2 उत्तरे
2 answers

Galaxy म्हणजे काय?

3
Galaxy ला मराठी मध्ये आकाशगंगा म्हणतात।गुरुत्वाकर्षणामुळे तारे, धूलिकण, कृष्ण पदार्थ तसेच जुन्या ताऱ्यांचे अवशेष अवकाशात एकत्र येतात. त्यालाच आपण आकाशगंगा असे म्हणतात।संपुर्ण विश्व. विश्वात अनेक आकाशगंगा आहेत. विश्व हे सतत प्रसरण पावत आहे.ह्यात सर्व तारे,धरती,सूर्य,चंद्र सामावले आहेत.आपली आकाशगंगा ही, सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या दीर्घिकेमध्ये आहे, त्या दीर्घिकेचे नाव आहे. तिचे इंग्रजी नाव Milky Way (मिल्की वे) अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह आपल्याला दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या तारकासमूहातून आपली आकाशगंगा पसरलेली आहे.
उत्तर लिहिले · 8/6/2017
कर्म · 2735
0

Galaxy ( आकाशगंगा ): आकाशगंगा म्हणजे गुरुत्वाकर्षणाने बांधलेल्या ताऱ्यांचा, ताऱ्यांच्या अवशेषांचा, आंतरतारकीय वायू, धूळ आणि गडद पदार्थांचा प्रचंड समूह आहे.

आकाशगंगांचे प्रकार:

  • सर् spiral (Spirals): या आकाशगंगांमध्ये मध्यभागी फुगवटा आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या अनेक भुजा (arms) असतात. आपली आकाशगंगा, Milky Way ही spiral आहे.
  • लंबवर्तुळाकार (Elliptical): या आकाशगंगा लंबवर्तुळाकार किंवा अंडाकृती आकाराच्या असतात.
  • irregular (Irregular): यांचा कोणताही नियमित आकार नसतो.

महत्त्वाचे मुद्दे:

  • आकाशगंगा विश्वातील मूलभूत घटक आहेत आणि त्या गुरुत्वाकर्षणाने एकत्रितपणे टिकून राहतात.
  • जवळजवळ सर्व मोठ्या आकाशगंगांच्या केंद्रस्थानी प्रचंड मोठे कृष्णविवर (supermassive black holes) असतात.
  • आकाशगंगा collision ( दोन आकाशगंगा एकमेकांवर आदळणे ) सामान्य आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5220

Related Questions

आकाशगंगांची संख्या किती आहे?
डोंगराच्या बाजूने आवरून मारून टिंब टिंब कब्रिस्तान प्रवेश केला?
आकाशात दिसलेला ढग स्थिर असता, तर कशासारखा दिसला असता आणि त्याचे वर्णन निवेदकाने कसे केले असते?
चंद्र आकाशात झाकला जातो त्या स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात का?
आकाशात वीज चमकते तेव्हा अगोदर प्रकाश दिसतो की आवाज येतो?
ढग आकाशात कसे तरंगतात?
उरविका म्हणजे काय?