5 उत्तरे
5 answers

पाऊस कधी पडेल?

7
आकाशातून पडणारा पाऊस हा फारच अनियमित असतो. तो कोठे, किती व कधी पडेल, या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवणे, ही आणखीनच कठीण बाब आहे, असे या क्षेत्रातले जाणकार म्हणतात. पर्जन्यमापकाच्या मदतीने चोवीस तासांतील, महिन्यातील, वर्षभरातील पाऊस मोजला जातो.

दरवर्षी एखाद्या ठिकाणी पडणारा पाऊस हा सारखा नसतो. साधारणत: तीस ते पस्तीस वर्षांच्या वार्षकि पर्जन्यमानावरून सरासरी वार्षकि पावसाचे प्रमाण काढले जाते. ज्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, त्याला तुटीचे आणि ज्या वर्षी जास्त पाऊस पडतो, त्याला चांगल्या पावसाचे वर्ष संबोधले जाते. ज्या वर्षी सरासरीइतकाच पाऊस पडतो, त्याला पावसाचे सर्वसाधारण वर्ष म्हटले जाते.

भारतात वेगवेगळ्या प्रदेशांत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण फारच असमान आहे.  ईशान्य भारतात चेरापुंजी येथे पडणाऱ्या पावसाची वार्षकि सरासरी १२००० मिलिमीटरच्या आसपास आहे, तर देशाच्या वायव्य भागात राजस्थानमध्ये पावसाची सरासरी १०० मिलिमीटरच्या जवळपास आहे.

पाऊस पडणे ही पूर्णत: नसíगक प्रक्रिया आहे. पावसाने कुठे आणि किती पडावे, यावर आपले नियंत्रण नाही. पण पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या त्या विभागात सरासरी पाऊस पडतो किती? याचे मोजमाप करणे आवश्यक आहेच पण जमिनीवर पडणारा पाऊस जातो कुठे? त्याची विभागणी कशी होते, याचेही मोजमाप करणे महत्त्वाचे ठरते.

जमिनीवर पडणारा पाऊस अनेक घटकांमध्ये विभागला जातो. पडणाऱ्या पावसाचा मोठा घटक हा बाष्पीभवन आहे. बाष्पीभवनामुळेच पाणी परत आकाशामध्ये जाते. त्यातील दुसरा महत्त्वाचा घटक जमिनीवरून वाहणाऱ्या पावसाचा आहे. याला अपधाव (रनऑफ) असे म्हटले जाते. तिसरा घटक जमिनीमध्ये मुरणारा आणि भूजलात रूपांत होणारा आहे. चवथा घटक हा पृष्ठभागावरील मातीच्या कणामध्ये अडकून राहणारा आहे.  याला मातीची आद्र्रता (सॉइल मॉइश्चर) म्हटले जाते; आणि पाचवा घटक म्हणजे वातावरणातील आद्र्रता हा आहे. बाष्पीभवन या घटकामध्ये जमिनीतून, वनस्पतीद्वारे आणि जलसाठय़ातून होणाऱ्या पाण्याच्या ऱ्हासाचा समावेश असतो.

या पाचही घटकांचे प्रमाण हे भूस्तर रचना, मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, वृक्षाच्छादन, हवामान, इत्यादींवर अवलंबून असतो. बाष्पीभवनाद्वारे होणारा ऱ्हास  पावसाच्या निम्म्याइतका असू शकतो.लवकरच पाऊस येईल आणि बलीराजासः सगळ्यांच्या चिंता दूर होतील अशी अशा बाळगूया.
उत्तर लिहिले · 4/7/2017
कर्म · 4795
5


​*_🙄हे मंदिर आधीच सांगतं 'कधी येणार पाऊस', वैज्ञानिकांनाही सोडवता आलं नाही अजून कोडं!_*


_भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांनी त्यांच्या आत अनेक रहस्य दडवून ठेवले आहेत. असंच एक मंदिर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आहे. असे म्हणतात की, हे मंदिर पावसाची योग्य भविष्यवाणी करतं. तसेच असेही म्हटले जाते की, जर पाऊस येणार असेल तर यां मंदिराचं छत कडक उन्हातही टपकू लागतं आणि पावसाला सुरुवात होताच या मंदिराच्या छतातून पाणी टपकणं बंद होतं._

*_🤔कोणते आहे हे मंदिर?_*
हे मंदिर कानपूरच्या भीतरगांव विकासखंडापासून तीन किमी असलेल्या बेहटा गांवात आहे. हे मंदिर भगवान जगन्नाथ यांचं प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात भगवान जगन्नाथ, बलदाऊ आणि सुभद्रा यांच्या मूर्ती आाहेत. प्रांगणात सूर्यदेव आणि पद्मनाभन यांच्या मूर्ती आहेत. जगन्नाथ पुरीप्रमाणे या गावातही भगवान जगन्नाथाची यात्रा काढतात. येथील लोकांची मंदिरावर फार श्रद्धा आहे. लोक दर्शनासाठी दूरुन येतात.

*_🤔काय आहे नेमके प्रकरण?_*
येथील लोक सांगतात की, पाऊस होण्याच्या सहा-सात दिवसांपूर्वी मंदिराच्या छतातून पाण्याचे थेंब टपकू लागतात. इतकेच नाही तर ते सांगतात की, ज्या आकाराचे थेंब टपकतात त्याच आधारावर पाऊस होतो. यात हैराण करणारी बाब ही आहे की, इथे जशीही पावसाला सुरुवात होते, मंदिराचं छत आतून पूर्णपणे कोरडं होतं.हे मंदिर किती जुनं आहे आणि याच्या छतातून पाणी कसं टपकतं किंवा बंद होतं याची माहिती आजपर्यंत मिळू शकलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिराचे पुजारी सांगतात की, पुरातत्त्व विभागाचे लोक आणि वैज्ञानिका अनेकदा इथे येऊन गेलेत, पण या रहस्याची माहिती मिळवण्यात अपयशी ठरले.

*_📍पुरातत्व विभागाला केवळ इतकंच माहीत आहे की, या मंदिराचा जीर्णोद्धार ११व्या शतकात करण्यात आलं होतं. या मंदिराची बनावट एखाद्या बौद्ध मठाप्रमाणे आहे. याच्या भींती १४ फूट जाड आहेत. तसेच हे मंदिर सम्राट अशोक यांच्या काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो._*
उत्तर लिहिले · 7/4/2019
कर्म · 569245
0

मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) आहे आणि माझ्याकडे रिअल-टाइम (real-time) हवामानाचा डेटा नाही. त्यामुळे, मी तुम्हाला नक्की कधी पाऊस पडेल हे सांगू शकत नाही.

तथापि, तुम्ही खालील स्त्रोतांचा वापर करून तुमच्या शहरातील पावसाची शक्यता तपासू शकता:

  • IMD (India Meteorological Department): IMD हे भारत सरकारचे अधिकृत हवामान विभाग आहे.
  • AccuWeather: AccuWeather
  • Weather.com: Weather.com

या वेबसाइट्स आणि ॲप्स तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील हवामानाचा अंदाज आणि पावसाची शक्यता याबद्दल माहिती देतील.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1620

Related Questions

सचेत ॲप हवामानाबद्दल काय माहिती देते?
हवामानासाठीचे संकेत देणारे ॲप्स कोणते आहेत?
सचेत ॲप व दामिनी ॲप बद्दल माहिती?
हवेतील बाष्पाचे संघनन होऊन काय तयार होते?
हिमाल‌याच्या क्षेत्रात कोनत्या स्वरूपाचा पाऊस पढ़ता ?
हिमालय पर्वताच्या शिखरावर सतत बर्फ का असतो?
भारत व ब्राझील यांचे स्थान, विस्तार व हवामान, तापमान, पर्जन्यमान या घटकांमध्ये होणारे देश आणि दिशानुसार बदल विश्वकोश किंवा इंटरनेटचा वापर करून सांगा?