4 उत्तरे
4
answers
गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला आणि कधी झाला? आता ते ठिकाण कोठे आहे?
7
Answer link
तथागत गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक, तत्त्वज्ञ होते. बुद्धांचे मूळ नाव ‘सिद्धार्थ’ होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला. त्यांना राहुल नावाचा त्यांना पुत्र झाला..


2
Answer link
गौतम बुद्धांचा जन्म जवळपास इसवी सन पूर्व ४०० वर्षे आधी नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. ते शाक्य कुळातील राजा शुद्धोधन यांचे सुपुत्र होते. त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ होते.
0
Answer link
गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स. पूर्व ५६३ मध्ये लुंबिनी येथे झाला.
जन्मस्थळ: लुंबिनी
जन्मवर्ष: इ.स. पूर्व ५६३
लुंबिनी हे सध्या नेपाळमध्ये आहे. हे ठिकाण नेपाळच्या रूपन्देही जिल्ह्यात आहे.
लुंबिनी हे बौद्ध धर्मातील एक महत्वाचे तीर्थस्थान आहे. येथे मायादेवी मंदिर आहे, जिथे राणी मायादेवीने सिद्धार्थ गौतमला जन्म दिला होता.
अधिक माहितीसाठी: