4 उत्तरे
4 answers

12 वी नंतर MPSC ची तयारी कशी करावी?

15
1) सर्वप्रथम इ. पाचवी ते इ. बारावी पर्यंत ची सर्व पुस्तके ( महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची ) साधारणत: दोन ते तीन वेळा वाचून टाकावीत हे यासाठी आवश्यक आहे, मागच्या काही वर्षात आयोगाच्या प‘श्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की साधारणत: 10 ते 15 % प्रश्न हे सरळ सरळ या अभ्यासावरून  घेतलेले असतात.

       गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास व या वर्षांत झालेल्या आयोगाच्या इतर प्रश्नपत्रिका पाहिल्यास असे  लक्षात येते की, प्रश्नपत्रिकेंचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहेत.

       या परिक्षेसाठी अभ्यासक‘म खालीलप्रमाणे आहे –

1)महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी 2)इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ 3)राज्य पद्धती व प्रशासन 4) आर्थिक आणि सामाजिक विकास 5) पर्यावरण 6) सामान्य विज्ञान

1) चालू घडामोडी :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 201५ व 201६ यापरिक्षेंचा विचार करता चालू घडामोडींचा आवका हा दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांनी तयारी करतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करावा यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन आवश्यक आहे.मित्रांनो या वेब साईटवर रोजच्या रोज घडणाऱ्या घटनांची अद्ययावत माहिती देणार आहोत ,अपेक्षा करतो की ती आपणास उपयोगी पडेन .

2) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) व भारतीय स्वातंत्र्याची चळवळ :-

      सर्वप्रथम संपूर्ण अभ्यासक्रमाचे  व्यवस्थित वर्गिकरण करून, पूर्व परीक्षा ,मुख्य परीक्षा यांसाठी समान असणाऱ्या घटकांचा एकत्रच अभ्यास करावा . राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यास ,या अभ्यास क्रमात फक्त  इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासह इतकाच उल्लेख आहे म्हणून  इतिहासाचा अभ्यास करतांना 1) प्राचीन भारताचा इतिहास 2) मध्ययुगीन भारताचा इतिहास 3) आधुनिक भारताचा इतिहास 4) भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, यांचा अभ्यास करावा. या बरोबरच भारताचा सांस्कृतीक इतिहास देखिल  अभ्यासावा. परंतु प्राचीन भारताचा इतिहास व मध्ययुगीन भारताचा इतिहास यावर फारच कमी प्रश्न असतात हे लक्षात ठेवावे .मागील प्रश्नपत्रिकेंचा अभ्यास करून ,कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले गेले आहेत ते पाहूनच अभ्यासाची दिशा ठरवावी .

             जरी परीक्षेचे स्वरूप  वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असले  तरी फक्त ,तयारी करतांना तयारी फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नांचीच  न करता, एखाद्या दर्जेदार पुस्तकाचे दोन ते तीन वेळा व्यवस्थित वाचन करून ऐतिहासिक प्रकि‘येंचा संदर्भ समजु मग जास्तीत जास्त  वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवावे म्हणजे जास्त फायदा होतो .

                  विज्ञान शाखेतील विद्यार्थी, इंजिनिअरिंग तसेच मेडिकल शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या विषयाची तयारी नेहमीच डोकेदुखी  ठरते. या घटकाच्या तयारीसाठी, सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या 5 ते 12 पर्यंतच्या पुस्तकांचे 2 ते 3 वेळा ( जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेंची तयारी करीत असतील त्यांनी एन.सी.इ.आर.टी. ची 5 ते 12 पर्यंतची पुस्तके वाचावीत, यातील आर्ट आणि कल्चर हा भाग व्यवस्थित समजुन घ्यावा.)

              इतिहासाचा अभ्यास करतांना ऐतिहासिक सनावळ्याची भीती बाळगु नये, परिक्षेमध्ये फक्त सनावळ्यांवर विचारले जाणारे प्रश्न हे मर्यादित असतात. दोन,तीन वेळा वाचन केल्यानंतर व ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर सनावळ्या व्यवस्थित लक्षात राहतात.

        संदर्भ ग्रंथ : सर्वप्रथम क्रमिक  पुस्तकांचे वाचन करावे. प्राचिन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी क्रमिक  पुस्तकांचा आधार घ्यावा).

                    1) आधुनिक भारताचा इतिहास – बिपिनचंद्रा (हे पुस्तक मराठीत भाषांतरीत झालेले आहे.).

                    2) आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर अँड ग्रोव्हर   (हे पुस्तक मराठीत भाषांतरीत झालेले आहे

                   ३) प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहासासाठी एन.सी.आर.टी.या पुस्तकांचा अभ्यास करावा.

                                                                     (मराठीत देखील भाषांतरीत झाले आहे ) -के.सागर यांनी केले आहे

                   ४) आधुनिक भारताचा इतिहास -समाधान महाजन (युनिक पब्लिकेशन )

3) महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल :-

एम.पी.एस.सी. सुरुवातीच्या अभ्यासक्रमात  फक्त महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल होता मात्र बदलेल्या अभ्यासक्रमात जगाचा भूगोल नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मागच्या एक वर्षाच्या विविध परिक्षेंचा अभ्यास केला तर भूगोलासंदर्भात एक महत्त्वाचा बदल लक्षात येईन, तो म्हणजे भूगोलावर काही प्रश्न आता विशेषत: नकाशावर विचारली जातात, याचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम परिक्षार्थींनी महाराष्ट्राचा व भारत आणि जग याचा अ‍ॅटलस घेणे आवश्यक आहे व अ‍ॅटलस समोर ठेऊन अभ्यास करावा. जगाचा भूगोलाचा अभ्यास करताना सर्वप्रथम जगातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, जगातील वाळवंटे यांची स्वतंत्र सूची तयार करावी व नंतर खंडाप्रमाणे अभ्यास सुरू करावा जेणेकरून अभ्यास सोेपा होईल. उदा. अमेरिका खंड-उत्तर अमेरिका-कॅनडा-दक्षिण अमेरिका इत्यादी., युरोप खंड, आफि‘का खंड.

संदर्भ ग्रंथ :- 1) सर्वप्रथम इ.5 ते 12 पर्यंतच्या क‘मिक पुस्तकांचे वाचन करावे त्यानंतर

                   2) भारताचा भूगोल प्रा. ए.बी.सवदी

                    3) महाराष्ट्राचा समग्र  भूगोल – प्रा.ए.बी.सवदी यांचे पुस्तक

                   4) जिओग्राफी थ्रू म्यॅप्स – के. सिद्धार्थ यांचे पुस्तक आवश्यक वाचावे.

पर्यावरण :-

             हा अभ्यासासाठी सर्वात सोपा व मनोरंजक असा विभाग आहे. याची तयारी करताना विद्यार्थ्यांनी खालील प्रकरणांचा आधार घ्यावा.वातावरणातील बदल,जैव विविधता,परिस्थितीकी, ग्लोबल वार्मिंग,कार्बन क्रेडिट ,बायोस्पेअर रिझर्व्ह,नॅशनल पार्क,ओझोन थराचा क्षय, बायोडायव्हर्सिटी हॉट स्पॉट त्याचप्रमाणे वातावरण बदलासंदर्भात घेण्यात आलेल्या विविध परिषदा उदा .  रिओ परिषद, कॅन्कून परिषद इत्यादी.

 संदर्भ ग्रंथ-पर्यावरण -तुषार घोरपडे (युनिक )

 भारतीय व महाराष्ट्रात राज्यपद्धती व प्रशासन :-

               या घटकाची तयारी करताना दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी घडत आहे त्यांचा देखील संदर्भ घ्यावा. प्रथम भारतीय राज्यघटना व्यवस्थित वाचून ती समजून घ्यावी, महत्त्वाची कलमे लिहून ती परत परत वाचावीत, निरनिराळ्या घटना दुरुस्त्या, भारतीय राज्य प्रणाली, पंचायत राज, 73 वी घटना दुरुस्ती, 74 वी घटना दुरुस्ती, पंचायतराज व नागरी प्रशासन, मानवी हक्क, न्यायिक प्रणाली, निरनिराळे आयोग त्यांचे कार्य उदा. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महिला आयोग, निवडणूक आयोग इत्यादी केंद्रीय व राज्यस्तरावर नियुक्त केलेल्या निरनिराळ्या समित्या यांचा अभ्यास करावा. 

संदर्भ ग्रंथ

भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत

( हे पुस्तक हिंदीत देखील भाषांतरित झाले आहे.)

भारताची राज्यघटना -तुकाराम जाधव . (मराठीत)

पंचायतराज- के सागर

आर्थिक व सामाजिक विकास :-

अभ्यासक‘मात भारतीय अर्थव्यवस्था याऐवजी आर्थिक व सामाजिक विकास हा शब्द वापरला आहे त्यामुळे बर्‍याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो हा विभाग परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. अभ्यास करताना सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजावून घ्याव्यात त्याचप्रमाणे जुन्या अभ्यासक‘मात असलेल्या पंचवार्षिक योजना, बँक प्रणाली, आयात-निर्यात धोरण, कर प्रणाली, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, उदा. जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, दारिद्य्र निर्मूलन, रोजगार निर्मिती यांचादेखील अभ्यास करावा. याशिवाय वरील अभ्यासाची सांगड खालील मुद्यांशी घातल्यास तयारी परिपूर्ण होईल. शाश्वत विकास,लोकसं‘या,सामाजिक क्षेत्र, भारत व महाराष्ट्राची कृषी व्यवस्था व सहकार इ.

संदर्भ ग्रंथ

भारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पण

( हे पुस्तक इंग्रजीत आहे )

स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)

 सामान्य विज्ञान :-

                   सामान्य विज्ञानात प्रश्न 1) जीवशास्त्र 2) भौतिक शास्त्र 3) रसायन शास्त्र व दैनंदिन जीवनात घडणार्‍या विविध घटनांची संबंधित असलेल्या सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारले जातात. यासाठी विद्यार्थ्यांनी पाचवी ते 10 वी पर्यंतचे एन.सी.ई.आर.टी. ची पुस्तके यांचा अभ्यास करावा. जीवशास्त्र व भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र यांच्यातील शास्त्रीय घटकांचा जास्त अभ्यास करू नये. उदा.रसायनशास्त्रातील निरनिराळ्या अभिकि‘या, जीवशास्त्रातील प्राणी विज्ञान इत्यादी. मात्र जीवशास्त्राचा एक भाग म्हणजे शरीर शास्त्राशी संबंधित निरनिराळे आजार त्यासाठी वापरात असलेले औषधे व्हिटामिन्स, विटामिन्सच्या कमतरतेमुळे होणारे आजार इत्यादींचा अभ्यास व्यवस्थित करावा. याशिवाय ऊर्जा, ऊर्जा समस्या, भारताची संरक्षण व्यवस्था इत्यादींचा अभ्यास करावा.

उत्तर लिहिले · 9/5/2017
कर्म · 10245
2
सर्वांत आधी स्पर्धा परीक्षेचा बेस पक्का करण्यसाठी
चाणक्य मंडल पुणे यांचा बेसिक फाउंडेशन कोर्स
करावा नंतर एकदा अपला मेंदू स्पर्धा परिक्षेसाठी
तयार झाला की त्यांचा पुढचा कोर्स करावा तसेंच
दररोज किमान चार नियतकालिक , वर्तमानपत्र , मासिक
वाचावीत फायदा होइल
उत्तर लिहिले · 9/5/2017
कर्म · 3190
1

12वी नंतर MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेची तयारी कशी करावी यासाठी काही मार्गदर्शन खालीलप्रमाणे:

1. लवकर सुरुवात:

  • 12वी नंतर लगेच तयारी सुरू करणे फायदेशीर आहे, कारण तुमच्याकडे अभ्यासासाठी पुरेसा वेळ असतो.

2. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती समजून घ्या:

  • MPSC च्या परीक्षांमधील विषय, त्यांची काठिण्य पातळी आणि परीक्षा पद्धती (उदाहरणार्थ, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा) समजून घ्या.
  • MPSC च्या वेबसाइटवर अभ्यासक्रम उपलब्ध असतो. (MPSC अधिकृत वेबसाईट)

3. मूलभूत संकल्पना स्पष्ट करा:

  • NCERT आणि राज्य शिक्षण मंडळाची 11वी आणि 12वीची पुस्तके वाचा. यामुळे तुमचे बेसिक्स क्लियर होतील.

4. अभ्यासाचे नियोजन:

  • वेळेचे व्यवस्थापन करा आणि प्रत्येक विषयासाठी वेळ निश्चित करा.
  • दररोज नियमित अभ्यास करा.
  • आपल्या अभ्यासाच्या वेळेनुसार वेळापत्रक तयार करा.

5. योग्य पुस्तके आणि साहित्य:

  • MPSC परीक्षांसाठीStandard संदर्भ पुस्तके वापरा. जसे की अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र इत्यादी विषयांसाठी चांगली पुस्तके निवडा.

6. चालू घडामोडी (Current Affairs):

  • रोज वर्तमानपत्रे वाचा आणि बातम्या पहा.
  • चालू घडामोडींवर लक्ष ठेवा.

7. मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका (Previous Year Question Papers):

  • मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका नियमितपणे सोडवा.
  • त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

8. मॉक टेस्ट (Mock Tests):

  • नियमितपणे मॉक टेस्ट द्या. त्यामुळे तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन आणि तुमच्या तयारीचा अंदाज येईल.

9. मार्गदर्शन:

  • तुम्ही MPSC परीक्षांसाठी कोचिंग क्लासेस लावू शकता किंवा ऑनलाइन मार्गदर्शन घेऊ शकता.
  • MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लोकांकडून मार्गदर्शन घ्या.

10. सकारात्मक दृष्टिकोन:

  • आत्मविश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
  • धैर्य आणि चिकाटीने अभ्यास करा.

टीप: MPSC परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी, MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5400

Related Questions

लेखापाल यांना पगार किती?
लेखपाल म्हणजे काय?
एसटीची नोकरी करू का नको?
एसटी कंट्रोल वाद्यांनी माझे हजेरी नाही लागली तर काय करावे काम करून सुद्धा?
वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यावर अन्याय करत असल्यास, महाराष्ट्र राज्यात काय करावे?
मी १२ वी नापास, वय ३५. तर मला सरकारी नोकरी मिळेल का?
मी नवीन ड्युटी शोधण्याच्या प्रयत्नात आहे?