शिक्षण कर्ज बँक प्रक्रिया अर्थ

एज्युकेशन लोन (शैक्षणिक कर्ज) घ्यायचे आहे, त्यासाठी काय प्रोसेस आहे?

4 उत्तरे
4 answers

एज्युकेशन लोन (शैक्षणिक कर्ज) घ्यायचे आहे, त्यासाठी काय प्रोसेस आहे?

29
एजुकेशन लोन द्यायचे कि नाही हे बँक तुमचे मेरिट पाहून ठरवते. तुम्हाला ज्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे आहे त्यात काही परीक्षा द्याव्या लागत असतील तर त्याचे मार्क्स मुख्यत्त्वे बँक पाहून घेते.
जर बँकेला तुमचे प्रोफाइलमध्ये मेरिट दिसले तर बँक लोन देण्यासाठी तयार होते.
(वरची अट फक्त कागदोपत्री असते, तुमच्याकडे चांगला जामीनदार असेल तर वरची अट लगेच मान्य होते).

भारतात शिक्षणासाठी जास्तीत जास्त १० लाख तर परदेशात शिक्षणासाठी जास्तीत जास्त २० लाख लोन मिळू शकते.

४ लाखापर्यंत कुठलेही तारण ठेवावे लागत नाही. फक्त तुमचे वडील किंवा पालक याना जामीनदार(Co-Borrower) म्हणून राहावे लागते. म्हणजे तुम्ही जर लोन फेडू शकला नाही तर त्यांना ते पैसे बँकेला फेडावे लागतील.

४ लाखाच्या पुढे जर लोन पाहिजे असेल तर तुम्हाला पालकांच्या जामीनदारी बरोबरच तारण म्हणून काहीतरी बँकेकडे गहाण ठेवावे लागेल. यात फ्लॅट, NA प्लॉट, बंगला, फिक्सड डिपॉजिट, ई. गोष्टी येतात.


कागदपत्रे:
१. तुमचे ID प्रूफ
२. सर्व मार्कशीट व सर्टिफिकेट्स
३. ऍडमिशन झालेले कॉलेजचे कंफर्मेशन आणि कॉलेजचे फी स्ट्रक्चर
४. जे जामीन(Co-Borrower) राहणार आहेत त्यांची सॅलरी स्लिप आणि ३ वर्षांचे टॅक्स रिटर्न
५. जर कर्ज ४ लाखांपेक्षा जास्त असेल तर तर गहाण ठेवणाऱ्या जागेचे ओरिजिनल कागदपत्र बँकेकडे जाम करावे लागतात.

कर्जावर व्याज जवळपास १४ % असते. आणि तुम्ही ज्या दिवशी कर्जाची रक्कम घेणार त्या दिवशीपासून व्याज चालू होते. नोकरीला लागल्यानंतर बँकेला हफ्ते चालू होतात. मग तुम्ही एकदाच किंवा काही वर्षांपर्यंत हे कर्ज हफ्त्या हफ्त्याने फेडू शकता.
उत्तर लिहिले · 4/7/2017
कर्म · 283280
2
प्रधानमंत्री योजनेच्या मुद्रा लोनमधून तुम्हाला शैक्षणिक कर्ज घेता येईल.
उत्तर लिहिले · 23/7/2018
कर्म · 565
0
शिक्षणासाठी कर्ज (Education Loan) घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे, याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. कर्जासाठी अर्ज:

  • बँकेत जा आणि एज्युकेशन लोनसाठी अर्ज करा.
  • अर्ज भरताना सर्व माहिती व्यवस्थित द्या.
  • २. कागदपत्रे (Documents):

    तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागतील, जसे की:

  • ओळखीचा पुरावा (Identity Proof): आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट
  • पत्त्याचा पुरावा (Address Proof): आधार कार्ड, लाईट बिल, रेशन कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे (Educational Documents): गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला (Income Proof):parents' salary slip, income tax returns
  • प्रवेश पत्राची प्रत (Admission Letter)
  • खर्च Estimatt (Cost Estimate of Study)
  • ३. कर्जाची मंजुरी:

  • बँक तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करते.
  • तुमची पात्रता आणि गरज पाहून बँक कर्ज मंजूर करते.
  • ४. कर्जाचे वितरण:

  • कर्ज मंजूर झाल्यावर, बँक तुमच्या शिक्षण संस्थेला (educational institution) थेट पैसे पाठवते.
  • काही वेळा, बँक तुमच्या खात्यात पैसे जमा करते, जेणेकरून तुम्ही ते खर्च करू शकता.
  • ५. परतफेड (Repayment):

  • शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला कर्जाची परतफेड करावी लागते.
  • परतफेडीचे हप्ते (Installments) तुमच्या बँकेनुसार ठरतात.
  • टीप:

  • तुम्ही वेगवेगळ्या बँकांकडून कर्जाच्या योजनांची माहिती घ्यावी आणि आपल्या गरजेनुसार योग्य योजना निवडावी.
  • तुम्ही https://www.vidyalakshmi.co.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.
  • हे सरकारी पोर्टल आहे.

    विद्यालक्ष्मी पोर्टल <>
    उत्तर लिहिले · 15/3/2025
    कर्म · 1080

    Related Questions

    पंतप्रधान आवास योजनेचा वाढीव निधी GR मंजूर झाला आहे का?
    प्रधानमंत्री घरकुल योजनेत सध्या चालू असलेले घरकुल अनुदान वाढीचा GR वगैरे आला आहे का?
    50000 रुपये वार्षिक हप्ता दराने डीसीसी बँकेत किती कर्ज मिळेल?
    क्रेडिट बी मधून ऑनलाईन लोन घेतलेले नाही, माझ्या नातेवाईकांनी घेतले आहे, परंतु त्यांचे आणि माझे जमत नाही. तरीही क्रेडिट बी वाले दर महिन्याला फोन करून त्रास देत आहेत, मी काय करावे?
    ड्यूटीवर असताना मृत्यू झाल्यास काय मिळते?
    मला 2.5 लाख रूपयांची गरज आहे. मला वाटतं भिशी लावावी, पण भिशी विषयी मला काही माहिती नाही.
    भारताचे आयकर संदर्भात नवीन धोरण काय आहे?