Topic icon

जाणीव आणि अवचेतन मन

8
आपल्या मनाचे दोन स्तर असतात त्यातला बाह्य स्तर म्हणजे चेतन मन(conscious mind) व आंतर स्तर म्हणजे अचेतन मन (subconscious mind). आपल्या अचेतन मनात अदभुत चमत्कार घडवून आणणारी शक्ती व सामर्थ्य दडले आहे.चेतन व अचेतन ही दोन वेगवेगळी मने नाहीत तर ती एकाच मनाच्या कार्यपद्धतीची दोन क्षेत्रे आहेत. सामान्यपणे जो विचार आपण करतो तो चेतन मनाचा भाग असतो आणि ते विचार प्रत्यक्षातआणण्याचे काम अचेतन मन करत असते. आपल्या अचेतन मनाने एखादी कल्पना स्विकारली की ते लगेच अमलात आणायला सुरुवात करते. अचेतन मनावर आपण जी छाप किंवा ठसे टाकतो ते ठसेकिंवा आपण जाणीवपूर्वक ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्या सगळ्या गोष्टी आपले अचेतन मन स्वीकारते.
आपले अचेतन मन हे अशा सुपिक जमिनीसारखे आहे जी चांगल्या-वाईट सगळ्या प्रकारच्या बीजांचा स्वीकार करते. आपले विचार सक्रिय असतात, ती बीजं असतात. नकारात्मक व विध्वंसकविचार आपल्या अचेतन मनात नकारात्मक रूपाने कार्य करतात. आपल्याला मिळणारी अचेतन मनाची प्रतिक्रिया ही आपल्या चेतन मनातील विचारांवर अवलंबून असते. चेतन मनाच्या इच्छेविरुद्धकोणतेही सुचन अचेतन मनावर छाप पाडू शकत नाही. आपले अचेतन मन विनोद समजू शकत नाही. ते आपल्या आदेशांचे शब्दशः पालन करते.
म्हणूनच “मला जमणार नाही, मी हे कधीच करू शकणार नाही”, हे उद्गार कधीही काढू नका. तुमचे मन तुमचा प्रत्येक शब्द खरा करीत असते. स्वतःला नियंत्रित करण्यासाठी व शिस्तलावण्यासाठी स्वयंसूचना एक उपयोगी साधन बनू शकते. जेव्हा तुमच्या मनात हा विचार येईल कि “मला हे शक्य नाही” तेव्हा त्या भयाला दूर सारण्यासाठी त्या वाक्याच्या जागी पुढचे वाक्य वापरा. “माझ्या अचेतन मनाच्या शक्तीद्वारे मी सगळे काही शक्य करू शकतो”. तुम्ही तुमच्या आत्म्याचे (अचेतन मनाचे) कॅप्टन आणि तुमच्या नशिबाचे मालक आहात. अशाप्रकारे तुमच्या सर्व समस्यांचे समाधान तुमच्यापाशी आहे.
अधिक माहितीसाठी श्री रामहरी घोळवे यांचा लेख वाचा.
उत्तर लिहिले · 27/6/2017
कर्म · 99520