निसर्ग प्राणी वन्यजीव

जंगलाचा राजा कोण: वाघ की सिंह? किंवा वाघ आणि सिंह या दोघांपैकी ताकतवर कोण आहे?

3 उत्तरे
3 answers

जंगलाचा राजा कोण: वाघ की सिंह? किंवा वाघ आणि सिंह या दोघांपैकी ताकतवर कोण आहे?

23
जर जंगलाचा विचार केला तर...

1) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे?

उत्तर - हत्ती

2) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे?

उत्तर - जिराफ

3) कोणता प्राणी सगळ्यात चपळ आहे?

उत्तर - कोल्हा

4) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे?

उत्तर - चित्ता



असं असलं तरी सिंह जंगलाचा राजा आहे. वरीलपैकी एकही क्वालिटी नसताना सिंह जंगलाचा राजा आहे हे विशेष. असं का बरं?

सिंह धैर्यवान आहे. तो कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करतो. तो कशाचीही भीती बाळगत नाही, कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत सिंहाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात जास्त जोखीम घेणारा सिंह आहे. सिंहाला विश्वास आहे की, कोणताही प्राणी त्याच्यासाठी अन्न होवू शकतो. सिंह कोणतीही संधी सहजा-सहजी सोडत नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो. वरील गोष्टींचा विचार केला तर आपण सिंहाकडून काय शिकू शकतो.

आपण वेगवान नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात हुशार नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात स्मार्ट नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण बुद्धिवान नसलो तरी काही फरक पडत नाही.

मग गरज कशाची आहे? तर तुमच्याकडे धैर्य असले पाहिजे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. तुमचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास असाला हवा. मी हे करू शकतो, हा तीव्र विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलाय. त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. अंतप्रेरणेने कामाला लागा, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कृतीचा आनंद घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता.
उत्तर लिहिले · 19/11/2017
कर्म · 6610
6
जंगलाचा राजा सिंह आहे, तसेच सिंह हा ताकदवर देखील आहे, परंतु काही वाघ जसे बंगाल वाघ हे सिंहा पेक्षा अधिक ताकदवर असतात.
उत्तर लिहिले · 26/6/2017
कर्म · 780
0
जंगलाचा राजा कोण या प्रश्नाचे उत्तर वाघ (Tiger) आणि सिंह (Lion) दोघांच्या तुलनेत देणे कठीण आहे, कारण दोघांमध्येही आपापले वैशिष्ट्य आणि ताकद आहे. तरीही, काही सामान्य माहितीच्या आधारे आपण त्यांची तुलना करू शकतो:
  • जंगलाचा राजा:Error: Could not find the specified image.Error: Could not find the specified image.Error: Could not find the specified image.Error: Could not find the specified image.Error: Could not find the specified image.

    सिंह: सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटले जाते. हे त्याच्या सामाजिक वर्तनामुळे आणि प्रभावी दिसण्यामुळे आहे. सिंह सामान्यतः गटांमध्ये (prides) राहतात आणि एकत्रितपणे शिकार करतात.

  • ताकद आणि आकार:

    वाघ: वाघ हा सिंहापेक्षा जास्त ताकदवान मानला जातो. तो एकटाच शिकार करतो आणि त्याचे शरीर अधिक मजबूत असते. वाघ उत्तम शिकारी असतो आणि पाण्यातही सहजपणे पोहू शकतो.

    सिंह: सिंह हा वाघापेक्षा थोडा लहान असतो, पण तो एकत्रितपणे शिकार करत असल्यामुळे मोठ्या प्राण्यांनाही हरवू शकतो.

  • आढळण्याचे ठिकाण:

    वाघ: वाघ प्रामुख्याने आशिया खंडात आढळतात. भारत, रशिया, इंडोनेशिया आणि चीनमध्ये वाघांची संख्या अधिक आहे.

    सिंह: सिंह आफ्रिका खंडात आणि भारताच्या काही भागांमध्ये ( Gir Forest National Park) आढळतात.

त्यामुळे, ‘जंगलाचा राजा’ ही उपाधी सिंहाला दिली जात असली, तरी ताकद आणि शिकारी क्षमतेच्या बाबतीत वाघ अधिक बलवान आहे.

तसेच, अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1200

Related Questions

भारतात कोणकोणते अभयारण्य आहेत?
रबर, मीठ, मासे यापैकी कोणते उत्पादन वनातून मिळते?
वन्स उकोन ा तमे इन ा ठीक जंगल लाइवड ा फेरोस्जस लायन है?
मी एक लांडगा पहिला, हे कधी शोधू शकतो का?
नुकत्याच झालेल्या व्याघ्र गणनेनुसार भारतातील वाघांची संख्या किती?
नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने वन्य प्राण्यांचे मानवी वस्त्यात होणारे अतिक्रमण - प्रकल्प, इयत्ता 11 वी?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?