2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्र दिनाची माहिती मिळेल का?

4
🚩 महाराष्ट्रदिन 🚩
1 मे हामहाराष्ट्रराज्याचा स्थापनादिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्रमहाराष्ट्रराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हातीमहाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्यामहाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसामहाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमातमहाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीनसंस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे.महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहातअसतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनीमराठीभाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरेयांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठीएक झाले आणि संयुक्तमहाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे.महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी
🚩मंगल देशा ! पवित्र देशा !महाराष्ट्रदेशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्रदेशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥॥ 🚩
अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत.
0

महाराष्ट्र दिन हा १ मे रोजी महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. याच दिवशी इ.स. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

इतिहास:

  • १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार, भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली.
  • मराठी भाषिक लोकांचे राज्य असावे, यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठे आंदोलन केले.
  • या आंदोलनामध्ये १०६ लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या बलिदानाला आदराने स्मरण केले जाते.
  • अखेरीस १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली.

महत्व:

  • महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्रातील लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.
  • या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते.
  • विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
  • महाराष्ट्राच्या इतिहासाचे स्मरण केले जाते आणि शहीदांना आद Frank homage वाहिली जाते.

perfunctory: महाराष्ट्र दिन हा मराठी भाषिक लोकांच्या अस्मितेचा आणि गौरवाचा दिवस आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 4980

Related Questions

2000 साली महाराष्ट्र दिन सोमवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?
महाराष्ट्र दिन कसा साजरा करतात?
महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो?
महाराष्ट्र व कामगार दिनाविषयी माहिती मिळेल का?
महाराष्ट्र दिन का साजरा करतात?
महाराष्ट्र दिनाची कथा कोणाला माहीत आहे? माहीत असेल तर सांगा?
महाराष्ट्र दिनाचे महत्त्व काय आहे?