फरक
मानसशास्त्र
जाणीव आणि अवचेतन मन
मानसिक स्वास्थ्य
Conscious mind आणि Subconscious mind कशा प्रकारे कार्य करतात?
2 उत्तरे
2
answers
Conscious mind आणि Subconscious mind कशा प्रकारे कार्य करतात?
8
Answer link
आपल्या मनाचे दोन स्तर असतात त्यातला बाह्य स्तर म्हणजे चेतन मन(conscious mind) व आंतर स्तर म्हणजे अचेतन मन (subconscious mind). आपल्या अचेतन मनात अदभुत चमत्कार घडवून आणणारी शक्ती व सामर्थ्य दडले आहे.चेतन व अचेतन ही दोन वेगवेगळी मने नाहीत तर ती एकाच मनाच्या कार्यपद्धतीची दोन क्षेत्रे आहेत. सामान्यपणे जो विचार आपण करतो तो चेतन मनाचा भाग असतो आणि ते विचार प्रत्यक्षातआणण्याचे काम अचेतन मन करत असते. आपल्या अचेतन मनाने एखादी कल्पना स्विकारली की ते लगेच अमलात आणायला सुरुवात करते. अचेतन मनावर आपण जी छाप किंवा ठसे टाकतो ते ठसेकिंवा आपण जाणीवपूर्वक ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्या सगळ्या गोष्टी आपले अचेतन मन स्वीकारते.
आपले अचेतन मन हे अशा सुपिक जमिनीसारखे आहे जी चांगल्या-वाईट सगळ्या प्रकारच्या बीजांचा स्वीकार करते. आपले विचार सक्रिय असतात, ती बीजं असतात. नकारात्मक व विध्वंसकविचार आपल्या अचेतन मनात नकारात्मक रूपाने कार्य करतात. आपल्याला मिळणारी अचेतन मनाची प्रतिक्रिया ही आपल्या चेतन मनातील विचारांवर अवलंबून असते. चेतन मनाच्या इच्छेविरुद्धकोणतेही सुचन अचेतन मनावर छाप पाडू शकत नाही. आपले अचेतन मन विनोद समजू शकत नाही. ते आपल्या आदेशांचे शब्दशः पालन करते.
म्हणूनच “मला जमणार नाही, मी हे कधीच करू शकणार नाही”, हे उद्गार कधीही काढू नका. तुमचे मन तुमचा प्रत्येक शब्द खरा करीत असते. स्वतःला नियंत्रित करण्यासाठी व शिस्तलावण्यासाठी स्वयंसूचना एक उपयोगी साधन बनू शकते. जेव्हा तुमच्या मनात हा विचार येईल कि “मला हे शक्य नाही” तेव्हा त्या भयाला दूर सारण्यासाठी त्या वाक्याच्या जागी पुढचे वाक्य वापरा. “माझ्या अचेतन मनाच्या शक्तीद्वारे मी सगळे काही शक्य करू शकतो”. तुम्ही तुमच्या आत्म्याचे (अचेतन मनाचे) कॅप्टन आणि तुमच्या नशिबाचे मालक आहात. अशाप्रकारे तुमच्या सर्व समस्यांचे समाधान तुमच्यापाशी आहे.
अधिक माहितीसाठी श्री रामहरी घोळवे यांचा लेख वाचा.

0
Answer link
Conscious mind (जाणीवपूर्वक मन) आणि Subconscious mind (अवचेतन मन) हे दोन भाग आपल्या मेंदूचे महत्त्वाचे भाग आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. त्यांची कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे:
Conscious mind (जाणीवपूर्वक मन):
- तार्किक विचार: Conscious mind तर्कशुद्ध विचार करते. हे माहितीचे विश्लेषण करते, तुलना करते आणि निर्णय घेते.
- ध्येय-आधारित: हे ध्येय निश्चित करते आणि त्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी योजना तयार करते.
- वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित: Conscious mind वर्तमान क्षणात घडणाऱ्या घटनांवर लक्ष केंद्रित करते.
- मर्यादित क्षमता: याची क्षमता मर्यादित असते. एकाच वेळी काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकते.
Subconscious mind (अवचेतन मन):
- सवयी आणि भावना: Subconscious mind आपल्या सवयी, भावना आणि पूर्वग्रहणांचे केंद्र आहे.
- दीर्घकाळची स्मरणशक्ती: हे दीर्घकाळच्या आठवणी साठवते. आपले अनुभव आणि भूतकाळातील घटना येथे साठवल्या जातात.
- स्वयंचलित कार्ये: Subconscious mind श्वास घेणे, हृदय धडधडणे यांसारख्या स्वयंचलित कार्यांचे नियंत्रण करते.
- अफाट क्षमता: याची क्षमता खूप मोठी आहे. हे एकाच वेळी अनेक गोष्टी process करू शकते.
उदाहरण:
गाडी चालवताना, Conscious mind रस्त्यावरील ट्रॅफिक, सिग्नल यावर लक्ष ठेवते, तर Subconscious mind गाडी चालवण्याची सवय (steering, gears) नियंत्रित करते.
Conscious mind आणि Subconscious mind एकत्रितपणे काम करतात. Subconscious mind मधून येणाऱ्या सूचना आणि भावनांच्या आधारावर Conscious mind निर्णय घेते.
अधिक माहितीसाठी, आपण मानसशास्त्रज्ञांचे लेख आणि पुस्तके वाचू शकता.