2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो?
1
Answer link
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रा राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.
0
Answer link
महाराष्ट्र दिन दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो.
हा दिवस 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, जेव्हा बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन नवीन राज्ये अस्तित्वात आली.
या दिवशी महाराष्ट्रात शासकीय सुट्टी असते.