शेती भूगोल सात बारा

7/12 उताऱ्याला 7/12 उताराच का म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

7/12 उताऱ्याला 7/12 उताराच का म्हणतात?

5
जमिनीसंदर्भातील रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे सातबारा होय.

जमिनीची माहिती ज्यामध्ये असते त्याला गाव नमुना असे म्हणतात. गाव नमुना ठेवण्यासाठी १-२१ अशी विभागणी केलेली असते. त्यातील ७ नम्बरचा नमुना मालकी हक्का बाबत असतो. तर १२ नम्बर मध्ये पीकसंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण ७/१२ मध्ये केलेले असते. महसूल विभागाची गावनिहाय माहिती ठेवण्यासाठी गावांमध्ये तलाठी हे पद कार्यरत आहे.

गावाच्या जमिनीची माहिती ज्यात असते त्याला गावनमूना असे म्हणतात. गाव नमुना ठेवण्यासाठी १-२१ अशी विभागणी केलेली असते. त्यातील ७ नम्बरचा नमुना मालकी हक्का बाबत असतो. तर १२ नम्बर मध्ये पीकसंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण ७/१२ मध्ये केलेले असते.

७/१२ संबंधीची महत्वाच्या महत्वाच्या बाबी :

१). ७/१२ हा जमीन मालकी हक्का चा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो.

२). ७/१२ बेकायदेशीर ठरविला जात नाही तो पर्यंत तो कायदेशीर मानला जातो.

३). ७/१२ पीक पाहनी नोंद दर वर्षी केली जाते .

४). प्रतेक स्वतंत्र गटा साठी एक सातबारा असतो.

५). ७/१२ त माकाशिवाय दूसरया व्यक्तिचे नाव , कुळ , खंड सदरात थेट लावण्याचे अधिकार तलाठी यां ना नाही.

६). प्रतेक वेळी ७/१२ काढल्यावर कर्ज व कर्ज देना री संस्थेची नावे, विहीर बोअरवेल, फळझाडे, झाडे अशा नोंदी खात्रीने पाहिल्या पाहिजे.
उत्तर लिहिले · 8/4/2017
कर्म · 435
1

साधारणपणे भारतामध्ये घराचा (Real Estate) व्यवहार करताना 'सात-बाराचा उतारा' आणावा लागतो. हे बहुश्रुत आहे. 'सात-बारा हे कुठल्याही कायद्याचे कलम नव्हे. हे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी दिलेले योगदान आहे. त्यांनी सरकारी खर्चाने गरीब माणसाच्या दारात १२ फळझाडे लावली. त्यातील सात झाडे त्या गरीबाची आणि पाच झाडे सरकारची.

बारा झाडांची निगा राखून, सात झाडांची म्हणजे ७/१२, फळे स्वतः खावयाची आणि राहिलेल्या पाच झाडांची फळे, म्हणजे ५/१२ सरकारी जमा करावयाची, ती इतर गरिबांना वाटण्यासाठी.

त्यासाठी एक सरकारी दफ्तर निर्माण करून या झाडांची नोंद करण्यात आली. या नोंदीच्या उताऱ्याला 'सात-बाराचा उतारा' म्हणण्याचा प्रघात पडला. तो आजतागायत चालू आहे.
उत्तर लिहिले · 26/6/2020
कर्म · 750
0

7/12 उताऱ्याला 7/12 उताराच का म्हणतात याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

7/12 उतारा हा महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख विभागाद्वारे तयार केला जातो. या उताऱ्यामध्ये जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी माहिती असते. हा उतारा दोन भागांमध्ये विभागलेला असतो:

  1. नमुना नंबर ७: या भागामध्ये जमिनीच्या मालकाचे नाव, जमिनीचा प्रकार, खाते क्रमांक आणि इतर तपशील असतात.
  2. नमुना नंबर १२: या भागामध्ये जमिनीवरील कर्जाचा बोजा, जमिनीवरील अधिकार आणि इतर तपशील असतात.

हे दोन्ही भाग मिळून तयार होणाऱ्या उताऱ्याला 7/12 उतारा म्हणतात, कारण हे दोन्ही नमुने एकत्रितपणे जमिनीची संपूर्ण माहिती दर्शवतात.

अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: भूमी अभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5100

Related Questions

भारताच्या शेजारील देश?
नंदूरबार जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
भारतका छोटा राज्या कौनसा है?
सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे?
महाराष्ट्राला किती लांब समुद्रकिनारा लाभला आहे?
भारतामध्ये किती किल्ले आहेत?