राजकारण सरकार मंत्री

केबिनेट मंत्री म्हणजे काय ?

3 उत्तरे
3 answers

केबिनेट मंत्री म्हणजे काय ?

6
कॅबिनेट पद्धति : संसदीय लोकशाहीच्या चौकटीत, जिच्याद्वारे कार्यकारी आणि वैधानिक अशा दुहेरी नेतृत्वाची शक्ती एकत्रित होते अशी पद्धती. अठराव्या शतकात इंग्‍लंडमध्ये या पद्धतीचा उदय झाला. हा शब्दप्रयोग प्रथम फ्रॅन्सिस बेकनने (१५६१–१६२६) केला.

कॅबिन म्हणजे खोली. त्यापासून कॅबिनेट हा शब्दप्रयोग रूढ झाला. राजा अथवा राजाध्यक्ष संसदेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून नेमणूक करतो. ही एक औपचारिक बाब आहे. पंतप्रधानाच्या नियुक्तीनंतर त्याच्याकडे आपले सहकारी निवडण्याचे कार्य सोपविण्यात येते. त्या बाबतीत त्याला स्वातंत्र्य असते; तथापि ब्रिटिश पंतप्रधानावर मात्र उमराव सभेमधून प्रथम श्रेणीच्या मंत्र्यांपैकी कमीत कमी तीन व द्वितीय श्रेणीच्या मंत्र्यांपैकी कमीत कमी दोन उमेदवार निवडण्याचे बंधन असते.

कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे १५ ते २० मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. कॅबिनेट पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. कॅबिनेटने आखून दिलेले धोरण अंमलात आणणे हे मंत्रिमंडळाचे काम आहे.
उत्तर लिहिले · 3/7/2019
कर्म · 7285
2
केन्द्रीय मंत्रिमंडल ,भारत गणराज्य में कार्यकारी अधिकार का प्रयोग करता हैं। इस में वरिष्ठ मंत्री (केबिनेट मंत्री ) और कनिष्ठ मंत्री ( राज्य मंत्री) सम्मिलित होते हैं, जिनका नेतृत्वा प्रधानमंत्री करते हैं। केंद्रीय मंत्रिमंडल नामक एक छोटी कार्यकारी निकाय, भारत में सर्वोच्च निर्णय लेने की संस्था हैं। केवल प्रधानमंत्री और कैबिनेट मंत्री ही कैबिनेट के सदस्य होते हैं। भारत में सबसे वरिष्ठ सिविल सेवक, कैबिनेट सचिव, कैबिनेट सचिवालय का नेतृत्वा करते हैं, तथा मंत्रियों की परिषद को प्रशासनिक सहायता प्रदान करते हैं। राज्य मंत्रियों को अपने काम में कैबिनेट मंत्रियों की सहायता के साथ काम सौंपा गया हैं।
भारत का केन्द्रीय मंत्रिमण्डल
उत्तर लिहिले · 19/4/2017
कर्म · 11240
0

कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकारमधील एक महत्त्वाचा सदस्य असतो. ते सामान्यतः वरिष्ठ आणि अनुभवी राजकारणी असतात ज्यांच्याकडे सरकारमधील काही महत्त्वाची खाती सोपवलेली असतात.

कॅबिनेट मंत्र्यांची काही प्रमुख कार्ये:

  • धोरणात्मक निर्णय घेणे.
  • कायद्यांचे आणि धोरणांचे नियोजन करणे.
  • आपल्या खात्या संबंधित काम करणे.
  • मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये भाग घेणे आणि महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करणे.

कॅबिनेट मंत्री हे सरकारचा एक अविभाज्य भाग असतात आणि त्यांच्या निर्णयांचा देशाच्या प्रशासनावर आणि नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम होतो.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 2920

Related Questions

२०२५ च्या महाराष्ट्रातील मंत्र्यांची यादी सांगा?
भारतात 75 वर्षानंतर व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते का?
राजकारण करते वेळी भाषण शैली?
अरुण गवळीला डॅडी हे नाव कसे पडले?
राजकारणात ओपन जागेवर कोण लढू शकतो?
सरपंचासाठी महत्वाच्या कामासाठी कुठे जाण्याकरिता सरकारकडून काही सोईसुविधा असतात का?
लोकशाही दिनी तक्रार करायची असल्यास किती दिवस आधी अर्ज दाखल करावा?