4 उत्तरे
4
answers
अक्षय तृतीया म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते, याबद्दल मला काही माहिती द्या?
2
Answer link
💁♂ *जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचे महत्व*
🌄 _*शुभकारक अक्षय तृतीया !*_
🙏 *अक्षय्य तृतीया* 🙏
▪अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते.
▪अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे.
▪ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला.
▪या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.
▪नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.
▪कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे.
💁♂ _*अक्षय्य तृतीया : जाणून घ्या शास्त्र आणि परंपरा*_
_वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया हा अतिशय महत्वाचा सण मानला जातो. चैत्र शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेला माहेरी आलेल्या गौरी परत सासरी जातात. मोठ्या थाटाने हळदीकुंकू समारंभ करून त्यांना निरोप दिला जातो._
_मंगल कृत्ये करण्यासाठी, व्रत आचरण्यासाठी, जपादी पुण्यकर्मे करण्यासाठी हा शुभदिवस आहे. हे पुण्यकर्म अक्षय फलदायी होते, अशी समजूत आहे. ऋषभ देवाने एक वर्ष आणि काही दिवसांनंतर हस्तिनापूरचा राजा श्रेयास याच्या घरी या तिथीस उसाच्या रसाचे प्राशन करून उपवास सोडला. त्यामुळे श्रेयास राजाची भोजनशाळा अक्षय्य झाली म्हणून वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय्य तृतीया हे नाव पडले अशी आख्यायिका आहे._
_या दिवशी पवित्र जलात स्नान करतात. विश्वाच्या पालनकर्त्यां विष्णूला संतुष्ट करण्यासाठी त्याची पूजा करतात. जप, होमहवन, पितृतर्पण करतात. वैशाख वणव्यात वसुंधरा होरपळू लागते. या काळात समस्त पशू-पक्षी, मानव तृषाक्रांत होतात. त्यामुळे त्यांची तहान भागविणे हे पुण्यकर्म समजून उदार व दानशूर व्यक्ती पाणपोई घालतात._
_पांथस्थ जलप्राशनाने तृप्त होतात. पशू-पक्ष्यांसाठी गावात व जंगलात कृत्रिम पाठवणे तयार केले जातात. म्हणूनच पूर्वजांनी मुद्दाम शास्त्र सांगितले की या दिवशी शिध्यासह उदककुंभ दान करावा. ऐपतीनुसार गरिबांना छत्री, जोडा अशा वस्तूंचे दान करून उन्हाच्या काहिलीपासून त्यांचे संरक्षण करावे._
_चैत्र शुद्ध तृतीयेस मत्स्य जयंती असते. चैत्र शुद्ध नवमीस रामजन्म, वैशाख शुद्ध द्वादशीस भगवंती देव जयंती, वैशाख शुद्ध चतुर्दशी नृसिंह जयंती, वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा असे विष्णूचे अनेक अवतार या महिन्यात झाले म्हणूनही त्याची पूजा वैशाख महिन्यात पुण्यकारक मानली गेली असेल._
◼ _साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाला पाहिले जाते. त्यामुळे या दिवशी केलेले कोणत्याही कार्याचे शुभ फळ मिलते. त्यामुळे हा प्रत्येक मुहूर्तासाठी सुमंगल आहे._
◼ _अक्षय्य तृतीया म्हणजे या दिवशी खरेदी केलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली गोष्ट नेहमी अक्षय्य राहते असे म्हटले जाते. या दिवशी एका कलहकालाचा अंत आणि दुसर्याा युगाचा त्रेतायुगाचा प्रारंभ झाला यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात._
वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकीच एक आहे. या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आवर्जून करतात.
🧐 *अक्षय्य म्हणजे?* :
▪ संस्कृतमध्ये अक्षय्य या शब्दाचा अर्थ आहे, ज्याचा कधीच क्षय होत नाही, जे कधीच संपत नाही असं.
▪ 'अक्षय्य तृतीया' नाव पडण्याचे कारण भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी अक्षय्य तृतीया असे म्हटले.
कारण अशी एक श्रद्धा आहे की, या दिवशी सोने खरेदी केलं तर घरात कायम संपत्ती येते. संपत्तीचा देव म्हणजे कुबेर यांनी शंकराची उपासना करून संपत्ती याच दिवशी मिळवली अशी धारणा आहे.
📍 *सणाविषयी काही खास बाबी* :
▪ मंगल कृत्ये करण्यासाठी, व्रत आचरण्यासाठी, जपादी पुण्यकर्मे करण्यासाठी हा शुभदिवस आहे. हे पुण्यकर्म अक्षय फलदायी होते, अशी समजूत आहे.
▪ हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.
▪ या दिवशी खरेदीसोबत दानाचेही फार मोठे महत्व आहे. या दिवशी केलेले दान अथवा चांगले कर्म कधीच क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचा ऱ्हास होत नाही.
▪ गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे.
▪ गुजराथी लोक या तिथीला ‘आखातरी’ म्हणतात. शेतकरी आकिती म्हणतात व वेलींच्या बीजांची पेरणी करतात.
🔍 _*कसा साजरा होतो ?*_
_पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे. या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात._
📆 _*मुहूर्त*_
_अक्षय तृतीया पूजा मुहूर्त – सकाळी 05:40 ते दुपारी 12:17 पर्यंत_
_सोने खरेदी करण्याचा मुहूर्त- सकाळी 6.26 ते रात्री 11.47 पर्यंत_
📍 _*या सणाचे महत्व*_
◼ _या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते._
◼ _नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता._
◼ _परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते._
◼ _या दिवशी दान धर्म केले जाते._
*म्हणून अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करतात*
💁♂ *सोनं का खरेदी करतात?* : या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असे मानले जाते. या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला पसंती दर्शवतात.
वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया हा सण हिंदू आणि जैन धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ आणि पवित्र आहे.
▪या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असे मानले जाते. अक्षय तृतीयेची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला पसंती दर्शवतात. अशी एक श्रद्धा आहे की या दिवशी सोने खरेदी केलं तर घरात कायम संपत्ती येते.
▪संस्कृतमध्ये अक्षय्य या शब्दाचा अर्थ आहे, ज्याचा कधीच क्षय होत नाही, जे कधीच संपत नाही असं. या दिवशी सोने खरेदी करणं म्हणजे कुबेराची मर्जी राखणं, त्याला खूश करणं, जेणे करून घरात कायम संपत्तीचा वरदहस्त राहील.
💁 _*अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा*_

1
Answer link
*_⭕ अक्षय तृतीया का साजरी करतात? ⭕_*
अक्षयतृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय '(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. ↙अर्थ :अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्याकृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे.
🌀अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करतात :
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामे केली जातात.*.या दिवशी नवीन वस्त्र, दागिने विकत घेतली जातात.*.मातीत आळी घालून पेरणी केली जाते. पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करावे.

0
Answer link
अक्षय तृतीया: एक परिचय
अक्षय तृतीया हा एक हिंदू सण आहे. हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येतो. ‘अक्षय’ म्हणजे ‘अविनाशी’ किंवा ‘अमर’. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय राहते, असे मानले जाते.
अक्षय तृतीया साजरी करण्याची कारणे:
- शुभ दिवस: या दिवशी नवीन काम सुरू करणे, सोने खरेदी करणे किंवा गुंतवणूक करणे शुभ मानले जाते.
- भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा: या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
- पुराणिक कथा:
- असे मानले जाते की या दिवशी वेद व्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली.
- याच दिवशी भगवान विष्णूचा अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता.
- अन्नपूर्णा देवीचा जन्म देखील याच दिवशी झाला होता.
- दानधर्म: या दिवशी गरीब लोकांना दानधर्म करणे खूप पुण्यकारक मानले जाते.
अक्षय तृतीया कशी साजरी करतात?
- या दिवशी लोक सोने खरेदी करतात.
- नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करतात.
- घरात लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करतात.
- गरीब व गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान करतात.
अक्षय तृतीया हा सण नवीन सुरुवात करण्यासाठी आणि घरात समृद्धी आणण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
अधिक माहितीसाठी काही उपयुक्त स्रोत: