4 उत्तरे
4
answers
जन्मठेप म्हणजे किती वर्षांची शिक्षा असते?
23
Answer link
मरेपर्यंत शिक्षा ............../////.....................//////////////जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कोणत्याही कैद्याची १४ किंवा २० वर्षांच्या कारावासानंतर सुटका करण्याची पद्धत चुकीची असून जन्मठेप म्हणजे आयुष्यभर तुरुंगवास होय, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. या शिक्षेच्या तरतुदींचा गैरअर्थ काढण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच फाशीच्या शिक्षेसाठीच्या निकषांचाही फेरआढावा आवश्यक असल्याचे न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे.
‘जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची १४ किंवा २० वर्षांनंतर तुरुंगातून सुटका होणे हा अटळ अधिकार असल्याचा गैरसमज प्रचलित झाला असल्याचे दिसून येते. मात्र, असा कोणताही अधिकार कैद्याला नाही. जन्मठेप झालेल्या कैद्याला मरेपर्यंत तुरुंगवास भोगावाच लागेल,’ असे न्या. के. एस. राधाकृष्णन आणि न्या. मदन बी. लोकुर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. एखाद्या प्रकरणात सरकारकडून जन्मठेपेच्या कैद्याला शिक्षेत सवलत मिळू शकते. मात्र, ती १४ वर्षांपेक्षा कमी असू शकत नाही, असेही खंडपीठाने म्हटले. जन्मठेपची शिक्षा १४ वर्षेच असते, याबाबत समाजात रूढ झालेल्या मतप्रवाहाच्या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्वाळा दिला. फौजदारी दंडसंहितेच्या कलम ४३२ नुसार, जन्मठेपेच्या कैद्याला शिक्षेत सवलत देण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र, फौजदारी दंडसंहितेच्या ४३३-अ अन्वये या सवलतीमुळे त्याची कारावासाची शिक्षा १४ वर्षांपेक्षा कमी करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सणउत्सव किंवा काही नैमित्तिक दिवशी, कैद्यांची सुटका करण्याची पद्धत केंद्र तसेच विविध राज्य सरकारांकडून राबवली जाते. त्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याबाबत निर्णय घेताना प्रत्येक प्रकरणाचा व्यक्तिश: आढावा घेणे आवश्यक असल्याचे मतही खंडपीठाने नोंदवले.

18
Answer link
आपण चित्रपटामध्ये किंवा खऱ्या आयुष्यामध्ये हे बघितले असेल की, एखाद्याला जन्मठेपेची शिक्षा होऊन सुद्धा त्याला १४ वर्षांनी सोडले जाते. जन्मठेप हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर खडतर तुरुंगवास, खूप श्रम आणि खूप खराब आयुष्य हे सर्व येते. आपल्याला वाटते एखाद्या व्यक्तीला जर जन्मठेप झाली तर त्याचे आयुष्य संपलेच, त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडले जाणार नाही, त्याला त्याचे संपूर्ण आयुष्य त्या अंधाऱ्या कोठडीमध्येचं घालवावे लागणार. पण आपण समजतो त्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळेच आहे._*
सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता यांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले की, *भारतीय संविधानामध्ये १४ वर्षाच्या शिक्षेला जन्मठेपेची शिक्षा म्हटले जाते, असा कुठेही उल्लेख नाही आहे* २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले होते की, आजीवन कारावास म्हणजे जन्मभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा होय.

जास्त २० वर्षांनी त्यांना परत सोडण्यात येईल तर हा त्यांचा गैरसमज आहे. असा कोणताही अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही.
पण तरी सुद्धा हा प्रश्न उरतोच की, जर जन्मठेपेची शिक्षा त्या गुन्हेगारांना झाली असेल तरीही ते १४ वर्षांच्या शिक्षेनंतर सुटतात कसे ? त्याचे उत्तर जाणून घेऊया….
सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या कैद्याला जर जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर, त्या कैद्याला राज्य सरकारच्या ताब्यात दिले जाते. त्या कैद्याची शिक्षा पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्य सरकारचे असते. त्या कैद्याला १४ वर्ष, २० वर्ष, ३० वर्षानंतर तुरुंगातून सोडायचे की आयुष्यभर तिथेच ठेवावे याचा निर्णय फक्त राज्य सरकारच घेऊ शकते. जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला कमीत कमी १४ वर्ष सक्तमजुरी ही करावीच लागते.
१४ वर्षाच्या आधी कोणत्याही गुन्हेगाराला तुरुंगातून मुक्त केले जाऊ शकत नाही. त्यानंतर त्याच्यावर निर्माण झालेल्या विश्वासाने, वागणुकीने किंवा त्याच्या आरोग्यासाठी किंवा त्याची कौटुंबिक स्थिती लक्षात घेऊन त्याला तुरुंगामध्ये ठेवण्याचा काळ निश्चित केला जातो.
सर्वोच्च न्यायालयाने याबबत सांगितले की,
*जन्मठेपेची शिक्षा झालेला गुन्हेगार हा अनिश्चित कालावधीसाठी ताब्यात असतो. त्याच्या वागणुकीमधील बदल लक्षात घेऊन जर गुन्हेगाराची शिक्षा कमी करायची असेल, तर सीआरपीसीच्या कलम ४३२ नुसार शासनाला योग्य ते दयापत्र पास करावे लागते, परंतु हे सुद्धा लक्षात घ्या की सीआरपीसीच्या कलम ४३३ – ए नुसार कमीत कमी १४ वर्ष शिक्षा प्रत्येक जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला भोगावीच लागेल.*
म्हणून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्या नंतरही आरोपीला १४ वर्षांनी तुरुंगातून मुक्त केले जाते…
इनमराठी वरून साभार

0
Answer link
जन्मठेप म्हणजे नक्की किती वर्षांची शिक्षा असते, हे निश्चितपणे सांगता येत नाही, कारण ते अनेक घटकांवर अवलंबून असते.
सर्वसाधारणपणे, जन्मठेप म्हणजे उर्वरित आयुष्यभर कारावास असतो. याचा अर्थ दोषी व्यक्तीला त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत तुरुंगात राहावे लागते.
भारतीय कायद्यानुसार, जन्मठेपेचा अर्थ 14 वर्षे किंवा 20 वर्षे इतका असू शकतो. konkret माहितीसाठी, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (Code of Criminal Procedure - CrPC) आणि भारतीय दंड संहिता (Indian Penal Code - IPC) यांमध्ये दिलेल्या तरतुदींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: