नोकरी भरती पोलीस पोलीस भरती

पोलीस भरतीसाठी काय पात्रता असते? छाती, वजन, उंची यांसारख्या निकषांविषयी सविस्तर माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

पोलीस भरतीसाठी काय पात्रता असते? छाती, वजन, उंची यांसारख्या निकषांविषयी सविस्तर माहिती सांगा?

8
*_⭕  पोलिस भरती सर्वसाधारण माहिती ⭕_*






'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
    *_우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*_🌹तारीख  22 एप्रिल 2017 🌹_*
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
*भरती केव्हा होतेः* महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात पोलिस भरती त्या त्या जिल्ह्याच्या गरजेनुसार जिल्हा पोलिस अधीक्षक करत असतात. साधारणतः प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस व मध्यास ही भरती होत असते मात्र यासाठी कोणतीही काटेकोर बंधने असत नाहीत. ही भरती मागे पुढे होऊशकते.
☄भरती कोठे होतेः साधारणपणे ज्या जिल्ह्याची पोलिस भरती आहे. त्या जिल्ह्याच्या पोलिस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर भरती होत असते.
☄भरतीचे किती टप्पे असतातः
एकूण तीन टप्पे असतात.१) शारिरीक चाचणी २) लेखी परिक्षा
☄शैक्षणिक पात्रताः किमान १२वी उत्तीर्ण माजी सैनिक उमेदवारांना शासकीय नियमानुसार शिथीलक्षम
☄वयोमर्यादाः सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी – १८ ते २५ वर्ष : मागासवर्गीय गटातील उमेदवारांसाठी – १८ ते २८ वर्ष :माजी सैनिक उमेदवारांसाठी = सैन्यात भरती झालेल्या वेळचे वय +सैन्यातील एकूण सेवा + ३ वर्ष
☄शारिरीक पात्रताः
पुरूषांसाठी महिलांसाठी उंची-१६५ सेंमीछाती न फुगवता -७९ सेंमी,फुगवून-८४सेंमीउंची-१५५ सेंमी
🔅आरक्षणः महाराष्ट्रात पोलीस भरती करताना पुढीलप्रमाणे संवर्गांना आरक्षण दिले जाते.
१. अनुसूचित जाती १३.०%२. अनुसूचित जमाती ७.०%३. बिमुक्त जाती (वर्ग अ) ३.०%४. भटक्या जाती (वर्ग ब) २.५%५. भटक्या जमाती (वर्ग क) ३.५%६. भटक्या जमाती (वर्ग ड) २.०%७. विशेष मागास प्रवर्ग २.०%८. इतर मागास वर्ग १९.०%९. सर्वसाधारण (खुला) गट ४८.०%वरील सर्व संवर्गातील महिलांसाठी ३०% आरक्षण असते.
🔅वैद्यकीय तपासणी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी प्राधिकृत शासकीय वैद्यकीय अधिक-यांकडुन प्रमाणित करण्यातयेईल. वैद्यकीय चाचणीत दृष्टिदोष, तिरळेपणा, रातांधळेपणा, वर्णाधतेपणा, गुडघ्यास गुडघा लागणे,सपाट तळ्वे, त्वचारोग, छातीचे रोग व महासंचालकांनी वेळोवेळी विहित केलेल्या वैद्यकीय चाचण्याचासमावेश असेल.
🔅शारिरीक चाचणी (१००)जे उमेदवार विहित शारिरीक व शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत असतील अशा उमेदवारांनाशारिरीक चाचणी द्यावी लागेल. शारिरीक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण १०० गुणांनी असेल.
🔅लेखी परिक्षा अभ्यासक्रम
१)मराठी २)सामान्यज्ञान ३)अंकगणित४)चालू घडामोडी ५)बुध्दीमत्ता चाचणीगुणांची विभागणीःपोलिस भरती ही प्रत्येक जिल्ह्याला होत असते.लेखी परीक्षेचे सर्वाधीकार हे संभंधीत पोलीसअधीक्षक यांना असतात . सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात एकसारखीत परीक्षा होतात दिसून येते तरी परंतु यात थोडाफार बदल होउ शकतो .दिलेला अभ्यासक्रम व त्याच्यावरील प्रश्नांच्या संख्येत सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे भर दिलेला दिसून येतो.
🔅घटक गुण मराठी १५ते२५बुध्दीमत्ता १५ते२५सामान्यज्ञान १५ते२५अंकगणित १५ते२५चालू घडामोडी १५ते२५प्रश्नपत्रिकेचेस्वरुपःप्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरुपाची असते.सामान्यज्ञान हे श्क्यतो दहावीच्या दर्जाचे असते.

*_░मा░░हि░░ती░░ ░ ░से░░वा░░ ░ ░ग्रू░प░ ░पे░ठ░व░ड़░गा░व░_*
अंकगणिअत दर्जा हा सातवीपर्यंतचा असलेला दिसूनयेतो.चालू घडामोडी आपल्या अवतीभोवती घडणा-या घटनावरआधारीत असतात.हि परीक्षा मराठी माध्यमातून असते.लेखी परीक्षा एकूण १०० गुंणाची असते. त्यापैकी ५०% गुण मिळविणारे उमेदवार शक्यतो लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतात.पुरुष व महिला उमेदवारांसाठी एकच पेपर असतो.
☄तुरुंग रक्षक भरती महाराष्ट्रातील कारागृहाची संख्या भरपूर आहे. या कारागृहासाठी /तुरुंगाच्या रक्षणासाठी रक्षक(शिपाई) पदाची भरती दरवर्षी केली जाते.भरती केंव्हा केली जातेःतुरुंग रक्षक पदाची भरती दरवर्षी केली जाते .साधारणः ही भरती जुलै –ऑगस्ट महिन्यात केली जाते मात्र ही भती याच महिन्यात केली जावी यासाठी कोणतीही काटेकोर बंधने असत नाहीत .या कालावधीत बदल होऊ शकतो.
https://youtu.be/DXxZpbmr_A0
☄शैक्षणिक पात्रताः
या पदासाठी शिक्षणाची अट फारच शिथील आहे.शिक्षणामध्ये मराठी विषयासोबत हिंदीविषय असणे अत्यावश्यक आहे .शिक्षण जास्त असल्यास प्राधान्य दिले जाते. यात महत्त्वाचीबाब म्हणजे शिक्षणातील टक्केवारीची अट नसते.
☄शारिरीक पात्रता तुरुंग रक्षक पदासाठी खालील शारिरीक पात्रता असावी लागते.उंची-किमान १६२ सें मी.छाती – न फुगवता८२ सें. मी. व फुगवुन ८७ सें.मी.वजन – उंचीच्या प्रमाणातशारिरीक चाचणी परीक्षाया पदासाठी शारिरीक चाचणी परीक्षा खालील ६प्रकारे घेतली जाते.१)धावणे २)उंच उडी ३)लांब उडी४)दोर चढणे ५)खड्डे पार करणे ६)भिंत ओलांडणेया परीक्षेत पास होण्यासाठी उमेदवारास कमीत कमी ५०% गुण मिळणे आवश्यक असते .

*_░मा░░हि░░ती░░ ░ ░से░░वा░░ ░ ░ग्रू░प░ ░पे░ठ░व░ड़░गा░व░_*
🔅वयोमर्यादा या पदासाठी उमेदवाराचे वय जाहिरातीत दिलेल्या दिनांकास किमान २० वर्षे व कमाल वय ३०वर्षापेक्षा जास्त असू नये.अनुसूचित जाती /जमातीच्या उमेदवारास वयाच्या अटीत ५वर्षाची शिथीलता असते.माजी सैनिकांना त्यांच्या अटीनुसार वयात शिथीलता .उच्च शिक्षणास प्राधान्यज्या उमेदवाराचे शिक्षण जास्त आहे त्यांना लेखी परीक्षा देण्याची गरज नसते (लेखी परीक्षेतसुट)अशा उमेदवारास शारिरीक चाचणी परीक्षा उत्तीर्णझाल्यास सरळ मुलाखतीस बोलविलेलेखी परीक्षाजे उमेदवार शारिरीक चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होतात अशा उमेदवारास लेखी परीक्षा द्यावी लागते .लेखी परीक्षा हा या भरती प्रक्रियेतील दुसरा महत्त्वाचा टप्पाअभ्यासक्रमया पदासाठी असलेली लेखी परीक्षा खालील घटकावर अवलंबून असते.महाराष्ट्राचे सामान्यज्ञान महाराष्ट्रातील जिल्ह्यांची माहिती अंकगणित चालू घडामोडी
🔅मुलाखत (तोंडी परीक्षा )जे उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतात अशा उमेदवाराची तोंडी परीक्षा घेतली जाते.अंतिम निवडउमेसवारास शारिरीक चाचणी परीक्षेत ,लेखी परीक्षेत व मुलाखतीत मिळालेले गुण एकत्रकरुन उपलब्ध जागा व आरक्षण याचा विचार करुन मेरीटनुसार यादी जाहिर केली जाते.
*'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖_*  *'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*✆ ░9░8░9░0░8░7░5░4░9░8░*
*_'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''_*
0

पोलीस भरतीसाठी आवश्यक पात्रता, छाती, वजन आणि उंची यांसारख्या निकषांविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

1. पात्रता:

राष्ट्रीयत्व: उमेदवार भारतीय नागरिक असावा.

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार 12 वी पास असावा.

वयोमर्यादा:

  • उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • SC/ST/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

2. शारीरिक पात्रता:

उंची:

  • पुरुष: किमान 165 सेमी
  • महिला: किमान 155 सेमी

छाती:

  • पुरुष: किमान 79 सेमी (न फुगवता), फुगवून 5 सेमी जास्त
  • महिला: छाती आवश्यक नाही

वजन:

  • उंचीनुसार योग्य वजन आवश्यक आहे.

3. शारीरिक चाचणी:

शारीरिक चाचणीमध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो:

  • धावणे:
    • पुरुष: 5000 मीटर
    • महिला: 1600 मीटर
  • गोळा फेक:
  • लांब उडी:
  • पुल-अप्स (केवळ पुरुषांसाठी):

4. आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, 12वी, पदवी इ.)
  • जातीचा दाखला (SC/ST/OBC उमेदवारांसाठी)
  • Domicile Certificate ( अधिवास प्रमाणपत्र )
  • जन्म दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

5. निवड प्रक्रिया:

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • वैद्यकीय चाचणी
  • मुलाखत

टीप:

भरती प्रक्रियेतील नियम आणि अटी वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

अधिक माहितीसाठी:

महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 2720

Related Questions

पोलीस भरती प्रश्न?
मी गेल्या तीन वर्षांपासून पोलीस शिपाई भरती करतोय, मला अजून यश आले नाही?
पोलीस भरती प्रश्नसंच?
पोलीस पाटील पदासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती मिळेल का?
पोलीस भरती २०११ चे प्रश्न?
IPS होण्यासाठी काय करावे?
पोलीस भरतीसाठी डोळ्याला किती दिसावे लागते?