आहे, तर काही अभ्यासकांच्या मते खानदेशचे पुर्वीचे नाव कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश असे होते. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशात थाळनेरचा दुसरा फारुकी राजामलिक याला खान ही पदवी बहाल केली होती व त्यावरुन खानदेश असे नाव पडले.ब्रिटीश काळात धुळे व जळगाव हे सध्याचे जिल्हे मिळून खानदेश हा एकच जिल्हा होता.नंतरच्या काळात खानदेशाचे पूर्व खानदेश व पश्र्चिम खानदेश असे दोन भाग करण्यात आले. १९६१ मध्ये पश्चिम खानदेशचे ‘धुळे जिल्हा’ असे नामकरण करण्यात आले. जिल्ह्याला पूर्वी धूलिया म्हणून ओळखले जाई. या क्षेत्राला रसिका पण म्हटले जाई. १९६० रोजी धुळे हे मुंबई राज्यातून महाराष्ट्रात आले. प्राचीन काळात अभीर किंवा अहीर राजे खानदेशात राज्य करत होते.
उत्तर लिहिले · 4/7/2017
कर्म · 210095
0

धुळे जिल्ह्याचे नाव धुळे कसे पडले याबद्दल काही मान्यता आहेत:

  • धुळे हे नाव 'धुळी' या शब्दावरून आले आहे. कारण या भागातील जमीन मुख्यतः पिवळसर, रेताड आणि धूलिकण असलेली आहे.
  • असेही मानले जाते की 'धुंडी' नावाच्या आदिवासी जमातीमुळे या शहराला धुळे नाव मिळाले.
  • इतिहासानुसार, खानदेशातील फारुकी राजवटीच्या काळात शहराला 'धुळीया' म्हणून ओळखले जात होते, जे कालांतराने धुळे झाले.

यापैकी नेमके कोणते कारण अधिकृत आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु या नावामागे स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि ऐतिहासिक संदर्भ असल्याचे दिसते.

अधिक माहितीसाठी, आपण धुळे जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळाला भेट देऊ शकता: धुळे जिल्हा

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5240

Related Questions

कोल्हापूरला कोल्हापूर नाव कसे पडले?
अलिबाग शहराला अलिबाग हे नाव कसे पडले?
चाळीसगाव हे नाव कसे पडले असावे?