व्यवसाय मार्गदर्शन
वैद्यकीयशास्त्र
प्रक्रिया
प्राणी
मला पशुवैद्यकीय डॉक्टर व्हायचे आहे. संपूर्ण माहिती द्या.
2 उत्तरे
2
answers
मला पशुवैद्यकीय डॉक्टर व्हायचे आहे. संपूर्ण माहिती द्या.
8
Answer link
पशुवैद्यकीय क्षेत्रातील संधीआजवरच्या मनुष्याच्या इतिहासात आपल्याला एक गोष्ट सातत्याने आढळून येईल ती म्हणजे मनुष्य हा काळाच्या कलाने वेळोवेळी आपल्याप्रगतीचे वेगवेगळे मार्ग अवलंबत गेला आहे. आजचा कल हा आय. टी. सेक्टरचा कल आहे हे सांगण्याची काही आवश्यकता नाही. या वाढत्या क्षेत्राच्या वलयाखाली इतर क्षेत्रांची महती हरवून गेल्यासारखी आज आपल्याला जाणवते. Veterinary Science पशुवैद्यकीय शास्त्र हे असेच एक क्षेत्र आहे.इतर क्षेत्रांच्या विपरीत (पशुवैद्यकीय शास्त्र) Veterinary Science मध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्यांना आपला अष्टपैलू सर्वागीण विकास करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतामधील पशुधनाची संख्या जगात सर्वात मोठी आहे. आजच्या काळातील पशुधन क्षेत्रातला विकास हा कित्येक वर्षाखाली सुसंगतरीत्या अमलात आणलेल्या योजनांचा परिणाम आहे. भारताच्या याच दृष्टी क्षेपाचा परिणाम म्हणून आज आपण जगात दूध उत्पादनामध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहोत. बदलत्या काळाप्रमाणे Veterinary Science या क्षेत्राने देखील आपला चेहरामोहरा बदलून एक नवे रूप आणि स्थान प्रश्नप्त केले आहे. आजच्या काळातील Veterinarian बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपलीगुणवत्ता सिद्ध करण्याची अप्रतिम संधी उपलब्ध आहे. पशुवैद्यक म्हणजे केवळ गुरांचा डॉक्टर ही कुचकामी संकल्पना आज विलुप्त होऊन त्या जागी आजचा Veterinarian हा एक बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपल्या सेवा प्रदान करणारी व्यक्ती म्हणून दिसून येतो. उदाहरण द्यायचेच झाले तर सरकारी नोकरी, सायन्टिस्ट, सुरक्षाबलामध्ये, रीसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये, वन्य जीवन संशोधन क्षेत्रामध्ये, पोल्ट्री, लेदर, फिड इत्यादी इंडस्ट्रीजमध्ये व आणखी बऱ्याच क्षेत्रांमध्ये.खरे नाही ना वाटत! पण होय हे सर्व खरे आहे. एवढंच नाही तर आजचा Veterinarian हा बँकिंग, इन्शोरन्स व वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांमध्ये यशस्वीरीत्या काम करताना दिसतो.भारतीय सैन्यामध्ये त्यांच्या विविध प्रकारच्या अॅनिमल स्कॉड व अॅनिमल फार्मसची काळजी घेण्याकरीता दरवर्षी मुबलक संख्येमध्ये Veterinarian ची मागणी असते. याखेरीज सरकारी क्षेत्रामध्ये केंद्र व राज्यशासनाच्या पशुसंवर्धनविषयकधोरणांच्या राबवणीकरिता Veterinarian (पशुवैद्यकीय अधिकारी)ची मागणी असते. Veterinary किंवा पशुवैद्यकीयशास्त्राचा अभ्यासक्रम हा मुळात लाईफ सायन्सेसचा एक घटक असल्यामुळे यातील ग्रॅज्युएटला रीसर्च आणि डेवलपमेंट क्षेत्रामध्ये संशोधन कार्यासाठी भरपूर मागणी असते. याखेरीज Veterinary Science ग्रॅज्युएट औषध कंपन्यांसाठी लागणाऱ्या स्टडफार्मस (घोडय़ांचा फार्म), अॅनिमल हाऊस इत्यादींमध्ये पाहिजे असतात. पोल्ट्री इंडस्ट्रीज आज देशातील गव्हर्नमेंट सेक्टरपाठोपाठ रोजगार देणारी दुसरी सगळ्यात मोठी इंडस्ट्री होऊ पाहात असताना यात लागणाऱ्या वेटरनरी सेवेचे महत्त्व आपल्या निदर्शनास हळूहळू येत आहे. निरनिराळ्या बँक आणि इतर वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था जसे इन्शोरन्स इत्यादीमध्ये देखील Agriculture field officer म्हणून बरेच Veterinarians ची गरज असते.एवढे सगळे असताना आपण या क्षेत्राला दुर्लक्षित करणे हे आपल्या बौद्धिक क्षमतेची दिवाळखोरी ठरेल असे म्हणायला काहीच हरकत नाही.भारतामध्ये Veterinary Science मधील स्नातकाला BVSC & AH ही पदवी प्रदान केली जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये ‘महाराष्ट्रपशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (Maharastra Animal & Fishries Science University) हेपशुवैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सेवारत असलेलेविद्यापीठ आहे. या विद्यापीठाअंतर्गत परळ येथे असलेले ‘मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय’ हे पशुवैद्यकीय शिक्षण क्षेत्रात १८८६ पासून सेवारत असलेलेदक्षिण आशियातील सगळ्यात जुने Veterinary Science कॉलेज आहे. तसेच या कॉलेजला संलग्न असे तेवढेच जुने सर्व सोयींनी उपयुक्त प्रश्नण्यांचे हॉस्पिटल सुद्धा आहे.BVSC & AH या अभ्यासक्रमाकरिता MS-CET ही परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यातील मिळणाऱ्या गुणांच्या आधारे अॅडमिशन मिळते.शेतजमीन असलेल्या कुटुंबातील अपत्यांना यामध्ये १२ गुण वाढीव मिळतात. या अभ्यासक्रमाची अॅडमिशन प्रक्रिया साधारणत: MS-CET परीक्षेच्या एका आठवडय़ानंतर सुरू होऊन साधारण जुलै महिन्यापर्यंत चालते. विस्तृत माहिती ‘मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय’ येथे २४१३११८०/ २४१३७०३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अथवा युनिवर्सिटी वेबसाईट www.mafsu.co.in वर संपर्क साधून मिळवता येईल.
0
Answer link
पशुवैद्यकीय डॉक्टर (Veterinary Doctor) कसे व्हावे याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे:
१. शिक्षण (Education):
- तुम्ही विज्ञान विषयातून (Science Stream) १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि जीवशास्त्र (Biology) हे विषय तुमच्या १२ वी मध्ये असणे अनिवार्य आहे.
२. प्रवेश परीक्षा (Entrance Exam):
- नीट (NEET): भारतातील बहुतेक पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
- काही राज्यस्तरीय परीक्षा देखील असतात, ज्या त्या राज्यांतील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ग्राह्य धरल्या जातात.
३. पदवी (Degree):
- तुम्हाला बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स अँड एनिमल हसबंडरी (B.V.Sc & AH) ही पदवी मिळवावी लागेल. हा कोर्स ५ वर्षांचा असतो.
- या कोर्समध्ये तुम्हाला प्राण्यांची शरीर रचना (Anatomy), शरीर विज्ञान (Physiology), पॅथोलॉजी (Pathology), औषधशास्त्र (Pharmacology) आणि शस्त्रक्रिया (Surgery) यांसारख्या विषयांचा अभ्यास करावा लागतो.
४. इंटर्नशिप (Internship):
- पदवी पूर्ण झाल्यावर तुम्हाला इंटर्नशिप करणे अनिवार्य आहे. इंटर्नशिपमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.
५. नोंदणी (Registration):
- इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर तुम्हाला राज्य पशुवैद्यकीय परिषदेत (State Veterinary Council) नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यावर तुम्ही अधिकृतपणे पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून काम करू शकता.
६. पुढील शिक्षण (Further Education):
- तुम्ही मास्टर्स ऑफ व्हेटर्नरी सायन्स (M.V.Sc) किंवा डॉक्टरेट (Ph.D) करून तुमच्या ज्ञानामध्ये आणि कौशल्यांमध्ये वाढ करू शकता.
पशुवैद्यकीय डॉक्टरांसाठी भारतातील काही प्रमुख महाविद्यालये (Top Veterinary Colleges in India):
- इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट (Indian Veterinary Research Institute), इज्जतनगर https://ivri.nic.in/
- पंडित दीनदयाल उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विश्वविद्यालय एवं गौ-अनुसंधान संस्थान (Pandit DeenDayal Upadhyaya Pashu Chikitsa Vigyan Vishwavidyalaya Evam Go-Anusandhan Sansthan), मथुरा https://www.duvasu.com/
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra Animal and Fishery Sciences University), नागपूर https://www.mafsu.ac.in/
पशुवैद्यकीय डॉक्टरांची भूमिका आणि जबाबदाऱ्या (Roles and Responsibilities of a Veterinary Doctor):
- प्राण्यांची तपासणी करणे आणि त्यांच्या आजारांचे निदान करणे.
- प्राण्यांवर औषधोपचार करणे आणि शस्त्रक्रिया करणे.
- प्राण्यांना लसी देणे आणि त्यांची आरोग्य सेवा सुनिश्चित करणे.
- प्राण्यांच्या मालकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन करणे.
नोकरीच्या संधी (Job Opportunities):
- सरकारी आणि खाजगी पशुवैद्यकीय दवाखाने.
- पशुधन विकास विभाग.
- डेअरी फार्म्स (Dairy Farms) आणि पोल्ट्री फार्म्स (Poultry Farms).
- वन्यजीव संरक्षण क्षेत्रात (Wildlife Conservation).
- रिसर्च संस्था (Research Institutes).
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी, संबंधित महाविद्यालयाच्या वेबसाइटला भेट द्या.