2 उत्तरे
2 answers

कावीळची लक्षणे कोणती?

8
कावीळ किंवा एचबीव्ही या विषाणुमुळे लिव्हरला सूज येते. याची लक्षणे खालील प्रकारची असतात. कावीळ अर्थातच जॉण्डीस म्हणजेच डोळ्याचा पिवळेपणा. कावीळ म्हणजे डोळे, लघवी पिवळीजर्द होणे, भूक मंदावणे, अंग मोडून येणे, उलटया होणे इ.
1. कधी कधी कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत
2. त्वचेचा रंग पिवळा दिसतो (कावीळ)
3. थकवा येतो.
4. फ्लुची लक्षणे दिसतात
5. भूक लागत नाही
6. उलटया होतात
7. पोट दुखते
8. अगदी क्वचीत वेळी लिव्हर पूर्णपणे काम करण्याचे बंद होत
कावीळची प्रमुख कारणे –
1. दारू अथवा मादक द्रव्यांचे सेवन – जास्त प्रमाणात व रोज दारू पीत राहिल्याने यकृताच्या पेशींना इजा होते तसेच यकृताला सूज येते व त्यामुळे कावीळ होते. या काविळीमध्ये यकृताला सूज येणे, पोटात पाणी होणे, सतत आजारी वाटणे आणि डोळे पिवळे होणे ही लक्षणं दिसतात. रक्ततपासणी करून या काविळीचे निदान करता येते. या काविळीमध्ये शेवटी यकृतच छोटे होते. सर्व यकृताच्या पेशी जाऊन फायबरचे धागे राहतात. त्यामुळे यकृताचे काम एकाएकी कमी प्रमाणात चालते व रुग्ण भ्रमिष्ट होऊ शकतो, बेशुद्ध होऊ शकतो. दारूमुळे यकृत खराब होऊन अनेक बळी जातात.
2. औषधाचे यकृतावरील दुष्परिणाम –बरीचशी औषधे ही यकृताला घातक असतात. त्यामुळे ही औषधे घेतल्यानंतर काही जणांमध्ये कावीळ झालेली दिसून येते. काही वेदनाशामक, काही कुटुंब नियोजनाच्या गोळ्या, काही आकडीसाठी देण्यात येणारी औषधे चालू केल्यावर नियमित लक्ष द्यावे. विशिष्ट रक्ततपासणी करून घेत राहावी म्हणजे कावीळ लवकर लक्षात येते. कधी कधी ही तीव्र स्वरूपाची असून यामध्ये रुग्ण दगावूही शकतो.
3. अवरोधक कावीळ – पित्ताशयाच्या नळीला पित्ताच्या खडयाने वा स्वादुपिंड कॅन्सरने अडथळा निर्माण होऊन कावीळ होते. यामध्ये काविळीबरोबर अंगाला खाज येते. बरेच दिवस ही कावीळ राहिल्यास यकृत खराब होऊ शकते. अवरोधक कावीळचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी, सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याची गरज असते. यावर उपाय हा दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे करावा लागतो.
4. काही जन्मजात आजार – हेमोलॅटिक जॉण्डीस आजार, रक्तपेशी जास्त प्रमाणात विघटन पावून कावीळ वाढते. ऑटोइम्युन डिसऑर्डर स्वत:च्या प्रतिकार शक्तीने झालेले आजार व जन्मजात यकृतातील दोषामुळे कावीळ होऊ शकते.

Edit: उपाय योजना
कावीळ झाल्याचे समजल्यावर घरगुती औषधे घेऊन ती बरी करण्याकडे अनेकांचा कल असतो. वास्तविक असे करणे धोक्याचे असते. कारण काविळीचे वेगवेगळे प्रकार असतात. ते नीट समजून घेऊन औषधोपचार होणे गरजेचे असते.
जंतुसंसर्गामुळे, प्रदूषित पाण्यामुळे : होणाऱ्या काविळीमध्ये हेपाटायटीस ए/ई वर खालील उपचार करावे.

१) रुग्णांनी विश्रांती घ्यावी. आराम करावा. साधा आहार घ्यावा. यामध्ये कमी तेलाचे व पचायला सोपे असे जेवावे. शाकाहारी जेवण जेवावे. यामध्ये मऊ भात, खिचडी, फुलके, कमी तेलाच्या भाज्यांचे सेवन करावे. सोबत बी कॉम्प्लेक्स, यकृताची टॉनिक्स (Tonics) ही घ्यावीत. या आजारात यकृतातील ग्लुकोज कमी होते म्हणून ग्लुकोज पावडर घ्यावी. ऊस खावा.
२) हिपेटायटिस बी/सी – यामध्ये रक्ततपासणी व डीएनए याची तपासणी करून जर त्यामध्ये हिपेटायटिस अ‍ॅक्टिव्ह असेल तर अ‍ॅण्टी व्हायरल ड्रग्ज देणे आवश्यक असते. ही उपचारपद्धती खर्चीक व बराच काळ चालणारी असते म्हणून सर्वसाधारण व्यक्तीला घेणे परवडत नाही. म्हणूनच हा आजार टाळावा.
३) आयुर्वेदामध्ये असलेली आरोग्यवर्धिनी गुटिका ही देखील गुणकारी ठरू शकते. आयुर्वेद डॉक्टरला विचारून सल्ला घ्यावा.
४) कावीळ झाली असता मद्यपान करू नये.
५) अवरोधक कावीळ असल्यास दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार करावा लागतो. त्यासाठी योग्य डॉक्टरकडे सल्ला घ्यावा.
काविळीचे योग्य निदान व त्यावर त्वरित उपचार केल्याने बहुतांशी रुग्ण बरे होतात, पण हे सारे डॉक्टरच्या देखरेखीखाली करावे.
उत्तर लिहिले · 18/6/2017
कर्म · 99520
0

कावीळ (Jaundice) होण्याची काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  • त्वचा आणि डोळे पिवळे होणे: कावीळचे हे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. Bilirubin नावाचा पिवळा रंगद्रव्य रक्तामध्ये वाढल्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात.
  • लघवीचा रंग गडद होणे: रक्तातील अतिरिक्त Bilirubin लघवीतून बाहेर टाकले जाते, ज्यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होतो.
  • विষ্ঠेचा रंग फिकट होणे: Bilirubin विष्ठेला रंग देतो. त्यामुळे, Bilirubin चे उत्सर्जन कमी झाल्यास विষ্ঠेचा रंग फिकट होऊ शकतो.
  • थकवा आणि अशक्तपणा: कावीळ झाल्यास यकृत व्यवस्थित काम करत नाही, त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
  • पोटदुखी: काही जणांना ओटीपोटात दुखण्याची समस्या देखील होऊ शकते.
  • भूक न लागणे: कावीळ झाल्यास भूक कमी लागते किंवा अन्नाची इच्छा होत नाही.
  • वजन घटणे: भूक न लागल्यामुळे काही लोकांचे वजन देखील घटते.
  • खाज येणे: त्वचेवर खाज येणे हे देखील कावीळचे एक लक्षण असू शकते. रक्तातील Bilirubin वाढल्यामुळे त्वचेला खाज येते.
  • मळमळ आणि उलट्या: काही रुग्णांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2540

Related Questions

माझे वय ४९ आहे, वजन ८४ किलो, उंची ५ फूट. आज दिवसभर ५/६ वेळा छातीत चरचर आवाज व थोडे पिचकारीसारखा आवाज येतो आहे, हे कशाचे लक्षण आहे?
पाय लटपटणे अर्थ काय?
तुमच्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी झालंय, हे कसं ओळखाल?
गर्भधारणा झाली आहे हे सुरुवातीला कसे समजते?
मारल्यानंतर हात पाय निळे का पडतात, त्याला काय म्हणतात?
सदाला कापरे का सुटले?
छिन्‍नमस्‍कताची सकारात्‍मक लक्षणे काय आहेत?