वाहने ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा

गोबर गॅसवर गाडी चालते का?

2 उत्तरे
2 answers

गोबर गॅसवर गाडी चालते का?

5
भारतासारख्या विकसनशील देशात, जिथे ऊर्जेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढत आहे तिथे ‘मिथेनची शेती’ आवश्यक आहे. जगात सर्वात जास्त, सुमारे २५ करोड पशू भारतात आहेत. त्यांच्यापासून सुमारे साडेबाराशे करोड टन शेण मिळते. याचा उपयोग करून घेतला तर स्वयंपाकासाठी लागणारे रॉकेल आणि एल.पी.जी. गॅस तसेच वाहतुकीसाठी लागणारे पेट्रोल इ. साठी आपण पर्याय उभा करू शकतो. मिथेन गॅसपासून विजेचीसुद्धा निर्मिती होऊ शकते. ती दोन प्रकारे करता येऊ शकते. हल्ली अनेक खेडोपाडी, ज्यांच्याकडे गुरेढोरे आहेत, त्यांच्याकडे गोबरगॅस प्लँट आहेत. ह्य़ा गोबर गॅसचा उपयोग शेतकरी स्वयंपाक करण्यासाठी तसेच पाणी व इतर पदार्थ गरम करण्यासाठी करतात. जो गॅस गोबर प्लँटमधून मिळतो तोच हा मिथेन गॅस होय.
 प्लँटमधूनदेखील मिथेन गॅस
हा मिथेन गॅस वापरून डीझेल तसेच पेट्रोल इंजिन चालविता येते. प्रथम हे इंजिन डीझेलने किंवा पेट्रोलने चालू करतात. एकदा का हे इंजिन चालू झाले की नंतर ते मिथेन गॅसवर चालू राहते. हा मिथेन गॅस काँप्रेस करून इंजिनमध्ये सोडतात नंतर हे इंजिन गॅसवर चालू राहते. ह्य़ा इंजिनद्वारे वीज तयार करण्याचे जनरेटर फिरविले जाते. जनरेटर फिरविण्यासाठी इंजिन व जनरेटर ह्य़ामध्ये पुली व बेल्ट लावतात. इंजिन चालले की त्याला जोडलेला जनरेटरचा शाप्ट फिरू लागतो. जनरेटरचा शाप्ट फिरू लागला की, जनरेटरचे रोटर जे जनरेटरच्या स्टेटरमध्ये बसविलेले असते ते फिरू लागते व विजेची निर्मिती होते. ह्य़ा विजेचा नंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. ह्य़ा विजेने घरातील दिवे लावता येतात तसेच मोटार पंप चालवून शेतीला पाणी देता येते.
उत्तर लिहिले · 19/5/2017
कर्म · 3745
0

नाही, गोबर गॅसवर थेट गाडी चालवता येत नाही.

गोबर गॅसमध्ये मिथेन (methane) वायूचे प्रमाण जास्त असते. मिथेन ज्वलनशील आहे, पण गाडी चालवण्यासाठी गोबर गॅसमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे:

  1. शुद्धीकरण: गोबर गॅसमधील कार्बन डायऑक्साईड (carbon dioxide) आणि इतर अशुद्ध घटक काढून मिथेन वायूला शुद्ध करावे लागते.
  2. संपीडन: शुद्ध केलेल्या मिथेन वायूला उच्च दाबाखाली सं compressed (compressed) करावे लागते, जेणेकरून ते गाडीमध्ये इंधन म्हणून वापरता येईल. याmodified gas ला compressed biogas (CBG) म्हणतात.

Compressed biogas (CBG) चा वापर सध्या काही वाहनांमध्ये इंधन म्हणून केला जात आहे.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1620

Related Questions

भारतातील गोबर गॅस प्रकल्प का बंद पडला? कारण काय आहे?
गोबर गॅस बद्दल माहिती द्या?
साक्री तालुक्यातील शिवाजी नगर येथील सौरऊर्जा प्रकल्प किती मेगावॅटचा आहे?
सौर ऊर्जेला ....ऊर्जा असेही म्हणतात ?
अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीजनिर्मितीत भारतात पहिला क्रमांक कोणाचा आहे?
मला घरगुती 30 युनिट लाईट बनवायची आहे का?