3 उत्तरे
3 answers

VPN म्हणजे काय?

5
#VPN

vpn म्हणजे virtual private network होय.
vpn च्या मदतीने आपण Block website's बघु शकतो!
उत्तर लिहिले · 4/4/2017
कर्म · 2210
2
VPN म्हणजे काय? व्हीपीएन बद्दल संपूर्ण माहिती 

VPN चा फुल्ल फॉर्म Virtual Private Network असा होतो, हे एक नेटवर्क तत्रंज्ञान आहे ज्याचा वापर सुरक्षित इंटरनेट कनेक्शन तयार करण्यासाठी केला जातो. VPN तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित करते तसेच तुमचे स्थान लोकेशन सुद्धा लपविले जाते जेणेकरून कोणीही तुमचे स्थान शोधू शकत नाही.
             
ह्या व्हीपीएन सर्विसचा वापर हा मोठमोठया आँनलाईन कंपन्या तसेच संस्था आपला डेटा हँकर्सपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी मुख्यकरून करत असतात. व्हीपीएन यामुळे सर्वच प्रकारच्या डेटा ला सुरक्षितता प्रदान करता येते, तसेच या तत्रंज्ञाना चा वापर आपण मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्पुटर या दोन्ही मध्ये करू शकतो. VPN हि एक नेटवर्क सिस्टिम आहे, या मुळे कोणतीही अनोळखी व्यक्ती आपला डेटा किंवा माहिती हॅक करू शकत नाही.
VPN प्रोटोकॉल चा वापर करून आपल्याला आपला IP ऍड्रेस आणि लोकेशन लपवता येते, यामुळे आपण कोण आहोत, कुठे आहोत किंवा ऑनलाइन काय करत आहात हे VPN सेवा प्रदात्या शिवाय कोणालाही सांगता येत नाही.
VPN चे प्रकार | VPN Type in Marathi
  • साईट-टु साईट व्हिपीएन | Site to Site VPN
  • पीपीटीपी व्हिपीएन | Point to Point Tunneling Protocol (PPTP VPN)
  • आयपी सिक्युरीटी व्हीपीएन | Internet Protocol Security (IPs VPN)
VPN चे फायदे | Advantage of VPN in Marathi
  • VPN च्या साहाय्याने आपण स्वतः ची ओळख लपवू शकतो आणि लोकेशन सुद्धा बदलू शकतो.
  • VPN च्या वापरामुळे ऑनलाइन संरक्षण मिळते आणि VPN द्वारे इंटरनेट वर ब्राउझ करणे खूप सेक्युर होते.
  • VPN वापरण्यासाठी पैसे लागत नाहीत, तुम्ही त्यात दिलेली सर्व वैशिष्ट्ये अगदी मोफत वापरू शकता.
VPN चे तोटे / नुकसान | Disadvantage of VPN in Marathi
  • व्हीपीएनचा वापर केल्यामुळे हँकरला इनलिगल काम करण्यास म्हणजेच आपला डेटा चोरी करण्यास जास्त फायदा होत असतो. जे आपल्यासाठी खुप धोकादायक ठरू शकते.
  • VPN वापरत असताना बहुतेक वेळा इंटरनेटचा वेग मंदावतो.
  • व्हीपीएन चा वापर केल्यामुळे आपली करंट लोकेशन कोणीच ट्रँक करू शकत नाही. पण हा आपला गैरसमज आहे. कारण जरी आपण आपली लोकेशन व्हीपीएनद्वारे बदलू शकत असलो तरीही व्हिपीएनच्या सर्वर मध्ये असलेला डेटा हा जसाच्या तसा राहतो.
आपल्याला मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये VPN चा वापर करता येतो तर चला पुढील प्रमाणे मोबाईल मध्ये आणि कॉम्पुटर मध्ये VPN कसे वापरायचे याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया.

मोबाईल मध्ये VPN कसे वापरायचे
  1. जर तुम्हाला मोबाईल मध्ये VPN चा वापर करायचा असेल तर प्ले स्टोअर वर जाऊन VPN अँप डाउनलोड करू शकता.
  2. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे VPN खाते तयार करावे लागेल त्यानंतर तुम्ही लॉगिन करा.
  3. VPN अँप मध्ये लॉगिन झाल्यानंतर तुम्ही VPN वापरू शकता आता तुमचा VPN सर्वर आणि स्थान सिलेक्ट करून कनेक्ट करा.
  4. VPN शी कनेक्‍ट केल्‍यानंतर केल्यानंतर तुमची लोकेशन कोणीही शोधू शकणार नाही.
कॉम्पुटर मध्ये VPN कसे वापरायचे

आपण कॉम्पुटर आणि लॅपटॉप मध्ये VPN चा वापर कसा केला जातो हे पाहूया. सर्वात आधी तुम्ही एक उत्तम VPN सॉफ्टवेअर निवडून घ्यावे. नंतर तुम्हाला त्या सॉफ्टवेअर मधील VPN चे सेटिंग चेक करून घ्यावे आणि योग्य प्रकारे सेट करून घ्यावे.
  1. सर्व प्रथम एक VPN अँप्स किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या आणि त्या अँप्स ला आपल्या कॉम्पुटर मध्ये इंस्टाल करा.
  2. त्यानंतर त्या अँप्स ला ओपन करा आणि मेनू या पर्यायावर क्लिक करा.
  3. मेनू या पर्यायामध्ये तुम्हाला सेटिंग चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. सेटिंग मधील Privacy and Security हा पर्याय निवडून त्यामध्ये VPN या पर्यायावर जाऊन क्लिक करा.
अश्या प्रकारे आपण कॉम्पुटर मध्ये VPN योग्य प्रकारे सेट करू शकता. अश्याच पर्यायाचा वापर करून आपण मोबाईल मध्ये सुद्धा VPN सेट करता येते.

अश्या प्रकारे आपण व्हीपीएन नक्की काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. तरी तुम्हाला आणखी विस्तृत माहिती हवी असेल तर नक्की आमच्या ब्लॉग ला व्हिझिट करा आणि वाचा नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहिती.


उत्तर लिहिले · 13/9/2022
कर्म · 2195
0

VPN म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (Virtual Private Network). हे एक तंत्रज्ञान आहे जे तुम्हाला इंटरनेट वापरताना सुरक्षितता आणि गोपनीयता प्रदान करते.

VPN कसे काम करते:

  • VPN तुमच्या डिव्हाइस आणि इंटरनेट दरम्यान एक सुरक्षित कनेक्शन तयार करते.
  • तुमचा डेटा एन्क्रिप्ट (encrypt) केला जातो, त्यामुळे तो कोणीही वाचू शकत नाही.
  • तुमचा IP ॲड्रेस लपवला जातो, त्यामुळे तुमचे स्थान कोणालाही कळत नाही.

VPN चे फायदे:

  • सुरक्षितता: सार्वजनिक वाय-फाय (Wi-Fi) नेटवर्क वापरताना डेटा सुरक्षित ठेवतो.
  • गोपनीयता: तुमची ऑनलाइन क्रियाकलाप (online activity) गुप्त ठेवतो.
  • भौगोलिक निर्बंध टाळणे: काही वेबसाइट्स किंवा सेवा विशिष्ट ठिकाणी उपलब्ध नसतात, VPN वापरून त्या एक्सेस (access) करता येतात.

VPN चे उपयोग:

  • सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटवर सुरक्षितपणे इंटरनेट वापरणे.
  • तुमच्या ऑनलाइन क्रियाकलापांना गुप्त ठेवणे.
  • भू-निर्बंधित (geo-restricted) सामग्री (content) ॲक्सेस करणे.
  • सरकारी सेन्सॉरशिप (censorship) बायपास (bypass) करणे.

अधिक माहितीसाठी:

टीप: VPN निवडताना, खात्री करा की ते विश्वसनीय आहे आणि तुमची माहिती सुरक्षित ठेवते.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5220

Related Questions

व्ही पी एन म्हणजे काय?
मोबाइल मधील VPN सेटिंग कशी करावी?
मोबाईल सेटिंग मध्ये VPN ऑप्शन असतो ते काय आहे?
सर, मला VPN ॲप म्हणजे काय, ते कशासाठी, कसे आणि का वापरावे?
मोबाइलमधील VPN काय असते आणि त्याचा उपयोग कसा करायचा?